औलाद….

Written by

 

औलाद .

2 महिन्याअगोदर मला एक माझी मैत्रीण खुप दिवसांनी भेटली ती एकदम बारीक, चेहरा काळसर आणि कुठल्यातरी विचारात आहे अस वाटत होती  …..मि माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला तिच्या बद्दल विचारलं तेव्हा कळलं की तिच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत पण तिला अजुन बाळ नाही , मि डॉक्टर या नात्याने तिच्याजवळ गेलो आणि तिला शांत बसवुन मि तिला मंटोची एक कथा  सांगायला सुरू केली .
कथेमध्ये जुबेदा नावाची एक 25 वर्षाची मुलगी होती तीच वय जास्त वाढत असल्यामुळे तिच्या वडिलांनी तीच लग्न एका लग्नं झालेल्या व्यक्तीशी करून दिल , त्या व्यक्तीची पहिली बायको मरण पावली होती . जूबेदाच्या नवऱ्याचं नाव इल्मूद्दिण होत .
काहीदिवसांनी जुबेदाच्या वडिलांच निधन झाल त्या मुळे तिची आई घरी एकटी राहू लागली म्हणून जुबेदा तिला सोबत घेऊन आली .
तिची आई आता इल्मूद्दिण आणि जुबेदा यांच्या सोबत राहू लागली .
एकवेळा आई जूबेदाला म्हटली की मला तुझ्या घरी येऊन 10 महिने झाले ,मि स्वतः जवळचा एक रुपयाही खर्च नाही केला, मला तुझ्या वडिलांची संम्पत्ती ही तुझ्या नवऱ्याला दया वाटत पण मि ही संम्पत्ती माझ्या नातवाच्या नांवाने करेल,  पण तुझ लग्न होऊन दोन वर्ष झाली तरी तुला बाळ नाही .
जूबेदाच्या आईने तिला डॉक्टर ,तांत्रिक मांत्रिक आणि इतर बाळ होण्यासाठी उपाय चालु केले ….पण त्या उपायांचा काही फरक पडत नसे .
त्यामुळे जूबेदा खुप कंटाळली आणि बाळ नसल तर काही होत नाही अशी म्हटली ,त्यावर तुला तुझा नवरा सोडुन देईल , बाळा शिवाय स्त्रीला शोभा नसते  अस म्हणत तिची आई तिच्यावर खुप चिडली.
त्यादिवसानंतर आपला नवरा सोडुन जाईल , बाळा शिवाय स्त्री ला किंमत नसते या गोष्टींचा जूबेदा सारखा विचार करू लागली …तिला बाळा चे स्वप्न पडू लागले , ती हजारो मेलेल्या बाळात झोपली आहे अस तिला दिसत असे तिला सारखा बाळ रडल्या सारखा आवाज यायला लागला .
एकवेळा तिच्या नवऱ्याने तिला पैसे आलमारीत ठेवण्यासाठी दिले ति दुध गरम करत होती तिने ते पैसे दुधात टाकले तेव्हड्यात तिचा नवरा तिथं आल ,पैसे दुधात असल्यामुळे तो तिला विचारू लागला तेव्हा ती हसते आणि बघा आपल्या मुलाने केल , खुप बदमाश झाल आहे आपल बाळ अस ती म्हटली या वाक्या नंतर तिचा नवरा विचारत पडला आपल्याला तर अजुन पर्यंत बाळ नाही तरी जूबेदा अशी कां बोलत आहे या गोष्टीच्या तो विचार करु लागला तिला  काहीतरी मानसिक त्रास होत आहे हे त्याच्या लक्षात आल .
एकवेळा इल्मूद्दिण बाजार करायला बाहेर गेला असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला त्याचा मित्र खुप नाराज होता इल्मूद्दिण ने त्याला नाराज असण्याच कारण विचारलं त्याचं मित्र म्हटला की तो ज्या व्यक्तीसोबत प्रेम करतो ती व्यक्ती त्याच्यामुळे गर्भवती झाली आहे , खुप प्रयत्नं केले पण गर्भ नष्टं झाला नाही म्हणुन काळजी लागली .
त्यावर लगेच इल्मूद्दिण म्हटला की गर्भ नष्टं करू नको तो वाढव आणि नंतर मला दे मि त्याला वागवेल त्याचा मित्र त्यावर तयार झाला .
इल्मूद्दिण घरी आला त्यांने जूबेदाला ती गर्भवती आहे अस भासवायला सुरू केल ,तिला पण ते खर वाटु लागल ती 6 महिन्यांची बाळंतीण असल्याप्रमाणे वागु लागली .
इल्मूद्दिण च्या मित्राला बाळ झाल्यानंतर रात्री इल्मूद्दिणने ते बाळ जूबेदाच्या जवळ ठेवल आणि तिला उठवु लागला , जूबेदा बाळ बघुन खुप आनंदी झाली तिने बाळा ला जवळ घेतल .
रात्री सगळे जन झोपले  सकाळी 5 वाजता बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला त्यामुळे इल्मूद्दिण उठला त्यांने जूबेदा ला बघितल तर ती पुर्ण रक्ताने माखलेली होती ती तिची छाती  चाकूने कापत होती .तो गडबडीने तिच्या जवळ गेला तिला काय झाल विचारू लागला . तेव्हा ती म्हणाली बाळ दुध चोखत होता पण मला दुधाच येत नव्हत मि कशी आई आहे जी बाळाला दुध पण देऊ शकत नाही …..
एव्हडंच बोलुन ती तिच रक्ताने भरलेल बोट बाळाच्या तोंडात देउन मरून गेली ……..
ही कथा ऐकुन माझी मैत्रीण रडली आणि मि तिथुन निघालो…….तसा मि स्वतः लग्न या विषयाच्या विरोधात आहे .
एखादया स्त्रीला बाळ नसलं की खरच तिची किंमत नाहीशी होते कां ?
लग्नं न करता बाळ झाल तरी स्त्रीच दोषी , आणि लग्न केल्यावर बाळ नाही झाल तरी स्त्रीच दोषी ……
कीती विचित्र खेळ आहे हा सर्व .
आपल्या सभोवताली एखादया स्त्रीला बाळ नसलं तर आपला तिला बघण्याचा द्रुष्टीकोन बदलतो, ती कितीही मोठ्या पदांवर असली तरी ही आपण तिला दयेच्या नजरेनं बघतो काही तर व्देषानेच बघतात .
मुख्यता स्त्रीच्या या दुखण्यावर तिला एखादया पुरुषापेक्षा दुसरी स्त्रीच जास्त वाईट बघते .
आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा स्त्री ने स्वतः घ्याचा असतो कारण ते तिच स्वतःच आयुष्य असत जे एकदाच मिळत ….लोकांसाठी निर्णय घ्यायला आयुष्य काही  सारख सारख मिळत नसत हे लक्षात असाव .
मुळात बाळाला जन्म द्यावा किंवा नाही हा देखील तिचा स्वतःचा निर्णय असतो , पण समाजाने आणि स्वतः तिने स्वतःला निर्णय घेण्यायोग्य अजुन मानलेलच नसत .
यांवर, “सिमोन” ही लेखिका म्हणते की
“Womens are not Born, they made.” ……
म्हणजे स्त्री जन्मतः नाही तर ती घडवली जाते , आणि हे तिच वाक्य खर आहे .
कथेमध्ये जूबेदा गर्भवती होऊ न शकल्यामुळे तिला मानसीक त्रास सुरू झाला होता पण तिच्या नवऱ्याने  तिला समजुन न सांगता तिला आनंदी ठेवण्यासाठी खोट्या रित्या गर्भवतीची भावना देण्याचा प्रयत्न केला ………पण या ऐवजी त्यांने फ़क्त तिला विश्वासात घेऊन समजुन सांगितल असत तर जूबेदा जिवंत असती या मध्ये जूबेदाच्या आईची चुकी आहे अस नाही कारण तिला या व्यवस्थेनेच तस घडवलं आहे .
एखादी स्त्री ही बाळ होत नसल्यामुळे समाजाच्या भीतीने मेलेली असते ती जिवंत असते फ़क्त तिला विश्वास असलेल्या लोकांमुळे  ……
त्यामध्ये तिला सर्वात जास्त विश्वास असतो तिच्या साथीदारामध्ये …..तो साथीदार तिचा नवरा असु शकतो किंवा ती स्वतः स्वतःची साथीदार असु शकते …..
गरज असते फ़क्त साथीदारांने तिला स्वतः आपलंस  करण्याची ……….त्यांने तिला आपलंस मानल्यावर तो दोन चेहऱ्यानां  स्मित हास्य आणि आयुष्य देऊ शकतो …..एक स्वतःला आणि एक तिला …..

धूप हो, छाया हो, दिन हो के रात रहे
दर्द की शाम हो या, सुख का सवेरा हो
सब गवाँरा हैं मुझे, साथ बस तेरा हो
जीते जी, मर के भी, हाथ में हाथ रहे
तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ रहे……

आज माझी ती मैत्रीणी परत बागेत दिसली खुप खुश दिसत होती तिचा पती देखील तिच्या सोबत होता …….पण ते दोघंच होते पण खुप आनंदी वाटत होते …….
मि माझ्या मैत्रीणच्या पतीला एकावेळा फोन लावुन जूबेदाची कथा सांगितली होती ……हे माझ्या मैत्रीणीला माहीत नाही .
त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद बघुन माझ्या चेहऱ्यावर आनंद आला ……………
त्या दोघांना Disturb न करता मि तिथुन “तेरा मेरा साथ रहे” हे गाणं म्हणत चालता झालो ……

लेखन-डॉ.राहुल दासु इंगळे .

[email protected]

Instagram.com/rahuldasuingle

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.