कवितेचा जन्म

Written by

#कवितेचा_जन्म

सोप्पं नव्हे कविता करणं
मुळात कविता नाही करत
त्या आपसूकच सुचतात
कवितेच्या या जगात
ठरवून काहीच नसतं घडत
ताक घुसळत रहायचं
अलगद तरंगतो लोणीगोळा
कवितेचंही असतं तसचं
मनातल्या जाणिवेंशी
रहायचं खेळत,
शब्दांचे मोती स्फुरतात आपसुकच
आपण फक्त लेखणी धरायची
निमित्तमात्र
आपसूकचं घरंगळतात
दोऱ्यातूनी, मनाच्या
कोऱ्या कागदावर
व्यायची असते कविता
तो कवितेचा जन्म
स्त्रीच्या प्रसववेदनेसारखाचं
सुटका होईपर्यंत
मन असतं अवघडलेलं
कविता जन्मल्यावर मात्र
कवीमन तिला पहातं निरखून
बिंबप्रतिबिंब पाहून जातं हरखून
नाही समजली व्रुत्त,गणं
नसे काहीच हरकत
स्वतःसाठी लिहाव्या
की चार ओळी उलीशा
अगम्य ,संस्कृत शब्द
म्हणजे का काव्य
नव्हे ओ तसं मुळीच
कविता सहज,सरल,सुगम
अशी बहिणाबाईंची छान
कवितेने घ्यावा सकलांच्या
अंतरीचा ठाव

—-गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा