कमाल 

Written by

 

कमाल

©️ अंजली मीनानाथ धस्के

शालेय मैत्रिणीचा अचानक फोन आला..

ती …  कशी आहेस?

मी. .. मजेत … तू?

ती … ऑफिस, घर मुलं यात वेळ  जातो सगळा …. तू काय करतेस? जॉब वगैरे काही??

मी… काहीच नाही

ती ..kay? एवढी शिकलीस यार तु आणि जॉब नाही करत? मन घट्ट करायचं आणि मुलांना पाळणाघरात ठेवायचं …. आधी त्रास होतो.. मग होत सगळ सुरळीत…. उलट मुलं घरी कंटाळतात …. त्यांना ही नंतर पाळणाघर आवडायला लागतं…. लहान असतानाच ठेवायचे त्यांना मग जास्त त्रास नाही देत . आपलं शिक्षण वाया नाही घालवायचं

मी….,,???????????

दुसऱ्या दिवशी मित्राचा फोन आला

तो … Hi ओळखल का?

मी… हो रे… बोल कसा आहेस?

तो .. मी मजेत.. तू काय करतेस सध्या?

मी…????? (आधीचा अनुभव होताच.. त्या मुळे यावेळस उत्तर काय द्यावं हा विचार सुरू)

तो… अग .. काय…. काय करतेस सध्या?

मी….. कमाल करते

तो…? काय??? म्हणजे काय??

मी… कमाल म्हणजे काहीच नाही

तो..??????????????

मी … अरे शाहरुख खानच्या वडिलांनी त्याला सांगितले की,” जे काहीच करत नाही ते कमाल करतात”(हम तुम्हारी उम्र के थे तो पहाड चढ कर जाया करते थे … तुम चढ सको तो चढ लो … वरना जो कुछ नहीं करते ……. वो कमाल करते हैं. )   …कालच ऐकलं मी त्यांच्या एका इंटरव्ह्युव मधे….

तो…???? भारीच आहेस तू

मी… ???

सांगायचं तात्पर्य असे की……

जो कुछ नंही करते…. वो कमाल करते हैं!

स्वतः चे कुटुंब आणि छंद यावर लक्ष केंद्रित करा.

आपले आयुष्य आपण कसे जगावे … आपला प्राधान्य क्रम काय असावा हे आपण ठरवायचे . इतरांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. कोणालाही त्यासाठी एक्स्प्लानेशन द्यायची गरज नाही. आपण काहीच करत नाही म्हणून आपल्याला कोणी कितीही बोल लावले तरी आपण ” कमाल” करत असतो हे कायम ध्यानात ठेवायचं आणि आत्मविश्वासाने वावरायचं??

सोबत माझी एक… ” कमाल” रांगोळी पोस्ट करत आहे.

anjali-rangoli.blogspot.com…. इतर लिखाण आणि रांगोळ्या या लिंक वर उपलब्ध आहेत.

जेव्हा ” कमाल” करत असाल तेव्हा नक्की भेट द्या ????

©️ अंजली मीनानाथ धस्के

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा