ऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस

Written by

आपल्यापैकी बरेच जण असे विचार करतात की घरी बसून अथवा कमीत कमी भांडवलात करता येण्याजोगे बिझनेस कोणते आहेत.

बाहेर राज्यातील लोकांना याबाबत माहिती असल्याने ती लोकं या क्षेत्रात अग्रेसर आहेत.

आपण तंत्रज्ञानात मागे राहू नये म्हणून ही माहिती..

आपल्याला डेटा एन्ट्री, टायपिंग, कोडींग किंवा अगदी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी कामाच्या संधी असतात..

 

 

इंटरनेट च्या जमान्यात असे खूप सारे platform आहेत जिथे आपण online कामं करून पैसे कमवू शकू.

त्यासाठी आपल्याला यापैकी त्यापैकीच काही साईट्स खालीलप्रमाणे:

worknhire.com

ही एक local site आहे ज्यात खूप सारे projects पोस्ट होत असतात. भारतातील अनेक कंपन्या त्यांची छोटी मोठी कामं फुल टाइम workers पेक्षा कॉन्ट्रॅक्ट वर करून घेणं पसंद करतात.

freelancer.com

या साईट वर देशो विदेशातील लोकं त्यांना लागणारी कामं पोस्ट करतात. या साईट चे वैशिष्ट्य असे की अत्यंत गतीने काम दिली आणि घेतली जातात. प्रत्येक सेकंदाला नवीन काही प्रोजेक्ट ची enquiry आपल्याला दिसेल.

upwork.com

ही सर्वात टॉप ची साईट असून या साईट वर सहसा लवकर signup करता येत नाही, त्यासाठी आपले स्किल आणि अनुभव ताकदीचा हवा. पण एकदा आपली प्रोफाइल approve झाली की मोठमोठ्या देशातील प्रोजेक्ट्स आपल्याला मिळू शकतात.

fiverr.com

या साईट वर आपल्याला आपला portfolio म्हणजेच आपण केलेलं काम upload करून आपली प्रोफाइल बनवावी लागते, एक प्रकारे आपल्या स्किल्स ची जाहिरात आपण करतो आणि योग्य customer ला आपल्या पर्यन्त पोहोचता येते.

guru.com

या साईट वर graphic design आणि इतर काही प्रोजेक्ट्स ला डिमांड आहे.

Online काम सुरू करण्यापूर्वी खालील काही महत्वाच्या गोष्टी:

१. आपण स्वतःची माहिती अचूक आणि चांगल्या प्रकारे represnt करावी.
२. आपण पूर्वी केलेही कामे sample म्हणून जोडावे.
३. कंटेंट writing, डाटा एन्ट्री, c#, c++, java, moodle, whiteboard अनिमेशन, लोगो design पासून ते powerpoint प्रेझेन्टेशन पर्यंत प्रोजेक्ट्स आपल्याला मिळू शकतात.
४. “Bid” option: bid म्हणजे दिलेल्या प्रोजेक्ट वर बोली लावणे, तुम्ही जर नवीन असाल तर कमीत कमी किंमत लावा.bid करताना ते काम तुम्ही किती दिवसात, किती पैशांत कसे कराल हे विचारले जाते.
५. एखादे काम दिलेल्या deadline मधेच पूर्ण करावे, ही कामं अत्यंत professional असतात, इथे कुठलीही कारण चालत नाही.
६. Client सोबत बोलताना व्यवहारी भाषा असावी, किरकोळ, वायफळ आणि सतत प्रश्न विचारू नये.
७. Client कडून escrow मधूनच पैसे मागावे, त्याने म्हटले की बँक account वर देतो तर ते टाळावे, नाहीतर पैसे बुडतील.
Escrow म्हणजे project सुरू व्हायचा आधी क्लायंट पैसे site वर टाकतो, जोवर काम approve होत नाही तोवर ते दोघांनाही काढता येत नाही.
८. काम होणार असेल, वेळ असेल आणि आपल्याला विश्वास असेल तरच bid करावे.
९. आपल्याकडे कुठलेही स्किल नसेल तर इंटरनेट वरून आपण ते शिकून त्याचे sample बनवू शकतो आणि मग प्रोजेक्ट साठी bid करू शकतो.
१०. IT झालेल्यांसाठी या साईट्स वर प्रचंड संधी आहेत.
११. दुसऱ्या देशातील पैसे येताना जास्त असतात. उदा. अमेरिकेचा प्रोजेक्ट असेल तर डॉलर मध्ये, ऑस्ट्रेलिया चा AUD (australian डॉलर) मध्ये असतात, त्यानुसार त्या प्रोजेक्ट साठी जास्त बोली लावू शकतो.

या क्षेत्रातील अनुभवावरून मी ही माहिती देत आहे, कोणाला काही अडचणी असल्यास कंमेंट मध्ये विचारावे.

Article Categories:
तांत्रिक

प्रतिक्रिया व्यक्त करा