कर्ज

Written by
  • 3 आठवडे ago
  • आज सकाळचा पेपर हातात घेतला आणि म्हटलं पाहू तरी आज काय नवीन बातमी आलीये,,, म्हणून पेपर च्या पहिल्याच पानावर बातमी नितेश चौधरी यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली ,,,,,आता मात्र सकाळपासून शांत असलेलं माझं डोकं गरगरायला लागलं ,,,मला समजत च नव्हतं काय होतंय नक्की कुठे तरी काहीतरी चुकलंय कारण नितेश इतका सकरतमी मुलगा आत्महत्या कसा काय करू शकतो ,,,, या दिवसांमध्ये माझा न नितेश चा काही कॉन्टॅक्ट नव्हता पण त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या वर्गातील अतिशय हुशार मुलगा ग्रॅजुअशन आम्ही सोबत च केलं नंतर माझं लग्न झालं आणि माझा सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट कमी झाला,, नितेश नि नोट्स काढल्या शिवाय आमचा अभ्यास पुढे धकायचा नाही अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाचा असलेला नितेश आज एकदम या जगातून नाहीसा होतो यावर माझा विश्वास बसेना ,,,, मला शांत बसवेना काय करू करू अस झालं शेवटी मी नेमका काय झालं हे शोधायचा प्रयत्न करू लागले,,,, अचानक माझ्या लक्षात आलं कि त्याचा आत्ये भाऊ म्हणजे वैभव  माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मध्ये आहे ,,, माझं लग्न ठरलं तेव्हा नितेश नि च हि गोष्ट मला सांगितली होती ,,मग मी माझ्या नवऱ्या कडून वैभव चा नंबर मिळवला आणि एक दिवस संध्याकाळी धाडस करून त्याला कॉल केला ,,, आणि नितेश बद्दल त्याला विचारलं तो जे सांगत होता त्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागलि ,,,तो सांगत होता नितेश कुठल्यातरी ऑनलाइन लॉटरी च्या मागे लागला होता त्याला दिवसरात्र लॉटरी च दिसायची आणि त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याला वाटायचं कि आपण पण श्रीमंत व्हावं ,,, झट पट श्रीमंत होण्याच्या नादात त्यानं खूप लोकांकडून कर्ज घेतल एकदा दोनदा त्याला लॉटरी लागली मग त्याने मोठा डाव खेळायचा ठरवलं खूप लोकांकडून कर्ज घेतल आणि त्या लॉटरी त खुप पैसे लावले आणि शेवटी व्हायचं तेच झालं लॉटरी हरला नितेश आणि जिवनात हि हरला,,,, मला खूप वाईट वाटलं नितेश साठी नितेश नि आपल्या हुशारी वर आणि मनगटावर विश्वास ठेवायला हवा होता ,,,, या संकटातून बाहेर पडू शकला असता ,,, त्या मृगजळ ने त्याचा घात केला ,,,
Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत