कर्म ( बुमरँग )

Written by
  • 4 महिने ago

कर्म ( बुमरँग )

सानवी आपल्या मैत्रिणींसोबत गोवा ट्रिप साठी निघाली होती. सर्व bike वरून निघाल्या, सर्वजणी कश्या डॅशिंग. कॉलेज नंतर 2 वर्ष job करत असताना आज सर्वजणी finally निघाल्या. सकाळी 7 च्या सुमारास एका घाटाच्या सुरुवातीला एका टपरीवर त्या चहा पिण्यासाठी थांबल्या. सकाळीची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. चहा पीत असतानाच एक मोठा आवाज झाला. काहीतरी जोरात आदळल्याचा. सर्वजणी त्या आवाजाच्या दिशेने धावल्या. समोर एक स्कूल बस एका मोठ्या झाडावर आदळली होती. त्या सर्वजणी त्यांच्या मदतीला धावल्या. धडक झाल्यामुळे डिझेलची टाकी फुटून बस ने आग पकडली. बस मधल्या काही मुलांना जखमा झाल्या होत्या, तर काही मुले होरपळत होती. त्या सर्वजणी एक एक करून सर्व मुलांना बाहेर काढू लागल्या. सान्वी ने टपरीवाल्याला आसपास केळ्याचा पाने असतील तर आणायला सांगितली आणि दुसऱ्या एका मैत्रिणीला पोलीस आणि ऍम्ब्युलन्स ला call करायला सांगितलं. बस ड्राइवर ला सुद्धा गंभीर मार लागला होता. बस ने आता मोठा पेट घेतला होता. बाहेर आणलेल्या सर्व भाजलेल्या मुलांच्या जखमा केळ्याच्या पानने बांधल्या. तेवढ्या बस मध्ये एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. सान्वी बस कडे धावली सर्व तिला थांबवत होते कारण बसने पूर्णपणे पेट घेतला होता. त्यासर्वांना न जुमानता सान्वी आता शिरली आणि त्या मुलीला अलगद उचलून बाहेर आली. तिलाही बऱ्याच ठिकाणी भाजलं होतं. बस मधून बाहेर पडून 10 पाऊल ही चालली नसेल तर बस चा मोठा स्फोट झाला. एकंदरीत अगदी थोडक्यात ती बचावली. नंतर पोलीस आले ऍम्ब्युलन्स आली. जखमी मुलांना हॉस्पिटल मध्ये नेण्याची प्रोसिजर सुरु झाली. सान्वीची एक मैत्रीण तिच्या वर रागावते म्हणते, ” आपल्या हातात होती तेवढी मदत आपण केलीच ना, पण आपला जीव धोक्यात घालून मदत करायची काय गरज होती.? तूला काही झालं असतं तर….?? ”
सान्वी, ” अगं असं बोलून कसं चालेल? अश्यावेळी असा विचार प्रत्येक जण करू लागला तर? उद्या तूला किंवा मला किंवा आपल्या घरच्यांच्या बाबतीत असं झालं तर? आणि आसपास असणाऱ्याने असंच विचार केला तर? किंवा समज आज त्या मुलीच्या जागी माझीच मुलगी असती तर मी असा विचार केला असता का? नाही ना? हे बघ आपण केलेलं कर्म हे एक बुमरँग सारखं असतं ते फिरून आपल्याकडे परत नक्की येतं. चांगला केलं तर चांगला आणि वाईट केलं तर वाईट……….. ”

सहा वर्षानंतर…….

सान्वी आपल्या चार वर्षाच्या मुलीला आणायला शाळेत जाते. आणि परत येताना दुपारी सामसूम रस्त्यावरून जातं असताना 5-6 जण त्या दोघीना पकडतात आणि सान्वीच्या मुलीला जबरदस्ती एका गाडीत बसवण्याचा प्रयन्त करत असतात. सान्वी खूप आरडाओरडा करते. तिथून जाणारा एक माणूस तिला आवाज ऐकतो आणि मदतीला येतो. त्यांच्यात मारामारी होते. तो माणूस ही खूप जखमी होतो पण तो पर्यंत यासर्वांमुळे लोक धावत येतात आणि त्यांना बघून ते गुंड पळून जातात. सान्वी त्या माणसाला हॉस्पिटल मध्ये admit करते. पोलीस येतात आणि चौकशी सुरु होते. त्या माणसाची जबानी चालू असताना सान्वी तिथेच असते. पोलीस त्याला विचारतात, ” 5-6 जण होते ते तरी तुम्ही जीवाची पर्वा न करता लढलात. सध्याची परिस्थिती अशी आहे की कोणी असिसिडेन्ट झाला तरी मदतीला थांबत नाही. ” त्यावर तो माणूस म्हणाला, ” साहेब फार पूर्वी मी सुद्धा असाच होतो. पण 6 वर्षांपूर्वी माझ्या भाचीच्या बसचा बस चा असिसिडेन्ट झाला होता. एक मुलगी पेटत्या बस मध्ये माझ्या भाचीला वाचवण्यासाठी गेली. बाहेर आल्यावर त्या मुलीची मैत्रीण रागावली होती तिच्यावर पण ती म्हणाली होती माझी मुलगी असती तर असंच सोडून गेली असती का? त्यांच्या हे बोलणं झालं तेव्हा माझी भाची त्यांच्या मागेच होती. आम्हाला नंतर त्यांचे आभार मानायची संधी सुद्धा नाही मिळाली. पण नंतर मी बदलो. आज मला या छोट्या मुली मध्ये माझी भाची दिसली.”

त्या माणसाचं बोलणं ऐकून सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती विचार करू लागली. खरंच माझं कर्म बुमरँग सारखं परत माझ्याकडे आलं.

समाप्त………

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.