ए आई ऐकना!!

Written by

ए आई ऐकना!!?

ए आई ऐकना
किती पाप्या घेतेस माझ्या
सारखी बघत काय गं बसतेस
कडेवर काय घेतेस

ए आई ऐकना
कित्ती ती पाऊ लावतेस
चार पाच तीट लावतेस
कित्ती जपतेस नं मला

ए आई ऐकना
आई ती चिंगी बघना
तिला जरा मारना
जरा हळू मार हां

ए आई ऐकना
आत्ता शंभो बासना
डोळ्यात साबू गेलाना
मला उचलून घेना

ए आई ऐकना
थोड्डसं दुधू देना
कोन नाय बघतंय
इवल्लुश देना

ए आई ऐकना
जराशी निजना
मला कुशीत घेना
ये गे गाई करना?
———-गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत