ऐसे कैसे झाले भोंदू

Written by

दाखवूनी वैराग्याची कळा , भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती. राजसत्तेच्या कृपाशिर्वादामुळे धर्मसंस्थेने एकूणच समाजव्यवस्थेच्या विचारसरणीवर आपला पगडा मजबूत करून सामाजिक व्यवस्थेचा पाया कमजोर करण्याचे काम मोठ्या खुबीने केले आहे. देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर जेव्हाहि कटाक्ष टाकला जातो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.एक म्हणजे देशातील धार्मिक विविधता आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धर्मामधील विविधता..आणि हीच धर्मामधील विविधता एकसंध व्यवस्थेत फूट पडण्यास जबाबदार ठरत असते..अनेक धार्मिक विधी , कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्यास स्त्रीवर्ग आणि दलित समाज घटक यांना मज्जाव केला जातो.मंदिराच्या गाभाऱ्यात स्रिया आणि दलितांना प्रवेश अजूनही मिळत नाहीत…अगदी मध्ययुगीन काळापासून असल्या अघोरी प्रथा चालत आलेलय आहे. त्यामुळे या वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे …याच घृणास्पद वृत्तीमुळे सामाजिक विषमतेचे बीजारोपण झालं. देशात परमार्थाचा बाजार मोठया तेजीत सुरु झाला. वर उल्लेख केलेली सामाजिक विषमता या परमार्थच्या मार्केटिंग साठी अत्यंत पोषक ठरली …जोडीला श्रद्धेचा बाजार मांडला गेला. पंथ , जाती ,धर्म , बाबा , महाराज , माँ यांनी देवत्व धारण केले..धर्मसंस्थेच्या अधिपत्याखाली मठ , डेरे , संप्रदाय , संत्सग याचा उदय झाला.. या तथाकथित देवांचे भक्तगण हे दुर्लक्षित झालेल्या समाजव्यवस्थेचे घटक असतात ..सातत्याने नाकारल्या गेल्याच्या भावनेने सामाजिक स्थैर्य , धार्मिक अवकाश शोधायचा केविलवाणा प्रयन्त सुरु असतानाच त कुठल्यातरी संप्रदायाच्या कृपादृष्टीखाली येतात .. आजपर्यन्तच्या सर्वच सरकार रुपी मायबापाने त्यांच्या इच्छांना सुधारणांना तिलांजली देण्याचा पायंडा पाडला आहे..सरकारी उदासीनतेमुळे त्यांच्या जीवनशैलीमध्ये काहीएक फरक पडला नाही आणि हीच गत अजूनही चालू आहे..त्यामुळेच स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा दृष्टीने अद्यात्मिक संप्रदायाच्या छायेत आसरा घेतला जातो . .मुळात सातत्याने वाटेला आलेले कटुत्व , सामाजिक रोषाचा भडका , दशक उलटून देखील त्यांच्या जीवनशैलीमध्ये कवडीमात्र बदल जाणवत नाही. आणि त्यांच्या ह्याच असहाय्यतेचा गैरफायदा बाबा , बुवा , माँ यांच्याकडून घेतला जातोय..आर्थिक , सामाजिक ,शारीरिक शोषण यांना रान मोकळं होत. सामाजिक कर्करोगाचे हे लक्षण आहे..अनेक सामाजिक , राजकीय , मानवी मानसिक कारण यांना बल देत आहेत..काळाच्या ओघात मात्र याचे प्रस्थ वाढण्यास सुरुवात झाली..अशिक्षित वर्गांबरोबर शिक्षित समाज यांना बळी पडू लागला… वैज्ञानिक दृष्ठीकनाचा अभाव देशातल्या या शिक्षित पिढी मध्ये सातत्याने बघायला मिळतो ..विज्ञानाला धार्मिकतेचे जोड नक्कीच असावी पण ती कर्मकांडाधारित नसावी हे आम्ही विसरून गेलो .देशाच्या संविधानामध्ये उल्लेख केलेli विज्ञानवादी विचारसरणी रुजण्यास आम्ही अपयशी ठरलो आहोत. किंम्बहुना ती बिजिगुशी विचारसरणी रुजवण्यास वेळोवेळी तत्कालीन सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. राज्यसत्तेचे अधिष्ठान हे बव्हंशी धर्मसत्तेच्या गणीतांवर अवलंबून असते.. संप्रदाय , मठ , डेरे हे मत पेटीचे पालकत्व मिरवतात.. धार्मिक ठिकाणांकडे वळणारा लोकांचा ओढा राजकारण्यांचे डोळे दिपवून टाकतो. सामाजिक , आर्थिक , राजकीय समीकरण पालटवून टाकण्याचे सामार्थ्य या बाबांच्या एका आदेशामध्ये असते…सत्तेच्या लालसेपोटी मतांचा जोगवा मागण्यासाठी राजसत्ता हि धर्मसत्तेपुढे लोटांगण घालते..राजसत्ता धर्मसत्तेच्या हातातली बाहुली झाल्यामुळे न्याय व्यवस्था , सामाजिक व्यवस्था रक्तबंबाळ झाली आहे हे सत्य आहे. राज्यसंस्थेचे सार्वभौमत् धोक्यात आलेले आहे ..व्यवस्थेवरील हे हल्ले कमी होते कि काय म्हणून प्रस्तापित सत्ताधार्यांनी तर वैज्ञानिक घटनांचे श्रेय पुराणातील भाकड्कथाना देऊन परिसीमा घातली आहे. बुद्धिवाद , वैज्ञानिक दृष्टीकोन यांची जागा कर्मकांड,अंधश्रद्धेनेने घेतली..म्हणूनच आमचा प्रवास पुन्हा मध्ययुगीन काळाकडे सुरु झाला आहे का हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग अश्याच वेळी याच सुधारण्याच्या उलट्या चाकांना पर्यायाने बाबांच्या प्रस्थापित मुळांना हादरा देण्याचा प्रयन्त जेव्हा केला जातो तेव्हा धर्मसत्तेचे उग्र रुप समोर येते.दिवसा-ढवळ्या अश्या लोकांची हत्या घडवून आणली जाते..परंतु तरीही लोकप्रियतेचा , संपत्तीचा उन्माद सर्वांना पुरून उरतो.राम रहीम विरुद्ध आता बेबींच्या देठापासून वृत्तांकन करण्या बहुतांश माध्यमांनीच आधी ह्याना ग्लॅमर मिळवून दिले आहे हे कुणीही नाकारू शकत नाही .. काही माध्यमांचा अपवाद सोडला तर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभात प्रवाहाबरोबर चालण्याची वृत्ती निर्माण झाली आहे..त्यामुळे व्यवस्थेची गळचेपी तशीच सुरु राहते.. पण तिकडे बाबा राम रहीम ला उशिरा का होईना न्यायव्यवस्थेने सुनावलेली कठोर शिक्षा व्यवस्थेवरील विश्वास दृढ करते.परंतु देशभर पसरलेल्या विस्तृत जाळ्यामधला हा केवळ एकाच दुवा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय. राम रहीम गेला पण डेरा अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. एक डेरा गेला तर वंचित घटक दुसरा दरबार शोधतील ..गोरखधंधा तसाच सुरु राहील …ओह माय गॉड चित्रपटात म्हटल्याप्रमाणे “INDIANS ARE NOT GOD LOVING PEOPLE , THEY ARE GOD FEARING PEOPLE ” त्यामुळेच लोकांच्या मनात असलललेया बाबा बुवांचा हे भीतीयुक्त प्रस्थ जोपर्यन्त नष्ट होणार नाही तोपर्यंत सामाजिक व्यवस्थेचा बळी हा असाच दिला जाणार आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा