एक गाव असावं.. जिथे जायला मन आतुर असावं..

Written by

 एक गाव असावं.. जिथे फक्त ओलावा आणि प्रेमच बरसावं…
एक गाव असावं...जिथे आजोबांची सावली आणि आजीचं प्रेम असावं….

एक गाव असावं....जिथे मामी सुगरण आणि मामा तालेवार असावा..

एक गाव असावं... जिथे सुट्ट्यांचा आनंद मनमुराद लुटता यावा…

एक गाव असावं…जिथे घरापेक्षाही मोठ अंगण असावं…
एक गाव असावं…जिथे जायला मन आसुसलेलं असावं..

एक गाव असावं...जिथे चहुबाजूने हिरवळ व झाडांची रेलचेल असावी..

एक गाव असावं… जिथे शहराचा कागदी पणा व झगमगाट नसावी..

एक गाव असावं….जिथे सर्व एकत्र कुटुंबात राहावे…
एक गाव असावं…ज्याला माहेर म्हणताना आपोआप डोळे ओले व्हावे..

एक गाव असावं…जिथे जायला उन्हाळ्याची वाट असावी…
एक गाव असावं..जिथे जाताच प्रत्येकाची रीती ओंजळ भरावी….✍️जयश्री कन्हेरे  सातपुते

गावाला सगळे विसरत चालले आहे.. त्यासाठी थोडस.. साधं सरळ..

एकच बाळ असत आजकाल..त्यामुळे मामा मावशीचे नाते फक्त ऐकण्यापुरतेच राहिलेत..  व सगळे शहरात.. त्यामुळे गावाशी असलेलं नाळ तुटत आहे.. आवडल्यास like, कॉमेंट करा शेअर करायच असेल तर नावासहित करा. धन्यवाद, ©®जयश्री कन्हेरे सातपुते.. फोटो.. साभार गुगल ???

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा