एक तरी भाऊ असावा…

Written by

लहान असो वा मोठा असो
खोडकर असो वा प्रेमळ असो
एक तरी भाऊ असावा…

खोड करून भांडण करणारा
रुसुन बसल्यावर चॉकलेट मागणारा
एक तरी भाऊ असावा…

तुझे सिक्रेट सांगू का आईला
असे बोलून ब्लॅकमिल करणारा
एक तरी भाऊ असावा…

मनातल सर्व त्याच्याशी शेअर
करायला मित्रासारखा
एक तरी भाऊ असावा…

लवकर लग्न करून जा बोलणारा
आणि जाताना एकटाच रडत बसणारा
एक तरी भाऊ असावा…

कधीही पाठीशी उभा राहणारा
तु कशाला टेन्शन घेतेस बोलणारा
एक तरी भाऊ असावा…

लहान असो वा मोठा असो
बापासारखी माया लावणारा
एक तरी भाऊ असावा…

©®प्रीती बडे ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.