कलंक प्रेमाचा भाग 5

Written by

 

प्रियाच कामात लक्षच लागणार नव्हतं. ती डेस्क वर आली. डेस्कवर डोकं ठेवून बसणार तोच फोन वाजला. घाबरतच तिने फोन हातात घेतला. पप्पांचा नंबर बघून तिचा जीव भांड्यात पडला. हो मी कामावरून सुटल्यावर थेट घरी येते बोलून तिने फोन कट केला. कामात लक्ष लागतच नव्हतं पण काम करावंच लागणार होतं. तिने एकदा सुयशला फोन करून त्याला विचारावं हा असा का वागतो ते म्हणून तिने सुयशला फोन लावला. त्याच्याकडून तिला अस कळलं की ऋषी नोकरीनिमित्त बंगलोरला गेलाय. तो मुंबईत येऊन तिला काही त्रास देईल अस वाटत नव्हतं. त्यातल्या त्यात तिला थोडा धीर आला. कसाबसा कामावर दिवस भरून ती घरी जायला निघाली. घरी गेल्यावर खूप दिवसांनी आई बाबांना बघून तिला बर वाटल. दिवसभर मेंदूने घेतलेला त्राण ती पुर्णपणे विसरली. छोट्या दोघीही भाच्या आतु आतु करत तिला बिलगल्या. वहिनीला आणि दादाला देखील प्रियाने स्वतः जाऊन मिठी मारली. दोघांनाही खूप बरं वाटलं. वातावरण सगळं हस्त खेळत झालं. अश्यातच प्रियाचा आठवडा सरला. दिवस अगदी सहज गेले.

आदल्या रात्री प्रिया उद्या सासरी जाणार म्हणून बेग वैगेरे भरत होती तोच मोबाईल मध्ये मेसेज आल्याची ट्यून वाजली. येणारा मेसेज अनोळखी नंबरवरून जरी असला तरी विसरून जाण्याचा प्रयन्त करणारा नंबर पुन्हा भूतकाळ घेऊन तिच्या समोर येतहोता. प्रियाने घाबरतच मेसेज वाचला.

ऋषी : “सॉरी प्रिया.. पण तू आयुष्यातून निघून गेल्यावर तुझी किंमत मला कळाली प्रिया. मला एक वेळ माफ कर.” 😢

त्याने केलेल्या मेसेजची प्रियाला फक्त चीड येत होती. तिने रागातच फोन हातात घेतला
प्रिया : ह्या पुढे मला मेसेज आणि कॉल करणं बंद करायचं ऋषी.
ऋषी : प्लिज अस नको बोलुस😥
प्रिया : हे बघ ऋषी तुला एकदा नाही असं हजार वेळा मी माफ केले पण आता नाही. आणि प्लिज मला मेसेज करण बंद कर.

आणि लगेच त्याचा फोन नंबर ब्लॉक लिस्टवर टाकला. आता तिला फक्त आणि फक्त रोहनच हवा होता. तिला अजून त्याला धोका द्यायचा नव्हता. एक मन सांगत होत की ऋषी बद्दल रोहनला सांगावं आणि एक मन नको. प्रियाने नंबर ब्लॉक केल्या नंतर ऋषी कडून येणारे मेसेजेस बंद झाले. पण रात्रभर तिला झोप लागली नाही. विचारांच्या तंद्रीत ती पूर्ण हरवून गेली. ऋषी पुन्हा काय करेल, हा नंबर तर ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरून फोन किंवा मेसेज केला तर. भीतीची एक लहर तिच्या सर्वांगातून फिरू लागली. ऋषीे दुसऱ्या नंबरवरून तर नाहीना फोन करणार. खूप सारे विचार डोक्यात तरंगत होते. प्रिया नुसती कूस बदलून झोपत होती. घड्याळात 6चा ठोका झाला म्हणजे रात्रभर ती झोपलीच नव्हती. स्वतःची तैयारी करून ती कामावर जायला निघाली. आज रोहन तिला न्यायला येणार होता. पण काल घडलेल्या प्रसंगावरून ती हे पूर्णच विसरून गेली. कामावर जाताच अनोळखी नंबर वरून तिला फोन आला. हा तर ऋषीचा नंबर नाही. तिने सहज उचलला.
प्रिया : हॅलो
ऋषी : प्रिया मला तुझ्याशी बोलायचं आहे.
(प्रिया फोन कट करणार तोच ऋषी) एक मिनिट प्रिया तु हा नंबरसुद्धा ब्लॉक केलास तर मी दुसऱ्या नंबर वरून फोन करेल.
प्रिया : तु आता मला ब्लॅकमेल करणार ऋषी.
ऋषी : ह्याला ब्लॅकमेल नाही ह्याला प्रेम म्हणतात प्रिया. जे माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर आहे.
प्रिया : एक मिनिट ऋषी. तुझ्यावर प्रेम होतं असं म्हणायचं का तुला. आणि प्रेम काय असत हे तुला माहिती तरी का?
ऋषी : मला एक चान्स देऊन बघ प्रिया.. मी तु बोलशील ते करेल.
प्रिया : जे तू तेव्हा नाही केलंस ते आता करणार ऋषी. एकतर माझं लग्न होईपर्यंत तू काही नाही करू शकलास तर तू आता काय करणार.
ऋषी : प्रिया प्लिज. (ऋषी थोडा रडलेल्या अवस्थेत प्रियाला बोलू लागला)
प्रिया : ह्यापुढे मला त्रास द्यायचा नाही हा ऋषी.
ऋषी : मला तुला भेटायचं आहे प्रिया.
प्रिया : पण मला नाही.
ऋषी : मला तू हवी आहेस.
प्रिया : आता ते शक्य नाही ऋषी.
ऋषी : मला एक दिवस का होईना पण तू हवीस ( ऋषी आता स्वतःच्या खऱ्या लायकीवर येऊन बोलला)
प्रिया : शी…. तूझ्याकडून अजून काय अपेक्षा ठेवू मी ऋषी. स्वप्नात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करणं तू सोडून दे. अरे एवढीच जर जर स्त्रियांच्या शरीराची भूक असेल तर जाणा कुठे तरी तोंड काळ कर.

एवढं बोलून प्रियाने फोन कट केला… तिला आता पुरे पूर कळलं होतं. ऋषीने कधी तिच्यावर प्रेम केलंच नव्हतं त्याला फक्त आणि फक्त तीच शरीर हवं होत. जे पाच वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्याला मिळालं नव्हतं. त्याने खूप प्रयन्त केले पण प्रिया आपल्या विचारांवर ठाम असायची “लग्नानंतरच”. शारीरिक संबंध नाही बोलताच ऋषी आणि आपल्यात होणारी भांडण तिला आठवू लागली. आपण आपले पर्सनल प्रॉब्लेम ऋषी सोबत शेर करताना त्याच लक्ष मात्र उघड्यांवर दिसणाऱ्या तीच्या बाह्य देहावर असायचे. का कळलं नाही तेव्हा मला.

” खर तर तिला कळत होतं पण आंधळं प्रेम तिच तिथे वळत नव्हतं.”

तोच पुन्हा ऋषीचा फोन. प्रिया जस फोन कट करत होती तस ऋषी तिला त्रास देत होता. शेवटी तिने मोबाईलमधल सिम काढलं आणि पुढचा मागचा विचार न करताच तोडून टाकुन दिल. रात्रभर रडून, जागरण करून प्रियाला अंगात कणकणी जाणवत होती. कसबस ती काम आटपून घरी जायला निघाली तोच गेट जवळ तिला रोहन दिसला. खुप दिवसांनी रोहन ला बघून प्रियाला खूप बरं वाटलं.
रोहन : अग फोन का बंद.?
(रोहनने लगेच प्रियाला प्रश्न केला.)
प्रिया : ते ते….( प्रियाला के बोलावं सुचत नव्हतं)
रोहन : अग सकाळपासून तुला फोन लावतो पण लागतच नाही. खूप घाबरलो. म्हणून मी संध्याकाळी 4 वाजल्यापासून इथे येऊन उभा आहे. घरी बाबांना फोन केला ते बोलले नेहमीच्या वेळेत ऑफिसला गेलीस. पण तू मला पोहचलीस म्हणून मेसेजच केला नाहीस. म्हणून न राहवून मी फोन केला तर स्वीच ऑफ. काही प्रॉब्लेम आहे का प्रिया.?
प्रिया : ते रोहन… ते मी सिमकार्ड काढायला गेली तर तुटलं. म्हणून… ( प्रियाची जीभ अडखळतच उत्तर देत होती कारण खोट तिला बोलताच येत नव्हतं)
रोहन : नक्की..?
प्रिया : हम्म..
रोहन : तुशे डोळे असे का दिसत आहेत पण. तू खरच माझ्यापासून काही लपवत नाहीस ना प्रिया…
प्रिया : आपण निघुयात का? घरी सगळे वाट बघत असतील.
रोहन : ऐकणा मी बाबांना फोन करून कळवलं की मी तुला न्यायला रविवारी येतो म्हणून. मला उद्या दिल्लीला जावं लागतंय ऑफिसच्या कामासाठी. पुन्हा तू घरी एकटी. मग माझं मीटिंगमध्ये लक्ष लागणार नाही ग. हे बघ तुला चालेल का विचारायला म्हणून मी फोन केला पण तुझा फोन स्विच ऑफ. बाबा बोलले त्यांना चालेल.
प्रिया : हम्म ठीक आहे.
रोहन : आपण एक काम करू तुझं सिमकार्ड बनवून घेऊ इथेच. मी तुला ड्रॉप करतो आणि मग घरी जातो. चालेलना.
प्रिया : हो चालेल. पण नवीनच सिमकार्ड घेऊ.
रोहन : अग पण हा नंबर तुझा सगळ्यांकडे आहेना.
प्रिया : पण मला नवीन नंबर हवय रोहन.
रोहन : ठिक आहे नवीन सिमकार्ड घेऊ

रोहनने प्रियाला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत एसी मुळे खूप थंडावा होता. प्रियाच्या अंग आता चांगलच तापाने फनफनू लागलं. ती रोहनला एसी बंद करायला सांगणार तोच रोहनचा फोन वाजला. ऐकणं राणी कामावरून फोन आहे मला उचलावाच लागेल एवढं बोलुन रोहनने गाडी बाजूला घेऊन फोन वर बोलत राहिला. उद्याच्या मीटिंग संदर्भात फोन असल्यामुळे रोहनने जवळपास 15 मिनीटांनी फोन ठेवला. आणि प्रियाला सॉरी बोलणार पण प्रिया झोपून गेली. त्याने तिला त्रास दिला नाही. पण प्रियाच वागणं बोलणं थोडं फार बदलं होणे हे रोहनच्या नजरेतून सुटलं नाही. वाटेत त्याला गेलरी उघडी दिसली तिथुन त्याने गाडी तशीच पार्किंग केली व प्रियाला आवाज दिला. प्रियाला खूप गाढ झोप लागली. रोहनने प्रिया उठत नाही म्हणून तिच्या हाताला हात लावला. त्याला प्रियाला ताप आहे हे जाणवलं. त्याने लगेच तीच डोकं चेक केलं. तर खरच खूप ताप होता तिला. त्याने गाडी लगेच डॉक्टरकडे वळवली. डॉक्टर जवळ आल्यावर त्याने प्रियाला उठवलं. व डॉक्टरकडे नेलं.

प्रिया : आपण इथे का आलोत.
रोहन : तू सांगायचस ना मला बर वाटत नाही म्हणून. किती ताप आहे बघ अंगात. मी तुला उठवायसाठी तुझा हात पकडला तेव्हा मला जाणवलं की तुला ताप आहे.
प्रिया रोहनकडे बघतच बसली. तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले.
रोहन : सॉरी, मी तुला अस न विचारताच हात लावला. पण तुला आवाज दिला तू उठत नव्हतीस. आणि तु अस आजारपण अंगावर काढलेलं मला अजिबात चालणार नाही. तुला काय झालं तर मी कसा जगेल जरा तरी विचार कर..
प्रिया एकदम शांतच बसली. खर तर रोहनच प्रेम बघून प्रियाला रडू आलेलं. तितक्यात त्यांचा नंबर आला. रोहन प्रियाचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी औषध दिली. त्याने बर वाटेल अस सांगितलं. रोहन डॉक्टरांशी बोलत असताना प्रिया रोहनकडे एकटक बघत होती. रोहनने तिचा हात पकडून मग तिला गाडीत बसवले. आणि गाडी हॉटेलजवळ नेली. तिथे त्याने तिला आधी जेवण दिले व त्याच्याच पुढ्यात औषध देखील घ्यायला सांगितले. आता रोहन प्रियाला घरी सोडायला निघाला.
रोहन : आता बर वाटत का प्रिया तुला ?
प्रिया : हम्म जरास
रोहन : एक विचारू का प्रिया?
प्रिया : हम्मम
रोहन : तुला खरच कसला त्रास नाही ना. म्हणजे मला सारख अस वाटत की तू माझ्या पासून काहीतरी लपवतेस.
प्रिया : नाही तस काही नाही.
रोहन : सिम कार्डच काय, ते तर राहूनच गेल.
प्रिया : ते मी उद्या कामावर जाताना घेईल.
रोहन : उद्या आराम कर ना ग राणी.
प्रिया : हम्म बघते.
रोहन : आणि नवीन नंबर मला पाठव.
प्रिया : हम्मम
रोहन प्रियाला घरी सोडतो आणि स्वतः आपल्या घरी जातो.

प्रियाने ऋषी आपल्याला कोणत्याच प्रकारे त्रास देणार नाही याची पूरेपूर काळजी घेतलेली. तिने सोसिएल मीडिया साईटना कायमचा रामराम ठोकला. तीन चार महिने झाले ऋषीने त्यानंतर प्रियाला कधीही त्रास दिला नाही. पण हे चार महिने प्रिया आणि रोहनसाठी सुखद होते. आता प्रिया आणि रोहन एकमेकांच्या मैत्रीच्या नात्याच्या पुढील नात आणि नवरा बायकोच्या अलीकडील नात्यांच्या सीमेरेषेवर पोहचले. ह्या चार महिन्यात रोहनने प्रियाला आपलस करून टाकलेलं.

अश्यातच रोहनचा वाढदिवस जवळ आलेला. प्रियाने रोहनला सरप्राईस द्यायचं ठरवलं. तिने रोहनला जराही जाणवू दिल नाही की तिला त्याचा वाढदिवस माहिती आहे. सकाळी ती नेहमी प्रमाणे रोहनसोबत कामाला निघाली. रोहनला खूप वाईट वाटलं प्रियाने त्याला बर्थडे विश नाही केलं. जसा रोहन प्रियाला सोडून कामावर गेला तशी प्रिया टेक्सिने पुन्हा घरी जायला निघाली. जाता जाता तिने रोहनसाठी सोन्याचं ब्रेसलेट घेतले. केकची ऑर्डर दिली. जाता जाता फुगे घेतले. व अजूनही घर डेकोरेशनच सामान घेतलं. आणि अस खूप काही घेतलं. कारण आज तिने रोहनला तीच्या प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं होत सगळं अगदी प्रियाच्या मनासारखं होत होतं.

सगळं सामान व्यवस्थित घेऊन प्रिया घरी आली. तिने त्यांचा बेडरूम नीट केला. आधी जेवणाची तैयारी म्हणून जेवण करायला किचनमध्ये वळणार तोच दरवाजाची बेल वाजली. ह्या वेळेला कोण?? शट रोहनला माझा प्लॅन कळला वाटत स्वतःशीच बोलत तीने नाराज होतच दरवाजा उघडला तोच समोर ऋषी. त्याला बघून ती स्तब्धच झाली.

क्रमशः

©भावना विनेश भुतल

( ह्या पुढील शेवटचा भाग मी मंगळवारी दुपारपर्यंत पोस्ट करेल. कथेला दिलेल्या भरगोस प्रतिसदेल बद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि इराचे खूप खूप आभार. पुढील आणि शेवटच्या भागाची प्रतीक्षा करावी. कथा कशी वाटली हे देखील सांगा. धन्यवाद)

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा