कविता

Written by

भोग

कुठल्या पापाची शिक्षा स्त्री जन्मा मिळे
मयसभेत कलियुगाच्या द्रौपदी अश्रू ढाळे
मायावी रूपी उभा दारी तो एक रावण होता
पावलोपावली फिरताहेत मुखवटेच आता
शील रक्षण्या पांचालीचे श्रीकृष्ण धावला
कलियुगात वैदेहीचा नच कोणा आक्रोश कळला
हवी आम्हा लोपामुद्रा, अनुसया पतिव्रता
तिचं शील हीच झाली का तिची दुर्बलता
सरली युगं,सरला काळ हा भोग ना संपला
कर पसरूनी फिरे जानकी आजही न्यायाला.

स्नेहा डोंगरे

All rights reserved

Article Tags:
· ·
Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा