कर्ज या विषयावरील लेख

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#कर्ज

स्वतः कडे पैसे नसले की दुसऱ्याकडून घेणे याला कर्ज किंवा ऋण म्हणतात.शेतकरी बीबियाणे,जनावरांची खरेदी,शेतीचं साहित्य यासाठी कर्ज घेतो.
नोकरदार माणसाच्याही प्राथमिक गरजा त्याच्या कमाईतून पुऱ्या होतात पण घर,वाहन,मुलांच उच्च शिक्षण, मोठं आजारपण यासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं.
उद्योगधंद्यांसाठी कर्ज घेतात.
काही ठिकाणी लग्नात वारेमाप खर्च करतात.अप्रत्यक्षरित्या हुंडा देतात.यासाठी मुलीचा बाप कर्ज काढतो.कर्जाचे हफ्ते दरमहा बसतात.
अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज घेणं खरंच टाळलं पाहिजे. आपण बँका,पतपेढ्या,सरकारी संस्थाकडून कर्ज घेतो.कर्ज देणाऱ्यास सावकार किंवा धनको तर घेणाऱ्यास ऋणको म्हणतात.बँक जेंव्हा कर्ज देते तेंव्हा ऋणको त्या कर्जाची परतफेड करेल अशी हमी देणाऱ्या माणसाला हमीदार म्हणतात.काही कारणात्सव कर्ज परतफेड केली नाही तर बँकेकडे आपण तारण म्हणून ठेवलेली मालमत्ता बँक जप्त करते व ती विकून कर्जवसूली करते.
कर्ज काढण्यासाठी ग्राहकाला अर्ज भरावा लागतो त्यात अर्जदाराची केवायसी,जामिनदाराची केवायसी(सत्यता पडताळणी),मालमत्तेचे पुरावे,नोकरीची कागदपत्रे,उत्पन्नाचे पुरावे,तारण ठेवलेल्या मालमत्तेचे विवरण यांची माहिती भरावी लागते.मग अर्ज मंजुर झाले तर बँक तसे पत्र देते व ग्राहकाला किती कर्ज देता येईल,ते कधीपर्यंत भरावे लागेल,व्याजदर,हफ्ता यांची माहिती देते.त्या अटी ग्राहकास मान्य झाल्या की बँक त्याला कर्ज देते.
अनाठायी घेतलेले कर्ज हे खरेच टाळले पाहिजे.कारण कर्जाचे हफ्ते भरता भरता सोलवटून निघायला होते.ते भरता आले नाही की मग लोक आत्महत्या करतात.त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडतात.म्हणून आवश्यक तेवढेच,आवश्यक तेंव्हाच कर्ज घ्यावे.उगा मोठ्या लांबड्या गाड्या घेण्यासाठी,दागदागिने घेण्यासाठी, मोठमोठे समारंभ करण्यासाठी कर्ज घेऊ नये.कर्जाचे हफ्ते भरताना नाकीनऊ येतात.??

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत