कवितेवरची कविता

Written by

एकदा कविता वाचता वाचता तो म्हणाला
किती सुंदर कविता करतेस
कवितेतून बरंच काही बोलतेस
मी म्हटलं,
शब्दांची फुलं अशी गुंफायला आवडतात मला
अशी सुंदर फुलं मी भेट देताना
किती आनंद होतो तुला !
तो हातातल्या कवितेच्या कागदाकडे
पाहत हसुन म्हणाला,
मलाही शिकव असे शब्द ओळीत गुंफायला
कवितेवरच करेन मग एखादी कविता.
स्नेहा डोंगरे

 

 

 

Article Tags:
·
Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा