ओळख मानवा तुझी चूक काय…?

Written by

जेव्हा जगात मानवाचं अस्तित्व निर्माण झालं. तेव्हा पासुनच मानवाला निसर्गावर अवलंबून रहावे लागले. मानव जातीने जशी-जशी प्रगती केली तशी-तशी निसर्गानेही त्याला आपले मानत त्याला हवे तसे वातावरण देऊ केले. पुढे चालून मानवाची एक अशीही पिढी आली, जी निसर्गावर त्याच प्रमाणात प्रेम करू लागली ज्या प्रमाणात निसर्ग त्याच्यावर करत असे.
हळूहळू काळ बदलत राहीला. मानवाच्या गरजा बदलत राहिल्या. मानव जातीने अफाट प्रगती करत विज्ञानावर प्रभुत्व मिळविले. विज्ञानाच्या मदतीने अनेक चमत्कार घडू लागले. मानवाला ज्या पद्धतीचे सुखं हवे मानव ते विज्ञानाच्या मदतीने मिळवायला लागला. गावाची शहरे झाली. शहरांची महानगरे झाली. या पद्धतीने मानवाने त्याच्यावर आई प्रमाणे प्रेम करणार्या निसर्गाची साथ सोडत विज्ञानाचा हात पकडला. (खादीम सय्यद ©)
विज्ञानाच्या मदतीने मानवाने खूप प्रगती साधली चंद्रा पर्यंत झेप घेतली त्याच्याही पलिकडे पोहोचला. हे सर्व घडत असताना मात्र तो आई रुपी निसर्गाला विसरला. कितीतरी दिवस कितीतरी वर्ष तो त्या निसर्गाला स्वतःच्या सुखासाठी हानी पोहोचवत राहिला. निसर्गाला मानव लेकराप्रमाणे असल्या मुळे निसर्ग ही ते शांतपणे सोसत राहिला. स्वतःची घरे बांधण्यासाठी मानव जंगले नष्ट करत राहिला. अनेक नदीच्या पात्रावर कब्जा मिळवत राहू लागला. कितीतरी वर्ष समुद्रात कितीतरी कचरा टाकत राहिला.
आता मात्र ते निसर्गाला सहन होत नसावे. म्हणून तो मानवाच्या सिमेंटच्या जंगलावर राग व्यक्त करत असावा. पुराचे रूप घेऊन अनेक शहरात स्वतःच राज्य गाजवत असावा. तो सांगत आहे, तुम्ही अतिक्रमण करत आहात माझ्या जागेवर. निसर्ग दाखवून देत आहे स्वतःची ताकद तो काय करू शकतो. तो हाहाकार माजवून सांगतोय. आतातरी ओळख मानवा तुझी चूक काय ? तो हाक देऊन सांगतो आहे आतातरी सुधर मानवा.(खादीम सय्यद ©)
( मुंबईत घडलेल्या प्रकाराची एक बातमी वाचली जवळ जवळ 188 मेट्रिक टन कचरा मुंबईच्या किनारी समुद्राने बाहेर फेकला आहे. तुम्ही इतक्या वर्षात त्याच्या पदरात टाकलेला सर्व कचरा समुद्राने मात्र एका दिवसात तुम्हाला परत दिला. ही बातमी वाचून मन खुप बेचैन झाले आहे. पुढील काही वर्षात आपल्या ह्या जगाचा आपल्या मानवजातीचा या राग व्यक्त करणाऱ्या निसर्गापुढे निभाव लागेल का ? हा प्रश्न पडला आहे. म्हणून व्यक्त व्हावेसे वाटले)
खादीम सय्यद ©

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत