एक गाव असावं… मामाच्या गावाला जाऊया..

Written by

©®जयश्री सातपुते  ( मामाच्या गावाला जाऊया…)
लास्ट exam चा time table मिळाला आणि मुलांचं सुरु झाला… आता पेपरसंपले की उन्हाळ्याच्या सुट्ट्या मग छान.. मामाच्या गावाला जायला मिळेल धम्माल..
या आनंदात ते विसरलेच की आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणून..
मुलांना स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आणलं “अरे हो आधी अभ्यास करा.. नाहीतर पेपर मधे मामाच्या गावाला जाऊया.. पळती झाडें पाहूया हेच लिहाल ” सगळं नंतर आधी फक्त अभ्यास कळलं…
हो.. कळलं आई
अगदी आनंदात “हो आई” म्हणाले मुलं… कारण मामाच्या गावाला जायची खुशी
मुलांची परीक्षेची तयारी करून घेण्यात.. पेपर झालेसुद्धा…. आणि लागल्या त्या सुट्ट्या एकदाच्या..
आता झालं सुरु आई.. कधी जायच मामाकडे…? मावशी कधी येणार आहे ..?
खरंच किती उत्सुकता, ओढ असते मुलांना.. मामाकडे जायची. माझ्या मुलांचे नशीब छान आहे.. जे त्यांना मामा व मामाच गाव दोन्ही आहे..
???विचार करताय…
कळलं नाही का..
म्हणजे आजकाल आणि बरेच आधीपासून एक किंवा दोन अपत्य असतात. त्यात मुलगा व मुलगी असली तर… मामा असतो..
पण मामा हा गावात नसतो न..
तो असतो शहरात… आणि इतकंच नाही तर अगदी शेजारी असतो बर का मामा.. त्यामुळे मामाच गाव हरवत चाललंय..
म्हणून म्हणते माझी मुलं व माझ्या बहिणींची मुलं पण खुप नशीबवान आहे.. जे अजूनही आमच्यालहानपणीच गाणं आनंदाने म्हणतात व अनुभवता.. हो.. तेच
“झुक -झुक झुक -झुक अगीनगाडी गाडी.??
धुरांच्या रेषा हवेत काढी…
पळती झाडें पाहू या ..??
मामाच्या गावाला जाऊया… मामाच्या गावाला जाऊया..?
आम्हांला (आईच्या )मामाच्या गावाला जायला खरंच ट्रेन आहे.. या सुट्ट्यामध्ये आम्ही आवर्जून ट्रेन नीच प्रवास करतो…
मामाच्या गावाला जायचं नाव मुलांनी घेतलं की मला आठवते माझं लहान पण… आई तिघी बहिणी.. आईला भाऊ नाही व आम्हांला मामा नाही.. ??बाबा ही एकटेच त्यामुळे आत्या पण नाही ??
मावशी कडे जायचो आम्ही.. पण मामाच्या गावच्या व घरच्या गमतीजमती जेंव्हा इतर मुलं सांगायची तेंव्हा ??वाटायचं आपल्यालाही मामा हवा होता… कसाही का असे ना पण मामाच गाव म्हणायला तर राहील असत न.. आईच्या आई कडे जातं होतो आम्ही.. आजोबां गेल्यावर आजी काही दिवस आमच्या कडे.. तर काही दिवस मावशी कडे राहायची….त्यामुळे ते आजी -आजोबांचं गाव देखील सुटलं.. ???
एक भाऊ असावा असं म्हणतं होतें ते यासाठीच असेल कदाचित.. मुलांना मामा व मामाच गाव असावं म्हणून.. आमची मावशी आम्हांला कपडे घ्यायची…त्यांच्या शेतात जायचो धम्माल करतच होतो पण… म्हणायला नव्हतं न “मामाच्या गावाला जाऊया ” अस..
मुलांचं नशीब चांगल जे त्यांना मामा आहे…
मुलं आई कडे गेली की दिवसभर धिंगाणा घालतात…आजी ओरडते… “झोपा रे किती ऊन आहे” ही मुलं कुठे झोपतात.. दुपारचं झोपायचं तर नाही… सर्व बहीण -भाऊ मिळून.. चंगाष्टक, कॅरम, खेळतात… आणि मी त्यांना आमचा आवडता बैठा गेम सांगते..
गोटे… (खडे )…5खडी… 16खडी ..
थोडावेळ तर मला ही लहान असल्यासारखं जाणवते…              यामुळे खेळांमुळे एक फायदा होतो मामाच्या गावाला मोबाईल पासून मुलं दूर राहतात… TV बघतात पण थोडाच वेळ.. सगळं लक्ष त्यांचं खेळण्यातच असत.. इतकं की जेवणाची आठवण नसते मुलांना.. रागवावे लागते चला आधी जेऊन घ्या म्हणून.. ???
दुपारी आईसगोला आणि कुल्फी वाल्याचे 3…4चक्कर होतातच घराजवळून मग काय… मामा असले घरी तर ठीक नाही तर आजोबांना रोजच काम असते ते पैसे द्यायचं बर का… खाण्याच काम बच्चा पार्टीच पूर्ण करते.???.
संद्याकाळ झाली की मग निघतात यांच्या सायकल (दोनच आहेत गावात ) बच्चा कंपनी 6 मग आलटून पालटून छान दोन तास तरी त्यांच्या सायकलच्या चकरा चालतात… पडतात बरेच दा… मात्र रडत कुणीच नाही.आणि सांगतही नाही आम्ही पडलो म्हणून.. एरवी घरी जरा लागल की तासभर तरी रडत बसतात…
आईकडे घरीच आंब्याच झाड आहे…त्यामुळे मुलं मनात आलं तेंव्हा आंबे तोडून मस्त तिखट -मिठा सोबत खातात..,?? (लिहितानाच तोंडाला पाणी सुटले )अंगण ही बरंच मोठ आहे…या काळातही मुद्दाम बाज (खाट) ठेवलीय बाबांनी… मुलं आले की रात्री छान बाज टाकून… आकाशातील चांदण्या मोजायला लावते मी ???..
मामीनी केलेले पापड… कुरवड्या ओल्या खायला खुप आवडते मुलाना.. शहरात करायला जागा ही नसते व वेळ पण नसतोच.. पैसा भरपूर आहे मग आणतात सर्व रेडिमेड. त्यामुळे त्या ओल्या ज्वारीच्या पापडाची चव चाखायला मिळते ती मामी कडे.. माझ्या मुलांची मामी पण खुप छान आहे..सगळं करते आवडीने अर्थातच आमचीही मदत असतेच..
सर्व बहिणी आणि आमची मुलं एकत्र आली की दिवस कसे जातात कळतच नाही.. मग वेळ येते घरी परतण्याची.. आमचे पाय तर जड होतात परत जाण्यासाठी आणि मुलं रडायला लागतात.. “आणखी काही दिवस थांबूया न ग आई “?? मुक्काम तरी किती करायचा न.. समजावून मुलांना पुन्हा आपापल्या घरी आणावं लागत या प्रॉमिस वर की “पुढच्या वर्षी पुन्हा मामाच्या गावाला येऊया (जाऊया )” कसे बसे तयार होतात मुलं.. ???चला आठवणी लिहिण्याचा नादात विसरलेच….बॅग पॅक करायची आहे…मुलांन सोबत त्यांच्या “मामाच्या गावाला जायचं” आहे न.. तर तुम्ही लागा तयारीला असेल गाव तर..

म्हणून वाटत खरंच एक गाव असावं… त्यासाठी सुचलेलं थोडस ?

एक गाव असावं.. जिथे फक्त ओलावा व प्रेम असावं…
एक गाव असावं… जिथे आजीची सावली आणि आजोबांचं प्रेम असावं…

एक गाव असावं.. जिथे मामी सुगरण… आणि मामा तालेवार असावा..
एक गाव असावं… जिथे सुट्ट्यांचा आनंद मनमुराद लुटता यावा…

एक गाव असावं…जिथे घरापेक्षाही मोठ अंगण असावं…
एक गाव असावं… जिथे जायला मन आसुसलेलं असावं..

एक गाव असावं… जिथे चहुबाजूने हिरवळ व झाडांची रेलचेल असावी..
एक गाव असावं… जिथे शहराचा कागदी पणा व झगमगाट नसावी..

एक गाव असावं…. जिथे सर्व एकत्र कुटुंबात राहावे…
एक गाव असावं… ज्याला माहेर म्हणताना आपोआप डोळे ओले व्हावे..

एक गाव असावं… जिथे जायला उन्हाळ्याचीच वाट असावी…
एक गाव असावं.. जिथे जाताच प्रत्येकाची रीती ओंजळ भरावी.. ?जयश्री

    आजकालची परिस्थिती बघितली तर खरंच किंव येते मुलांची… सुट्ट्या म्हंटल्या की समर कॅम्प… स्विमिंग क्लास.. आणि इतरही बरेच काही… सर्व, मामा..मावशी.. आजी -आजोबां एकाच शहरात राहतात. त्यामुळे सकाळी गेली की रात्री मुलं आपापल्या घरी परत… मग कशाला त्यांना अनुभवायला मिळतो मामाचा गाव व त्याची मज्जा..

माझी मुलं तर खरंच नशीबवान आहे जी दरवर्षी म्हणतात “मामाच्या गावाला जाऊया “.. आणि तुमची…? हे विचारण्याच कारण…शहराची ओढ व त्यामुळे हरवत चाललेल मामाच गाव.. काही दिवसांनी पूर्णपणे लुप्त होईल मामाच गाव.. पुढल्या पिढीला चित्रातून व स्टोरी मधून सांगावं लागेल कस असायचं मामाच गाव ते.
कस वाटलं माझ्या मुलांचं मामाच गाव व मस्ती…ती वाचून तुमचं लहानपण आठवलं की नाही… नक्की सांगा.. आवडल्यास like करा… जास्त आवडल्यास नावासहित शेअर करा.. ??©®जयश्री कन्हेरे -सातपुते ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा