कविता-का रे देवा असा रुसलास

Written by

कारे देवा असा रुसलास…

आमच्या कर्माची फळ
आम्हीच भोगावीत
हीच होती ना तुझी इच्छा
जी आज तू पूर्ण केलीस
कारे देवा असा रुसलास….
निसर्गाशी आम्ही केला खेळ
कदाचित तुलाच कळलं नसेल
कसा बसवावा आता ताळ मेळ
म्हूणूनच तु खेळतोयेस का रे खेळ
कारे देवा तू आज रुसलास…..
कसे दिवस बघ आलेत
पिंजऱ्यातले पक्षी मात्र
स्वच्छदतेने उडताहेत
आम्ही बुद्धिवादी प्राणी
मात्र कठड्यात अडकलोय
कारे देवा असा….
माणसांच्या डोळ्यातलं पाणी पाहून
आभाळही गदगदलं असावं
त्याच हे कधीही कोसळणं पाहून ….मनात आलं
तेही कदाचित आपल्यासाठी रडत असावं…
त्याच्या थेंबाथेंबातुन
जणू एक एक संदेश असावा
कारे देवा असा रुसलास….
माहिती आहे देवा
तू खरंच खुप रुसलास
म्हणूनच तर तू आता तुझी कवाडे सुद्धा बंद
तुझ्या पायरीवरही आम्हाला आता उजागिरी नाही
एवढंच काय देवा भुकेल्यासाठीच लंगर ही आता
बंद केलंस….
माफी मागतो आम्ही देवा
सर्व ठीक कर🙏🙏
©️®️ चारुलता राठी

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.