कविता

Written by

रम्य ती संध्याकाळ ,
मनातला तुझ्या आठवणींचा काळ ,
ते तांबड आभाळ ,
अस्ताला जाणारा तो सुर्य ,
खाली अथांग समुद्र,
फेसाळ लाटांचा किनारा ला स्पर्श,
पाण्यात ते पाय भिजणार,
पायाखालची वाळू सरकणार,
ऊभे असे आपण किनारावर ,
अन अचानक डोळे उघडण,
भळभळून आसवांच येण,
समोर तुझ्या फ़ोटोला हार ,
अरे हा तर होता फक्त भास,
पण अजुनही आहे मनाला ,
तुझ्या परतण्याची आस !!!!😔

सौ. राजेश्री पाटील..

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा