कलंक प्रेमाचा

Written by

 

प्रियाने बेडरूमचा दरवाजा धाड करून आपटला आणि बेड जवळ ठेवलेल्या रोहनच्या फोटोकडे एकटक बघून तोच फोटो ती हृदयाशी कवटाळून रडत होती. तिला खर तर भूतकाळ आठवायचा नव्हता पण तिला आता तिचा भूतकाळ आठवत होता..

प्रिया आणि रोहनच्या लग्नाला सहाच महिने झाले. शोधूनही सापडणार नाही असा राजा राणीचा संसार चालू होणार होता. प्रियाला खर तर लग्न करायचंच नव्हतं. तीच ऋषी वर प्रेम होतं. जवळजवळ पाच वर्षांच रिलेशनशिप होत दोघांच. अश्यातच प्रियाला नोकरी लागली. आता मुलीला बावीसाव लागलं म्हणून घरच्यांनी देखील मुलीला योग्य वर मिळावा म्हणून तीच नाव वधू वर सूचक मंडळात नोंदवून ठेवलं. प्रिया तिला प्रत्येक येणाऱ्या स्थळाला काहीना काही कारण सांगून रिजेक्ट करायची. तीने ऋषीला ह्याबद्दल कल्पना देखील दिली. पण ऋषी मी अजून सेटल नाही आपण ह्या विषयी नंतर बोलू म्हणून विषय टाळायच. प्रियाला फायनली रोहनच स्थळ चालून आल. रोहनमध्ये प्रिया नाव ठेवू शकेल अस काहीच नव्हतं. प्रियाच्या घरच्यांनी तिला एकदा मुलाला भेटूया आणि मग बघू. अश्यातच दोघांची पत्रिका बघायचा कार्यक्रम झाला. पत्रिका जुळली. आता बघण्याचा कार्यक्रम होणार. प्रिया कामावर असताना प्रियाच्या आईने तिला ह्याबद्दल कल्पना दिली. प्रियाला आता फक्त रडू येन बाकी होतं तीने हिंमत न हारता ऋषीला फोन केला हे बघ ऋषी मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचय मला तुझं काहीही एक ऐकायचं नाही. आणि प्रियाने फोन ठेवून दिला. कामावर तीने मला आज बर वाटत नाही म्हणून अर्धा दिवस घेऊन ती नेहमीच्या ठिकाणी निघाली जिथे ती आणि ऋषी नेहमी भेटायचे. नेहमीप्रेमाने ऋषी उशिराच आला.
ऋषी : तुला अस अचानक बोलवायला काय झालं. कामावर किती काम आहे माहिती तुला.
प्रिया : हे बघ मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ताच लग्न करायचंय.
ऋषी : तू वेडी वैगेरे झालीस का? आणि अचानक अस लग्न होत का कधी?
प्रिया : अरे मी तुझ्यासाठी मला येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नाही बोलले. पण आता आलेलं स्थळ घरचे फायनल करतात. आणि मला तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न नाही करायचं.
(आणि प्रिया रडू लागते ऋषीला तिच्या रडण्याने काहीच फरक पडत नव्हता)
ऋषी : हे बघ तू अशी रडू नकोस. मी अजून सेटल नाही. मी एवढ्यात लग्न नाही करू शकत. माझ्या घरच्यांना समजवायला सुद्धा वेळ लागेल मला.
प्रिया : हे तुला पाचवर्षा आधी का नाही सुचल. तू पण इतरांसारखाच निघालास रे. माझ्यासोबत फिरताना तुला घरच्यांना विचारावस नाही वाटलं का?
ऋषी : हे बघ प्रिया, मला आपलं लग्न होईल असं नाही वाटत. जर तुला चांगलं स्थळ आलं असेल तर तू लग्न करून टाक.
प्रिया : किती सोप्प आहेरे तुझ्यासाठी हे सगळं.
ऋषी : ह्यापुढे मला फोन अथवा भेटायचं प्रयत्न नको करुस.
प्रिया : एक दिवस असा येईल की तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल ऋषी. तू मला तुझ्या आयुश्यात परत येण्यासाठी बोलवशील पण वेळ निघून गेली असेल. आज इथे मी रडतेय उद्या तू इथे असशील. ऋषी मिश्कीलपणे हसतो आणि तिला एकटीला तिथे सोडून निघून जातो.
प्रिया एकटिच रडते आणि थोड्या वेळाने ती तिथून निघून घरी जाते. घरी येताच येत्या रविवारी मूलाकडचे तुला बघायला येणार आहेत म्हणून तिला सांगतात. ती हम्म करते सरळ आपल्या बेडरूम मध्ये जाते. कपाटातून ऋषीने दिलेलं गिफ्ट सगळे एका पिशवीत भरते. त्याचा नंबर देखील ती फोनमधून डिलिट करते. आता ऋषीच्या आठवणी प्रियाला पुन्हा आयुश्यात नको असतात. हाच तो मुलगा ज्याच्यावर आपण 5 वर्ष अगदी मनापासून प्रेम केलं. शी…. तिलाच तिचीच लाज वाटू लागते.

रविवारी रोहन तिला बघायला येणार होता. रोहनला आई वडील नव्हते. एक बहीण आणि तो. दोघांनाही काका काकीने संभाळून मोठं केलं. रोहन लहान असतानाच रोहनच्या वडिलांनी देव आज्ञा घेतली. आणि रोहन ने जस ग्रॅज्युएशन केलं तशी त्याची आई हार्ट-एटक च्या निमित्ताने दोन मुलांना पोरक ठेवुन गेली. रोहनने खूप मेहनत घेऊन स्वतःच्या बळावर नोकरी मिळवली. बहिणीच लग्न लावलं. स्वतःच्या मेहनतीचं घर त्याने उभं केलं. त्यात त्याला त्याच्या काका काकूंनी खुप साथ दिली.

अश्यातच रविवारचा दिवस उजडला. प्रिया तयारी करून खिडकीत बसलेली. ती एकटीच कसल्या तरी धुंदीत हरवून गेलेली. इतक्यात रोहन गाडीतून उतरला. त्याच्याबरोबर त्याची बहीण तिचे मिस्टर आणि काका काकी देखील होते. रोहनची ही पहिलीच वेळ होती मुलगी बघायची. तो खूप घाबरत होता तोच त्याची बहीण त्याला धीर देत होती. किती घाबरतेसरे दादू तू. एवढं काही नसतं. हे बघ तुला नाही आवडली की नंतर कळवतो म्हणून आपण निघुया. आवडली तर हो बोलूया. आणि आता चल मुलीकडचे वाट बघत असतील. तुमच्या भाव बहिणीच झालं तर चला आता म्हणून काका बोलले तसे ते आता जाऊ लागले. रोहन वरती नभाकडे बघून एकदा पाय पडू लागला.. वाचव रे बाबा. ही पहिलीच वेळ आहे माझी. आणि जस तो खाली बघणार त्याची नजर खिडकीत एक टक हरवून गेलेल्या प्रियाकडे जाते. हवेने उडून डोळ्यांसमोर येणार तिचे ते केस. तो तिथेच तिच्या प्रेमात पडतो. त्याला माहिती नसत की तीच प्रिया आहे. कारण त्याने तिचा फोटो वैगेरे पहिला नसतो. तो असा पाठी राहिलेला बघून त्याची बहिण मागे येऊन दादू चलना असे बोलून त्याचा हात खेचत घेऊन जाते. रोहन पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडलेला असतो. जसे ते लोक जिने चढतात तसाच तो त्याच्या बहिणीला मागे खेचतो आणि सांगतो हे बघ मला आता आपण बघायला जाणार आहोत त्या मुलीत काहीच इंटरेस्ट नाही. मला कोणी तरी दुसरी आवडते. आपण नको ना बघायला जाऊयात हिला. बहीण हळूच त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलते. तू वेडा झालास का आणि तू हे मला आत्ता सांगतोस. तुला कोणी तरी आवडते म्हणून. एक काम करू आता आत जाऊ आणि त्यांना नंतर सांगतो म्हणून बोलू. ठीक आहे. दोघांची कुजबुज ऐकून त्याचे जीजू बोलतात. तुम्ही दोघे इथेच ठरवत आहात का. चला वर्ती. काका काकू गेले पुढे. तिघ पन आता प्रियाच्या घरी येऊन बसतात. रोहन दिसायला साधासा पण चार चौघात उठून दिसेल असा. प्रियाच्या आई पप्पाना रोहन पसंत पडला. रोहनला तर कधी इथून निघतो अस झालेलं. रोहनचे काका मुलीकडच्याना काही प्रश्न विचारत होते आणि प्रियाचे पप्पा रोहनला. रोहनच्या काकांनी मुलीला बोलवा म्हणून सांगितले. रोहन खिडकीत बघितलेल्याच मुलीचा विचार करत बसला. प्रियाने आणून दिलेले पोहे त्याने प्रियाकडे न बघताच प्लेट मधून उचलले. प्रियाने देखील रोहनकडे बघितलं नाही. ती सगळ्यांना पोह्याने भरलेल्या प्लेट देऊ तिथेच बाजूला उभी राहिली. इकडे सीमा (रोहनची बहिण) हळूच आपला हाताचा कोपरा रोहन ला मारत एकदा तरी बघ तिच्याकडे म्हणून खुणावत होती. जेव्हा प्रिया चहाच कप घेऊ न पुन्हा रोहनजवळ आली तेव्हा फॉर्मेलिटी म्हणून रोहन प्रियाकडे बघू लागला आणि त्याचे हातच थरथरू लागले आणि इथेच प्रिया आणि रोहनची नजरानजर झाली. जिला दोन मिनिटं आधी आपण बालकणीत बघितलं तिला अस बघून रोहन पुरता घाबरून गेला आणि गरम चहा त्याच्या कपड्यावर सांडला. प्रियाचे पप्पा तिला ओरडू लागले व प्रियाच्या भावाने रोहनला आत नेलं व फ्रेश व्हायला सांगितलं. रोहन फ्रेश होऊन पुन्हा बहिणीच्या बाजूला येऊन बसला. बहिण आता आम्ही निघतो नंतर कळवू अस बोलून निघाली. सगळे तिच्याबरोबर निघाले. रोहन थोडा नाराजचा झालेला.
सीमा : दादू झालं की आता. अजून तू नाराज
रोहन : तुला कळत का. तू का लागेच निघाली तिथुन
सीमा : अस काय करतोस तुच बोललास ना तुला कोणी तरी दुसरी आवडते म्हणून
रोहन : अग ते तर मी… मी.. ते तर…
सीमा : काय झालं
रोहन : अग मी घाबरून बोललो ग. मला ही मुलगी पसंत आहे.
सीमा : खरच दादू…
अस बोलून आपल्या दादाला मिठी मारते. प्रिया खिडकीतून बघत असते. तिला भाव बहिणीच प्रेम बघून गहिवरून येत. तीने स्वतः कधीही अशी स्वतःच्या दादाला मिठी मारलेली नसते. किंवा कधी एवढी जवळीक सुद्धा नसते. पण ह्याचा अर्थ असा नाही की तीच तिच्या भावावर प्रेम नाही. प्रेम खूप आहे पण ते व्यक्त होत नाही.
प्रियाला अजूनही वाटत होतं की ऋषी परत येईल तिच्याकडे. तिने त्याचा नंबर जरी मोबाईल मधून काढून टाकला असला तरी डोक्यात असलेल्या नंबरला ती कशी काय काढू शकते. झोपेत सुद्धा कोणी तिला ऋषीचा नंबर काय म्हणून विचारलं तरी ती सांगू शकेल. प्रिया आणि ऋषीत तशी भांडण होतच असायची तेव्हा देखील ती असेच त्याने नंबर वैगेरे डिलीट करून टाकायची. पण कधी तो तर कधी प्रिया एकमेकांना सॉरी बोलून मोकळे व्हायचे. तिला वाटलं ह्यावेळी देखील तेच होईल पण तसं झालं नाही. ऋषीने तिला फोन तर सोडा सादा मेसेजसुद्धा केला नाही. शेवटी प्रियानेच हार मानून ऋषीला फोन लावला. रिंग होत होती पण ऋषी फोन उचलत नव्हता.
सतत दोन दिवस प्रिया ऋषीला फोन लावत होती. शेवटी तिने कंटालून दोघांचा कॉमन मित्र सुयशला फोन लावला. पण सुयशला देखील काहीच कल्पना नव्हती तरी मी ऋषीशी बोलून सांगतो म्हणून त्याने फोन ठेवला. पण नंतर सुयशने फोन केलाच नाही म्हणून प्रियानेच फोन केला तर ऋषीला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही म्हणून सुयशने प्रियाला सांगितलं. प्रिया आता खूप रडली. पण अश्या रडण्याने काय होणार.

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा