कलंक प्रेमाचा भाग शेवटचा

Written by

 

 

 

 

 

प्रिया ऋषीला दारासमोर अस बघतच राहिली. तोच शेजारील साने काकु कुठून तरी येऊन स्वतःचा दरवाजा खोलत उभ्या होत्या. काय ग प्रिया आज कामावर नाही गेलीस.
प्रिया : नाही काकु आज सहज सुट्टी घेतली.
साने काकु : अग हे तुझा पत्ता मला विचारत होते. मी म्हटलं त्यांना तुला कोणी भेटणार नाही. तरी वर जाऊन बघतो म्हणाले म्हणून नशीब. ( साने काकु ऋषीकडे हात दाखवत म्हणाल्या) आणि काय ग रोहन आहे कुठे. कधीच फोन लावते त्याला. उचलतच नाही.. अग महत्वाचं काम होत ग त्याच्याकडे.

प्रिया : अहो मीटिंगमध्ये असतील काकु ते. आता झाले असतील फ्री. तूमचे मिस कॉल बघून ते करतील तुम्हाला फोन
साने काकु : हम्म बघते तरी मीच लावून. तू बघ पाहुण्यांना मी रोहनला फोन लावून बघते.

बाहेर तमाशा नको म्हणून प्रियाने हो म्हणून ऋषीला आत घेतलं. आणि स्वतः आत गेली. प्रियाने दरवाजा बंद केलाच नाही. उगाच संशयाला कारण नको. ऋषी आत जाऊन सोफ्यावर बसला.

प्रिया : का आलास तू इथे??? आणि माझा पत्ता कसा मिळाला तुला.?
ऋषी : तुला काय वाटल तू नंबर बदलास तर मला तू परत भेटणार नाही का. (डाव्या डोळ्याची एक भुवई वर उचलुन प्रियाला विचारू लागला) बर काय काय शॉपिंग केलीस मग आज. आज काय स्पेशिअल आहे का..नाही म्हणजे केक शॉपमधून बाहेर पडताना बघितलं.
प्रिया : आत्ताच्या आता इथून निघायचं ऋषी.
ऋषी : काय प्रिया तू साधं पाणी सुद्धा विचारत नाहीस.

प्रिया रागातच किचनमध्ये पाणी आणायला गेली तोच ऋषीने पटकन उठून दरवाजा लोक केला.

प्रिया : तु पाणी पिऊन निघू शकतोस. आणि तू दरवाजा का बंद केलायस.
ऋषी : एवढी काय घाई आहे प्रिया तुला. मी तर विचार करत होतो भाऊजींना भेटुनच जातो एवढ्या लांबून आलोय तर.
प्रिया : का करतोयस तू असं
ऋषी : तुझ्यासाठी. मग काय ठरवलंस??
प्रिया : कश्याबद्दल??
प्रियाचा असा घाबरलेल चेहरा बघून ऋषी आपला डाव साधायसाठी उभं राहून प्रियाकडे एक एक पाऊल पुढे टाकतो तोच प्रियाचा फोन वाजला. फोन रोहनचा होता.
(प्रियाने रोहनच्या नंबरसाठी वेगळीच ट्यून ठेवलेली. पण प्रिया तो फोन उचलण्याच्या मनस्थितीत नव्हती.)

ऋषी : आता लहान आहेस का तू.. एवढी साधी गोष्ट न कळायला.
प्रिया : ऋषी पुढे येऊ नकोस. आहेस तिथेच थांब.

ऋषीला अस पुढे एक एक पाऊल टाकताना बघुन प्रिया किचनमध्ये वळली. मांडणीजवळ लावलेली सूरी प्रियाने हातात घेतली.
तोच पुन्हा रोहनचा फोन. फोन आता आता सारखा वाजताच होता. पण प्रियाच लक्ष फोनकडे नव्हतंच. ऋषीने फोन हातात घेतला. मिश्किल पणे हसत फोन हातात घेऊन फोन स्विच ऑफ केला. आणि पुन्हा प्रियाकडे चालू लागला.
प्रिया : ऋषी माझ्यापासून लांब हो.. नाही तर..
ऋषी : (ऋषी क्रूरपणे हसतो). नाही तर काय करशील. मारशील मला… ते पण ह्या सुरीने.
प्रिया : तुला नाही मारू शकली तरी स्वतःला तर मी मारूच शकतेना.
ऋषी : एवढी हिंमत आहे तुझ्यात..
(आणि ऋषी पुन्हा तिच्या जवळ जाऊ लागला)
प्रिया : ऋषी पुढे येऊ नकोस… तू थांब तिथे…
प्रिया मागे मागे जात एका भिंतीला चिकटली. आता ह्यातून आपली सुटका नाही पुढचा मागचा विचार न करता प्रियाने सूरी आपल्या डाव्या हातावर फिरवली. थोडक्यासाठी तिची नस बचावली. पण रक्तप्रवाह होऊ लागला.
प्रिया : ये अजून पुढे…
वेदनेने येणार रडू आता रुद्र अवतारात उतरू लागलं. ह्या वेळेला ती पुढे आणि ऋषी मागे अशी अवस्था होती.
ऋषी : प्रिया प्लिज थांब.. (ऋषी घाबरतच प्रियाला बोलला)
प्रिया : का थांब. फक्त माझं शरीर हवय ना तुला. ते ह्या जन्मात कदापि शक्य नाही ऋषी. माझ्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे.

प्रियाने पुन्हा एकदा सूरी आपल्या हातावर फिरवली. ऋषी मागे मागे येऊन ज्या सोफ्यावर तो मोठा रुबाब धरून बसलेला त्याच सोफ्यावर येऊन पडला. प्रियाचा असा अवतार पाहून ऋषी घाबरला. तसाच सोफ्यावरून उडी मारून तो दरवाजाचा लोक खोलून पळून गेला. प्रियाने लगेच दरवाजा बंद केला. आणि हातातील सूरी पण तिने रडतच खाली फेकली. तोच पुन्हा बेल वाजली. प्रियाने पुन्हा धीर एकवटून सूरी हातात पकडली आणि दरवाजा उघडला. साने काकूंना दारात बघून तिने सूरी मागे लपवली.
प्रिया : काय झालं काकु.
साने काकु : अग रोहन तुला फोन करतोय. फोन स्विच ऑफ येतोय. हातातला फोन तिला देऊन साने काकु निघून जातात.

प्रिया थोडी घाबरतच फोन हातात घेते.

प्रिया : ह ह हॅलो,
रोहन : प्रिया काय हे..?
प्रिया : क क काय झालं?
रोहन : अग राणी तुझा फोन का बंद. आणि मी तुला कामावर सोडलेलं तू घरी कशी.? बर वाटत नाही का?
प्रिया : तुम्हाला कस कळलं मी घरी आहे ते.
रोहन : अग साने काकूंना थोडे पैसे हवे होते ग. पुढच्या महिन्यात देतो बोलले.आणि सहज बोलता बोलता प्रिया आज घरी का म्हणून विचारलं.
प्रिया : रोहन ऐकणा घरी आल्यावर बोलू. मी फोन स्विच ऑन करते. ठिक आहे.
रोहन : तू बरी आहेस ना.
प्रिया : तुम्ही जमलं तर थोडं लवकर या. ठेवते..

प्रियाने फोन कट करून साने काकूंना दिला. दरवाजा बंद केला. आणि बेडरूमचा दरवाजा बंद करून बेड शेजारी असलेला रोहनचा फोटो आपल्या हृदयाशी कवटाळून ती रडू लागली.हातातुन देखील तिला खूप वेदना होत होत्या. मनात काही तरी ठरवून ती उठली. तोंडावर पाणी मारलं. हातातून येणारी कळ तिला झालेल्या घटनेची आठवण करून देत होती. तिने कापटावर ठेवलेली आपली बेग काढली. त्यात आपले कपडे भरून ठेवले. व बेग दरवाजाच्या मागे लपवून ठेवली. तीला काहीही करून रोहनचा बर्थडे खूप थाटात करायचा होता. तिने हाताला बेंडेज लावली व त्यावर पट्टी बांधली. तसल्याच हाताने रूम सजवली. रोहनच्या आवडी निवडी ती ह्या सहा महिन्यात जाणून गेलेली. त्याच्या आवडीचं सर्व पदार्थ तिने बनवले. आणि स्वतः सुंदर अशी तैयार होऊन बसली. तैयार होताना तिने हातातील बेंडेज रोहनला दिसु नये म्हणून पूर्ण हातभार बांगड्या घातल्या. तोच रोहनच्या गाडीचा आवाज आला.

प्रियाने घरातील सर्व दिवे बंद करून काळोख करून बसली. खूप वेळ झाला तरी प्रिया दरवाजा उघडत नाही हे बघून रोहन ने स्वतः जवळ असलेल्या किल्लीने दार उघडले. घर भर पूर्ण काळोख बघून रोहन ने दरवाजा शेजारील लाईट आणि पंख्याचे स्विच दाबले. पंखा फिरताच गुलाबाच्या पाकळ्या रोहनवर बरसू लागल्या. संपूर्ण घरभर प्रियाने रोहनचे आणि तिच्या लग्नाचे फोटो चिकटवलेले. रोहन पूर्ण घरभर बघतच राहिला. तोच समोरून प्रिया हातात केक घेऊन रोहनच्या दिशेने येताना रोहनला दिसली.

” बार बार दिन ये आये….
बार बार दिल ये गाये….
तुम जिओ हजारो साल
येह मेरी हे आरझु”

प्रिया गाणं बोलतच रोहन जवळ आली. केक तिने टीपोयवर ठेवला. रोहनचा हात धरून तिने रोहनला सोफ्यावर बसवले. देव्हाऱ्यातील दिवा तिने एक ताटात घेऊन रोहनचे औक्षण केले. आणि गिफ्ट म्हणून घेतलेलं ब्रेसलेट रोहनच्या हातात घातलं. नकळत का होईना रोहनचे डोळे पाणावले. प्रियाने आज जे केलेलं जे रोहनची आई दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला करायची.
प्रिया : रोहन तुम्ही अस रडता का. आवडलं नाही का माझं गिफ्ट.
रोहन : खूप आवडल ग राणी. मला सकाळपासून खूप वाईट होत तु मला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या म्हणून. पण आता खरच खूप बरं वाटतय.
प्रियाने रोहनच्या पुढ्यात केक ठेवलेला टीपॉय नेला. रोहनचा हात पकडून त्याला केक कापायला लावला. त्याला केक भरवला. एक गोड किस रोहनच्या गालावर दिल. रोहन प्रियाकडे बघतच राहिला. आय लव्ह यु रोहन.. अस बोलून प्रियाने रोहनच्या बर्थडे दिवशी खूप छान गिफ्ट त्याला दिल. रोहनला आपण आज स्वप्नातच असल्यासारखं वाटत होतं.
रोहन : खरच प्रिया.. एवढं प्रेम करतेस माझ्यावर…
प्रियाने लाजतच मान हलवली.

प्रिया : ऐकाणा तुम्ही फ्रेश होऊन याना.. अजून एक सरप्राइज बाकी आहे.
रोहन : अजून सुद्धा बाकीच आहे.
प्रिया : हम्मम..
रोहन : ठिक आहे राणी सरकार मी हा गेलो नि हा आलो..
( अस बोलून रोहन फ्रेश होण्यासाठी गेला)
रोहन फ्रेश होऊन बाहेर येताच पुन्हा घरभर काळोख..

रोहन : प्रिया…
प्रिया : तुम्ही हॉलमध्ये याना रोहन..
रोहन हॉलमध्ये येऊन बघतो तर काय. प्रियाने डायनिंग टेबले सुंदर सजवलेलं. आणि बाजूला मेणबत्ती लावून रोहनकडे बघून हसते. रोहन येताच प्रिया रिमोटच बटन दाबून गाणी चालू करते.. दोघांच्याही आवडीचं गाणं लावते..

प्यार हुआ इक़रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल (कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ) – २ प्यार हुआ इक़रार हुआ …

प्रिया रोहनकडे जात आपला उजवा हात त्याच्या पुढे करत..
प्रिया : रोहन कॅन वी डान्स.. इफ यु डोन्ट माईंड
रोहन नाही बोलूच शकत नव्हता. मेणबत्तीच्या प्रकाशात प्रिया खुपच सुंदर दिसत होती. तो तिला बघतच होता… रोहन ने समोर हात करताच प्रियाने रोहनचा हात हातात पकडला रोहनचा डावा हात तिने स्वतःच्या कंबरेवर ठेवून दोघेही ताल पकडून एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून नाचू लागले..

गाणं संपलं.. प्रियाने रोहनचा हात पकडून त्याला खुर्चीवर बसवलं. जेवण घेऊन येते बोलून ती किचनमध्ये गेली. रोहनला तिने जेवण वाढलं. रोहन सगळं आपल्या आवडीचं जेवण बघून खुश झाला.
रोहन : थँक्स प्रिया.. किती केलंस तू आज माझ्यासाठी.
प्रिया : पुन्हा थँक्स. ( प्रिया थोडी नकट्या रागात रोहनला बोलू लागली)
रोहन : सॉरी ना ग राणी ( रोहन दोन्ही हात कानाला लावून प्रिया बोलू लागला)
प्रिया : पुन्हा सॉरी…
( आणि दोघेही हसू लागले)
प्रिया : खरच आवडलं ना रोहन तुम्हाला सरप्राइज गिफ्ट.
रोहन : हो ग राणी. आत्ता पर्यंतचा सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे हे माझ्यासाठी..
प्रिया : खरच..
दोघांचं ही जेवून झाल्यावर प्रिया सगळ उचलून ठेवू लागते. रोहन हात धुवून येऊन तसाच खुर्चीवर येऊन बसून प्रियाकडे बघत असतो. प्रिया रोहनसाठी बडीशेप घेऊन त्याच्या हातावर ठेवते. प्रिया किचनकडे पुन्हा वळणार तोच रोहन तिचा हात खेचतो. आणि नेमका तो डावा हात खेचतो. प्रियाने केलेल्या सुरीच्या घावाने तिला खूप जोरात कळ येत..

प्रिया : आई ग..किंचाळून खालीच बसते.. डोळ्यांतून पाणी आणि हातातून रक्त येत.
रोहन खूप घाबरतो. प्रिया काय झालं..

तो घाबरतच दरवाजाच्या दिशेने वळतो आणि लाईट लावतो. आणि प्रियाकडे वळतो. प्रिया आत्ता घाबरते. जे व्हायला नको तेच झालं. ती लगेच हात मागे वळवते. डोळ्यातील पाणी पुसते. पण रोहनच्या नजरेपुढे ते सुटत नाही. पूर्ण फरशीवर वर प्रियाच्या हातातून रक्त पडू लागल. रोहन खूप घाबरला.
रोहन : प्रिया काय झालंय दाखव बघू.
प्रिया : रोहन काही नाही. ( प्रिया हात मागे लपवत)
रोहन : प्रिया हात दाखव (रोहन रागाने तिच्याकडे बघतो)
प्रिया ह्या सहा महिन्यात पहिल्यांदाच रोहनला अस रागाने बोलताना बघत होती. तिने रडतच रोहन पुढे हात केला. हातातील बांगड्यामुळे रोहनला झालेली जखम दिसत नव्हती. त्याने अलगद बांगड्या काढल्या. खोल वर गेलेले ते सुरीचे घाव बघून तो भरल्या डोळ्यांनी प्रियाकडे बघत होता।

रोहन : प्रिया हे काय आहे.
प्रिया : रोहन मला माफ करा. (प्रिया रडू लागली)

रोहन ने धावतच जाऊन आतल्या बॉक्समधुन डेटॉल, कापूस आणि बेंडेज आणलं. प्रियाच्या हाताला पट्टी बांधली. तिच्या डोळ्यातील पाणी पुसून टाकून डोक्यावर एक किस केलं.. प्रिया माझं काही चुकल का जे तू अस केलंस..
प्रिया खूप जोराने रडू लागली…
प्रिया : मला तुमचा बर्थडे असा खराब करायचा नव्हता रोहन. मला माफ करा. आणि विश्वास ठेवा मी तुम्हाला सगळं खरं खर सांगणार होती..
रोहन : काय झालं प्रिया तू अशी रडू नकोस..
प्रिया : आज तो आलेला..
रोहन : तो कोण प्रिया??
प्रिया : ऋषी.. माझा भुतकाळ.
(प्रिया सुरुवातीपासून ऋषी बद्दल आणि तिच्या बद्दल रोहनला सांगू लागली. सांगताना तिचा तो आक्रोश तीच रडणं रोहन बघतच राहिला. आज तो कसा वागला हे ही तिने रोहन ला सांगितलं)
रोहन ऐकतच राहिला.

रोहन : प्रिया तू चल माझ्याबरोबर.
प्रिया : रोहन मला माहित होतं तुम्हाला कळल्यावर तुम्ही माझ्यासोबत कधीच नाही रहाणार. मला माफ करा रोहन.

एवढं बोलून प्रिया बेडरूममध्ये भरून ठेवलेली कपड्यांची बेग स्वतः सोबत घेऊन रोहनच्या पुढे आली. रोहनने एक नजर तिच्याकडे आणि एक नजर बेगेकडे फिरवली.
रोहन : आता हे काय आहे प्रिया.
प्रिया : मी दुपारीच बेग भरून ठेवलेली. आजचा दिवस तुम्हाला फक्त आनंदी बघायचं होत आणि उद्या सगळं सत्य सांगून मला मुक्त व्हायचं होत रोहन ह्यातून. मी प्रेम केलेलं रोहन. पण तेच प्रेम कलंक बनून माझ्या संसारात आलं रोहन. तुम्ही बोलाल ती शिक्षा मला मान्य आहे.
एवढं बोलून प्रिया रडू लागते. रोहन तिचा उजवा हात पकडतो. तिचा हात ओढतच दरवाजा उघडतो. घर बंद करून पार्किंगमध्ये लावलेली गाडी प्रियासमोर उभी करतो.
रोहन : प्रिया गाडीत बस..
प्रिया रडतच गाडीत बसते.
प्रिया : रोहन आई पप्पांना ह्या बद्दल खरच काही माहिती नाही. प्लिज तुम्ही त्यांना काही सांगू नका. ते हा धक्का पचवू शकणार नाही. प्लिज रोहन.

तोच रोहन फोन वर बोलतो. तू आहेस ना तिथे? मी येतोय. एवढं बोलून रोहन फोन कट करतो. प्रिया गाडीत रडतच बसते. शेवटी गाडी एका ठिकाणी येऊन थांबते. रोहन उतरून प्रियाच्या इकडली दरवाजा उघडतो. तिला बाहेर यायला सांगतो. हात पकडतच तिला तो नेतो. समोर पोलीस स्टेशन असते.

प्रिया : आपण इथे का आलोत रोहन
रोहन : कळेल तुला

तोच रोहनचा मित्र किरण जो क्राईम ब्रांचमध्ये कामाला असतो तो तिथे येतो. झालेला प्रकार रोहन त्याला सांगतो. तिघेही आत जातात.

किरण : वहिनी ऋषीचा नंबर आहे तुमच्याकडे किंवा पत्ता?
प्रिया : 980*******. पत्ता नाही माहीत मला

किरण : ऑफिसर्स नंबर ट्रेकिंगला टाका जिथे असेल तिथुन साल्याला पकडून काढा. आणि माझ्यासमोर हजर करा.
प्रिया सगळं घाबरून बघतच होती. जवळ जवळ अर्ध्या एक तासाने ऋषीला पोलिसांनी पकडून प्रियासमोर हजर केलेलं. रोहन ने प्रियाचा हात घट्ट पकडला. किरण ने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले.

किरण : का घरी गेलेलास तिच्या.
ऋषी : हिनेच मला फोन करून बोलवून घेतलेलं साहेब.
ऋषी खुर्चीवरून उठत रोहनला सांगू लागला. तू कामाला गेलास तर ही मला नेहमी घरी बोलवुन घेते आणि वर फोन सुद्धा करते.
प्रिया : रोहन हा खोट बोलतोय. (प्रिया रडतच रोहनला सांगू लागली)

रोहन हातानेच प्रियाला शांत बसायला सांगतो. रोहनला आता राग अनावर वर झाला. त्याचा हात उठला तो थेट ऋषीच्या गालावर. ऋषीच्या तोंडातून रक्त येऊ लागलं.

रोहन : माझा माझ्या प्रियावर पूर्ण विश्वास आहे. मी तिला ह्या 6 महिन्यात ओळखतो जे तू 5 वर्षात नाही ओळखू शकलास. खूप कमनशिबी निघालास जी ती तुझी बायको म्हणून तुझ्या आयुष्यात नाही आहे. अरे खर प्रेम करत होतीरे तुझ्यावर ती. पण तू त्याच्या लायकच नाही निघालास. तीच प्रेम कलंकित केलंस तु. तिच्यावर असे खोटे आरोप करताना जराही काही वाटत नाही का तुला आणि माझी प्रिया तुला फोन करते? दाखव बघू नंबर.

ऋषी : ते ती पीसीओ तुन फोन करायची. (ऋषी घाबरतच बोलला)
किरण : ए आता खर सांगतो का दाखवू तुला पोलिसांचा इंगा.
(किरणचा मोठा आवाज ऐकून ऋषी घाबरला)
ऋषी : मला माफ करा साहेब. मला प्रिया आवडायची. पण मला फक्त तीच शरीर हवं होतं. पण ती लग्न झाल्याशिवाय स्पर्श देखील करायला द्यायची नाही. मला तिच्याशी लग्न नव्हतं करायचं. तीच लग्न झालं कळताच तिला ब्लॅकमेल करायच आणि आपला डाव साधायचा एवढाच हेतू होता. म्हणून कालच बेंगलोर वरून आलो. हिने नंबर बदलला पण ऑफिस नाही. सकाळी तिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. प्रिया गाडीतून बाहेर उतरताच ती ऑफिसला जायचं सोडून दुसरीकडेच कुठे तरी जाऊ लागली. मी तिचा पाठलाग करत करत तिच्या घरी पोहचलो. घरी ती एकटीच होती ह्याची माहिती मला तिच्या शेजारी राहणाऱ्या काकुंकडून मिळाली. त्यांना फक्त मी प्रिया कुठे राहते विचारलं पण ह्या वेळेला ती कामावर असेल असं सांगितलं. घरी कोणीच नसेल अस त्या काकी बोलल्या. पण तरी मी जाऊन बघतो म्हणून मी मुद्दामून पुढे आलो कारण मला माहित होतं प्रिया घरीच आहे. घरी जाताच मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण ह्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे. जर मी रोहनची नाही तर कुणाची नाही म्हणून तिने स्वतःच तिचा हात कापला. मी घाबरून पळून आलो.

हवालदार हा जे बोलला ते त्याच्याकडून लिहून घ्या आणि आत टाका ह्याला. ह्याच पुढे काय करायच ते मी बघतो. तुम्ही निघालात तरी चालेल. किरणने रोहन आणि प्रियाला घरी जायला सांगितलं.

रोहन आणि प्रिया पोलीस स्टेशनमधून बाहेर येताच प्रिया रोहनला मिठी मारून रडू लागली.
प्रिया : रोहन मला माफ करा.
रोहन : अग राणी ह्यात तुझी काहीच चूक नाही. आता तुला तो प्रेमाचा कलंक घेऊन फिरायची काही गरज नाही.
प्रिया : आय लव्ह यु रोहन.. मी खूप नशीबवान आहे जे तुम्ही माझ्या नशिबात आलात.
रोहन : मीही कमनशिबी नाही प्रिया.. तुझ्यासारखी बायको मिळायला. दोघेही हसत एकमेकांच्या संसारात आता खऱ्या अर्थाने गुंतले. आणि नवीन संसाराला सुरुवात झाली.

ऋषीवर सेक्शन आय पी सी 354, सेक्शन आय पी सी 354 बी द्वारे केस चालू आहे.

2 वर्षांनी

रोहन आणि प्रियाच्या आयुष्यात गोड छकुलीच आगमन झाले आहे. प्रियाने तिच्या संगोपनासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला जो रोहनला पण मान्य आहे. रोहन प्रिया आणि तिच्या छकुलीची खूप काळजी घेतो. जसा तो सुरुवातीपासून प्रियाशी वागायचा तसाच आहे.

©भावना विनेश भुतल

(कथेला भरगोस प्रतिसदेबद्दल धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कळवा.)

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा