कलंक प्रेमाचा भाग 4

Written by

 

 

रोहनच्या स्वभावाने प्रियाला आपलंसं करून घेतलेले. प्रियाला घरी जाऊन जेवणाचा पुन्हा त्रास नको म्हणून रोहनने मुद्दामूनच आपला मुक्काम हॉटेलमध्ये वळवला. दोघेही नऊ दहा तास प्रवास करून थकलेले. तितक्यात प्रियाच्या आईचा प्रियाला फोन आला. ह्यावेळेला प्रियाने फोन उचलताना रोहनकडे बघितले. उचलू का फोन आईचा आहे.
अग उचलना त्यात काय विचारायचं. मी पण विचारलं म्हणून सांग आईंना रोहनने एवढं प्रेमाने दिलेल्या उत्तराने प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. ह्यावेळेला मात्र प्रिया जागेवरून न उठता रोहनच्या पुढ्यातच बोलत होती. खुप दिवसांनी आईशी बोलताना प्रियाचे डोळे नकळत पाणावले. प्रियाच्या आईने वडिलांना फोन दिला. प्रियाच्या पप्पांना रोहनशी बोलायचे होते. प्रियाने रोहनला फोन दिला.
प्रियाचे पप्पा : नमस्कार जावई बापू.
रोहन : नमस्कार पप्पा. कसे आहात तुम्ही?
प्रियाचे पप्पा : मी आहे ठिक. ते प्रियाला माहेरपणासाठी आणायचं म्हणत होतो. तुमची परवानगी असेल तर.
रोहन : अहो बाबा ती आधी तुमची मुलगी आहे आणि मग माझी बायको. तुम्ही म्हणाल ते. आणि मला आपला मुलगा समजा. अस अहो जाओ नका ना करू.
( प्रियाच्या बाबांना खुप बर वाटल.)
प्रियाचे बाबा : उद्या आलं तर चालेल का न्यायला..?
रोहन : उद्या घेऊन जायचं म्हणतायत (रोहन प्रियाकडे बघत बोलला) तर माझी काही हरकत नाही. प्रियाला चालणार का विचारा. तिला उद्या कामावर जायचं आहे. मग कस ते तुम्हीच ठरवा.
एवढं बोलून रोहनने फोन प्रियाला दिला.
प्रियाने मी मग फोन करून कळवते. आणि फोन ठेवून दिला.
तितक्यात त्यांनी दिलेल्या जेवणाची ऑर्डर आली. दोघेही जेवून घरी जायला निघाले. प्रिया आणि रोहन दोघेही फ्रेश होऊन बेडरूमकडे वळले. बेडरूममध्ये जाताना प्रिया बाहेरच स्तब्ध उभी राहिली.
रोहन : प्रिया, अशी बाहेर का उभी ग. आत ये..
रोहन बेड वरील चादर नीट करत प्रियाला बोलला.
प्रिया : रोहन ते… ते
प्रिया काही बोलणार तितक्यात रोहननेच तिला इशाऱ्याने शांत केले.
रोहन ने स्वतःसोबत चादर घेतली आणि एक हातात लॅपटॉप आणि बाहेर निघाला.
प्रिया : तुम्ही कुठे चाललात.
(रोहन प्रियाच्या पुढे येऊन थांबतो)
रोहन : प्रिया, तुझ्या मनाची होणारी घालमेल मला कळते ग. तुला हवा तेवढा वेळ घे. पण तुझ्या शब्दाच्या परवानगी शिवाय मी तुला स्पर्श नाही करणार. आणि मुळात मला काय वाटत माहिती आपण आधी मित्र होऊ मग बघू. एवढं बोलून रोहन निघतो. प्रियाला रोहनच्या खूप कौतुक वाटत होतं. रोहन लॅपटॉप उघडून काम करू लागला. प्रिया उद्या ऑफिसला जायची तैयारी म्हणून ऑफिसच आयडी आणि कपडे वैगेरे तिच्या बेगेतून काढून लावत होती. आणि उद्या आई बाबांकडे जाणार म्हणून बेगही भरत होती. झोपण्याआधी रोहनला बघावं म्हणून ती बाहेर गेली. रोहन बाहेर नव्हता. त्याचा लॅपटॉप तिथेच ठेवून तो हॉलच्या गॅलरी एकटाच उभा होता. प्रिया देखील त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रोहन आकाशाकडे बघतच होता..
प्रिया : झोप नाही येत का?
अचानक अशी प्रिया आल्यामुळे रोहन खूप दचकला.
रोहन : तस नाही.. सहज बाहेर बघावं म्हणून आलो. आता झोपतच होतो.
(रोहनच्या आवाजात प्रियाला थोडा बदल जाणवत होता)
प्रिया : काय झालं रोहन? बर नाही वाटत आहे का…
(प्रियाने काळजी पोटी विचारलं)
रोहन : कुठे काय.. तुला झोप नाही येत.
प्रिया : तुम्ही रडताय का.. काय झालं. मला नाही सांगणार?
रोहन : काही नाही ग. झोप तू..
प्रिया : शप्पत आहे माझी सांगा काय झालं..
रोहन : आधी सुटली बोल..
प्रिया : नाही आधी सांगा….
रोहन : आईची आज खूप आठवण येते ग.
प्रियाला काय बोलावे सुचत नव्हते.
रोहन : बाबा खूप लवकर गेले. आईनेच मोठं केलं. खुप कष्ट घेतले तिने आम्हाला मोठं बनवण्यासाठी. तिने सर्व केलं ग. माझी इच्छा होती की मोठ्या पदावर कामाला लागायचं. एक मोठं घर घ्यायच. हाताखाली नोकर चाकर आणि आई फक्त हुकूम सोडणार. काहीच करायची संधी नाही दिली ग. तू मगाशी तुझ्या आईशी बोलत होती तर मला तिची खूप आठवण आली.
प्रिया रोहनला अस रडताना बघून स्वतः पण रडू लागली.
तिने त्याचा हात हातात घेतला.
प्रिया : एक दिवस सगळ्यांनाच इथून जाव लागणार . आणि तुम्हाला माहिती, चांगली माणस देवाला खूप आवडतात. आई खूप छान होत्या संस्कार तर त्यांचा सर्वांगात असेल हे तुम्ही सांगायच्या आधी तुम्हा भाव बहिणीवर केलेल्या संस्कारातून दिसून आलं मला ते. पण काळ आणि वेळ ही कधी सांगून येत नाही रोहन. आणि त्या जिथे असतीलना तिथून तुम्हाला बघत असतील. आणि तुम्ही अस रडलेलं तिला आवडणार नाही.
रोहन प्रियाकडे बघतच राहिला.
रोहन : हम्मम, थँक्स प्रिया.. थोडं बर वाटल तुझ्याशी बोलून.
प्रिया : फ्रेंडशीपमध्ये नो सॉरी नो थँक्स.
आणि दोघेही हसायला लागतात.
रोहन : तू झोप. उद्या कामावर जायचं आहे तुला. माझं थोडं काम झालं की मी पण झोपेल.
प्रिया : पुन्हा अस एकट्यात बसून रडू नका.
रोहन : हो ग राणी. आता झोप…
प्रिया : गुड नाईट..
रोहन : गुड नाईट…
रोहन त्याच काम संपवण्यात गुंततो आणि प्रिया बेडरूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असते. तीच मन आता फक्त रोहन आणि रोहनच करत असत. खूप वेळाने तिला झोप लागते. रोहन त्याच काम संपवून प्रिया झोपली का बघण्यासाठी बेडरूमध्ये फिरवतो. तिच्या बाजूला असलेला दिवा चालूच असतो. रोहन दिवा बंद करतो आणि निघतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला रोहन उठवतो. अग प्रिया उठ.. वाजले बघ किती. कामावर जायचं नाही.
प्रिया : मम्मे 5 मिनिट ना ग.
रोहनला हसू येत.
अग राणी उठ.. 8 वाजून गेले बघ. प्रिया घाबरतच उठली. तिला आता जाणवलं आपण रोहनकडे आलोत. तिने उठल्या उठल्या रोहनला सॉरी मला उठायला उशीर झाला असे म्हटले.
रोहन : फ्रँडशीप मध्ये नो सॉरी नो थँक्स.
प्रियाने एक गोड स्माईल दिली. आणि रोहनला गूड मॊर्निंग म्हटले.
रोहन : गुड मॊर्निंग.
प्रिया : हे काय तुम्ही एवढ्या लवकर निघालात.
रोहन : हो मी लवकरच निघतो. आणि हो ब्रेकफास्ट मध्ये पोहे बनवलेत ते गरम करून खाऊन घे. आणि तुझा डब्बा सुद्धा केलाय. मसाले भात तोही आठवणीने घेऊन जा.
प्रिया : काय…! तुम्ही एवढं का केलंत. मी केलं असतना.
रोहन : अग पुन्हा उशीर झाला असता. आणि आज बाबांकडे जाणार आहेस ना.
प्रिया : हो.
रोहन : मग काय ठरलं. बाबा येणार आहेत का घरी? नाही म्हणजे मला तस लवकर निघायला.
प्रिया : नाही मी कामावरून सुटल्यावर डायरेक्ट जाईन बाबांकडे. चालेलना ना..
रोहन : हो चालेल. हे पैसे ठेव जवळ. जास्त दगदग नको. डायरेक्ट टेक्सिने जा. एवढं बोलून निघतो. प्रिया देखील स्वतःची तैयारी करून कामावर जायला निघते. पोहचली ना पोहचली तोच रोहनच्या मेसेज..
रोहन : पोहचलीस का ग राणी?
प्रिया : (गालातल्या गालात हसली) हो आत्ताच पोहचली. आणि तुम्ही?
रोहन : हो मी मगाशीच आलो.
प्रिया : पोहे छान होते. मी तुमच्यासाठी रात्रीच जेवण करून ठेवलंय. रोज बाहेरच खाऊ नका.
रोहन : ओके राणी.. मला खूप काम आहे. आपण नंतर बोलु. चालेलना तुला.
प्रिया : हो बाय.
प्रियाला सगळे लग्नाच्या शुभेच्छा द्यायला तिच्या डेस्कवर येत होते. आणि ती डेस्क वर जाण्याच्या आधीच कुणाकडून तरी तिला गिफ्ट आणून ठेवलेलं असत. लेबल वैगेरे काही लावलं नव्हत. प्रियाने तिच्या ऑफिस मधील वॉचमेन काकांना विचारले हे गिफ्ट कुठून आलंय म्हणून. मुंबई वरूनच पार्सल आलंय अशी नोंद त्यांनी नोंदणी बुकमध्ये ठेवलेली. बाकी नाव वैगेरे नव्हतं त्या पार्सलवर. प्रियाने थोड्या वेळाने पार्सल उघडलं त्यात सूंदरश्या काचेच्या घराबाहेर एक मुलगा एका मुलीला घुडग्यावर बसून गुलाबाचं फुल गिफ्ट म्हणून देतो असे शो पिस होत ते आणि सोबत एक चिट्ठी होती. ती ऋषीकडून होती. प्रियाच्या हातून गिफ्ट खालीच पडलं. पूर्ण फ्लोर वर प्रियाकडून पडलेल्या गिफ्टच्या कांचाचा आवाज घुमू लागला. सगळे जण तिच्या डेस्कवर जमा झाले व विचारू लागले. तीने काही नाही सहज हाताततूनच निसटल म्हणून सगळ्यांना सांगू लागली. तसे सगळे आपापल्या कामला लागले. पिऊनला तिने सर्व काचा उचलून फेकून द्यायला सांगितल्या.

आता खुश असशील ना लग्न करून. जे हवं ते मिळालं तुला. काय कमी होती माझ्या प्रेमात. तुला इतक्या सहज सहजी विसरू नाही शकत जितक्या सहज तू मला विसरलीस.

तुझं पाहिलं प्रेम
ऋषी

प्रियाने हातातील चिट्ठी रागाने फाडली. आणि तडक उठुन वॉशबेसिनमध्ये तोंड धुवायला गेली. डोळ्यांत पुन्हा अश्रू वाहू लागले. सगळं संपल. मी रोहनला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. रोहन ने मला समजून माफ केले असते. मी का अस नाही केलं. म्हणून प्रिया स्वतःला दोष देत बसली.

क्रमशः
©भावना विनेश भुतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा