कणखर पुरुष

Written by

©सरिता सावंत भोसले

कधी तू  प्रेमाचा अथांग सागर

तर कधी तू क्रोधाचा डोंगर

कधी तू आईच अल्लड पोर

तर कधी तू अवखळ

लावी जीवाला घोर

कधी तू प्रेमळ नवरा

तुझ्या बाहुपाशात तिचा

जन्म सजतो सारा

कधी तू संरक्षक भाऊ

तुझ्याशिवाय म्हणे ती सांग कोणाशी भांडू

कधी तू असणारा बेफिकीर

सहनशील बाप होई निरंतर

तुटलेले वाहन घालून पायाशी

लेकरा ओळख करून देई जगाशी

आसवे गिळून,चिमटा काढून पोटाशी

हास्य आणी त्याच्या ओठाशी

हळवा कोपरा लपवून हृदयाशी

कणखर पुरुषाची भूमिका तू वठवी

संकटे घेऊन उराशी ‘मी आहे ना’

म्हणत तू भक्कम आधार होशी

खरच तू आहेस निःशब्द भावनांनी दडलेला

अभिमान,आत्मसन्मान,गर्वानी नटलेला

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा