एका लग्नसोहळयाची गोष्ट:

Written by

तारीख ३० मे २०१९
हॉलच्या आवारात प्रवेश करताच उजव्या बाजुला दिसला लक्षवेधक सेल्फी पॉइंट, त्या विचारात मग्न असताना डाव्या बाजुला नाश्त्याची चाहूल लागली, जाऊन बघावं तर काय? टीपिकल भारतीय पदार्थ ते म्हणजे इडली, मेदू वडा चहा. चौकशीत कळलं साबुदाणा खिचडी पण होती, अहो आज एकादशी नाही का, तिथेच खूण पटली की जेवण भारीच असणार आहे 😊.
मुख्य हॉल मध्ये प्रवेश करताना हातात आल छान असं तबक, ते उघडून पाहते तर काय🤔? अक्षतांच्या रुपात फुलांच्या पाकळ्या गालातल्या गालात हसत होत्या. आश्चर्याचा सुखद धक्काच होता हा माझ्यासाठी, आम्हाला करता नाही आल पण यांना जमल बुवा 😚.
मग पोहोचलो इच्छित स्थळी, वाह वाह काय ती सीटिंग अरेंजमेंट, संपूर्ण हॉल पै पाहुण्यांनी व्यापला होता आणि मधोमध विवाह सोहळ्याचे ठिकाण होते. ते न्याहळून होत नाही तोवर एक लहानशी सुंदर डबी समोर आली त्याबरोबर प्रेमळ सूचनाही होती बरं, की या खऱ्या अक्षता आहेत जपून वापरा, तांदळाचा नास होऊ नये हा स्तुत्य हेतू होता यामागे. फारच आवडल हे, १०० पैकी १०० मार्क्स.
मग वेळी आली वर वधूच्या आगमनाची आणि घटका भरली मुहूर्ताची; यथासांग सुटसुटीत लग्न लागलं आणि आमचे डोळे पाणावले, आमची लेक सासुरवाशीण झाली 😚.
मग वाट काढत आल चाफ्याच फुल विथ सेफ्टी पिन बरं का, लगेच चाफ्याने केसात जागा पटकावली 🤗 आणि सोबतीला छान पॅक केलेलं हळद कुंकुही होतच.
लागलीच पंगत सुरू झाल्याची अनाउन्सेंट आली, पण जागचा पाहुणा उठेचं ना 🤔. दुसऱ्या वेळेस मात्र सांगितले की पंगत केळीच्या पानावर आणि बुफे दोन्ही आहे मग गर्दीची पांगापांग झाली.
अशीच आमच्याही जेवणाची वेळ आली आणि सुरू झाला खाण्याच्या सोहळा. वाह वाह अस्सल मराठमोळं जेवण बरोबरीला मॉर्डन टच. जेवणाचा घाट तर काय वर्णावा अहाहा वेगवेगळया प्रकारच्या भज्या, भात, साधं वरण, फणसाची भाजी, काजूची उसळ, आमरस अजूनही बरेच पदार्थ होते पण जिभेवर चव रेंगाळत राहिली ती मोदकांची. हो हो पंगतीत उकडीचे मोदक होते तेही अनलिमिटेड बरं 😎.
सगळ्या अरेंजमेंटसाठी आणि केटरर्स निवडीसाठी यजमानांच कौतुक झालच पाहिजे.सगळं कसं पद्धतशीर होत. आणि जेवणाच तर क्या कहने, जेवण उत्कृष्ट होतं 👌👌
जेवण उरकून वेळ झाली उत्सवमूर्तीना भेटण्याची. भरपूर गर्दीत ही आम्ही रांगेच्या आणि आमच्याही मनाच्या विरोधात जाऊन भेट घेतली त्याबद्दल क्षमस्व. अशा करते आम्ही डोंबिवलीकर असल्याने आमची अडचण तुम्ही समजून घ्याल 😉.
अश्याप्रकारे पार पडला आमच्या पल्लू आणि प्रतिकरावांचा लग्नसोहळा. नांदा सौख्यभरे 💑

✍️ ©स्नेहा किरण
मुखपृष्ठ आभार : गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत