एक स्वप्न..

Written by

एक स्वप्न पहिल
येऊन तुझ्या कुशीत..
मंतरलेली रात्र जणू
होती तुझ्या मिठीत..

फेसाळलेला समुद्र आणि
निळ्याशार लाटा..
चांदण्याची रात्र आणि
बेधुंद वाटा..

गळ्याभोवती गुंफलेले
तुझे चांदण्याचे हात..
कानामागुन येत होते
तुझे श्वास माझ्या श्वासात..

अशीच रात्र सरत होती
घेऊन स्वप्नांना कवेत..
मोहरलेले क्षण जणू
रुजत होते मनात..

स्वप्नांच हे वैभव मला
पुन्हा पुन्हा जगावस वाटत..
माझ्यातच वसलेल्या जगाला
मला पुन्हा भेटावस वाटत..
पुन्हा भेटावस वाटत..

निशिगंध..

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा