एका भिंतीवर घर उभे राहत नाही..

Written by

©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️

#एका भिंतीवर घरं उभे राहत नाही….

दोघांचं प्रेम होत एकमेकांवर! पण तिच्या घरच्यांचा विरोध!!!खूप प्रयत्न केलेत तिने घरच्यांना समजावण्याचा शेवटी त्यांचं प्रेम घरच्यांनी मान्य करून रीतसर लग्न लाऊन दिलं..?

लग्नाआधीच अल्लड वागणं कमी झालं आणि जबाबदारी वाढली..दोघं एकमेकांना समजून घ्यायचे..पण तिला कुठेतरी जाणवायला लागला की लग्ना आधीचा “तो” नव्हताच..त्याच्यात प्रचंड बदल जाणवत होते…आपण ज्याच्या प्रेमात पडलो तो हा नाहीच..पण तरीही ती हार मानण्याऱ्यातली नव्हतीच..?

तिने शेवटी न राहवून त्याला विचारलंच तर तो म्हणाला माझ्यात काय बदल झालाय?? मी तोच तर आहे! पण तू असं का विचारत आहेस?? ती विचारात पडली! तिला जाणवलं तो तर कधी चेंज झालाच नाही.तो जसा होता तसाच आहे पण आपणच समजून घेण्यात गफलत केली..?

प्रेम असणं आणि लग्नानंतर सोबत राहणं ह्यात खूप फरक असतो..प्रेमात कुणाला कुणाच्या चुका दिसत नाहीत कारण लग्ना आधीच प्रेम आंधळ असतं आणि लग्नानंतरच प्रेम डोळस!!! लग्ना आधी तो चुकत असेल तर आपल्याला त्याचं कौतुक वाटतं आणि त्याला समजून घेतो पण तसचं जर तो लग्ना नंतर वागत असेल तर चीड चीड व्हायला लागते..भांडण होतात. ..

छोट्या छोट्या गोष्टी कळतं नाही म्हणून दोष दिल्या जातो.. तिचा ही आधीचा समजूतदारपणा कमी पडायला लागला आणि ती खूप चिडखोर होत गेली..       हळु हळु तिच्या लक्षात यायला लागलं की ,ती कितीही चिडली तरी तो कधीच चेंज होणार नाही..आणि त्याने तरी का चेंज व्हावं?? आपण ज्याचावर प्रेम केलं तो हाच आहे..

आणि कुणी कुणाला बदलून प्रेम करत असेल तर ते प्रेम कसलं?? म्हणून तिने स्वतःशीच ठरवलं आता तो कसाही वागला तरी आपण रागवायचे नाही..तो जसा आहे तसंच स्वीकारायचं! कारण चूक त्याची नाहीच..प्रत्येकाचा खरा स्वभाव सोबत राहिल्यानेच कळतो..

तिने त्याला चेंज करण्यात वेळ न घालवता स्वतः मध्ये बदल करून घेतले..आणि ह्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो..कोणताही व्यक्ती कसाही असला तरी तो स्वतः ला खूप प्रिय असतो..आठवतो ना करीना कपूर चा “जब वुई मेट ” मधला डायलॉग? “मे अपनी फेवरेट हू”? तसंच प्रत्येकाच असत! तिलाही कुठेतरी त्रास होत असेलच ना? ती त्याच्याशी आई सारख वागु लागली कारण एक आईच आपल्या मुलाचा चुका पदरात घेते..

पण ते किती दिवस? त्याची आई होतांना तिच्यातील बायकोचं काय?? तिने तरी का मन मारून जगावं?? एक दिवस तर ह्या सगळ्याचा स्पोट होईलच ना? मग इतकं सगळ घडण्याआधीच प्रेम आंधळ नाहीतर डोळस करावं..जेणेकरून कुणावर मन मारून जगायची वेळ येऊ नये! एक दिवस तिचीही सहनशक्ती संपेल.. संसार दोन्हीकडून टिकायला हवा कारण एका भिंतीवर घर उभे राहत नाही…

लेख आवडल्यास शेअर करा पण माझ्या नावासकट..??

#लेखा बद्दल म्हणाल , तर हे माझे वैयक्तिक मत आहे, ह्यासाठी वाचक सहमत असायलाच हवेत ..ही माझी मुळीच अपेक्षा नाही…? काही चुकल्यास क्षमस्व!!!

? योगिता विजय?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा