कादंबरी लेखन स्पर्धा

Written by

ईरा वरील सर्व लेखकांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत..लेखनाची शैली आणि नवनवीन विषयांमुळे वाचकांना वाचनाचा अनोखा खजिना ईरा ब्लॉगिंग या व्यासपीठावर मिळतोय. लेखकांच्या याच लेखणीला अजून बहरदार करण्यासाठी आणि वाचकांना नवनवीन शैलीच्या कथा मिळण्यासाठी सादर करत आहोत एक अनोखी स्पर्धा “कादंबरी लेखन” स्पर्धा.
कादंबरी म्हणजे एखाद्या विषयाची खोली आणि रसभरीत वर्णन..या स्पर्धेसाठी नियम:

  1. ज्या लेखकांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी वेबसाईटवर लॉगिन करून आपली कथा पोस्ट करावी. irablogging.com
  2. नवीन लेखकांना अकाउंट सुरू करायचे असल्यास आम्हाला मेसेंजर वर कळवावे, आम्ही लॉगिन डिटेल्स पुरवू.
  3. या स्पर्धेचा सक्त नियम म्हणजे रोज अथवा जास्तीत जास्त 2 दिवसांनी भाग पोस्ट झालाच पाहिजे. अन्यथा कथा ग्राह्य धरली जाणार नाही.
  4. कथेच्या शिर्षकासमोर #कादंबरी असा उल्लेख असावा.
  5. पुढील भाग लिहत असताना मागील भागाची लिंक ब्लॉग मध्ये द्यावी, ब्लॉग पोस्ट करताना वर लिंक चा ऑप्शन असतो.
  6. मागील भागालाही पुढील भागाची लिंक एडिट करून टाकावी. ब्लॉग एडिट करायचा असेल तर लॉगिन करून आपल्या ब्लॉग वर जाऊन वर पेन्सिल सिम्बॉल वर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता.
  7. लिखाण कमीत कमी ६० भागात व्हायला हवे. मार्च महिनाअखेरीस निकाल जाहीर होईल . अंतिम तारीख ३० मार्च.

काही अडचण अथवा प्रश्न असल्यास ईरा फेसबुक पेजवर आम्हाला मेसेज करू शकता

Comments are closed.