एक अनुभव असेही

Written by

चुलत भावाच्या छोट्या मुलाने अचानक एक मांजरीचे पिल्लू गल्लीत घेऊन आला. आता मी ह्याला पाळणार आहे, असं बोलत त्याचा सांभाळ केला.
काही दिवसांपूर्वी मांजर अचानक एका पायाने लंगडत चालू लागली व तिच्या अंगावरील केस आपोआप गळू लागले, म्हणून मांजरीला भावाच्या छोट्या मुलाच्या मदतीने पिशवीत घालून दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी मांजरीची तपासणी करून तिला कसले तरी इन्फेक्शन झाल्याचे सांगितले व दवाखान्यातील काहीजणांच्या मदतीने तिला दोन इंजेक्शन दिले. डॉक्टरांची दहा रुपये फीस देऊन किती दिवसात बरी होईल, अशी विचारणा केली असता डाॅक्टरांनी उदास होत उत्तर दिले होते काहि सांगता येणार नाही ठिक होईल की नाही.
डॉक्टर चे उत्तर ऐकून पुतण्या च्या डोळ्यातील चमक नाहीशी झालेली मला जाणवली. मी हसत मुखाने त्याच्याकडे पाहून बोललो काही होत नाही मांजरीला काही दिवसातच पळायला लागेल बघ … (खादीम सय्यद ©)
आज तब्बल एक महिना आठ दिवसांनंतर चुलत भावाच्या घरा समोरून येत असताना अचानक तेच मांजर माझ्या जवळ येऊन दोन्ही पायाच्या आसपास घिरट्या घालू लागले, मांजरीला पाहून मनाला एका वेगळ्याच आनंदाची जाणीव झाल्याचं वाटले कारण ते पुर्ण पणे बरे झाले होते.
लागलीच खिशातला मोबाईल काढून तिचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता हे जणु तिच्या लक्षात आले की काय तोच तिने कॅमेरा समोर पोझ दिली आणि तिचा सुंदर असा एक क्षण टिपता आला.
(खादीम सय्यद ©)

Article Tags:
Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा