काय करतेस? झोपली का?? कुठे राहतेस??

Written by

कामाचा लोड असल्याने मी रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन होती. ब्राउझर मध्ये दुसर्‍या टॅबमध्ये फेसबुक चालु होते. अर्थात मी ऑनलाईन आहे असा सर्वांचा समज झाला होता. पण त्यावेळी माझ्यासोबत असं काही होईल याची मला कल्पनाही नव्हती. रात्री एक वाजता एका अज्ञात मुलाचा फेसबुक वर मला मेसेज आला. आता हा मुलगा कोण? मी तर त्याला ओळखतही नाही आणि हा माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये कसा हा प्रश्न मला पडला. मग मी त्याची प्रोफाईल चेक केली आणि माझ्या लक्षात आले की हा माझ्याच कॉलेजमधला माझा ज्युनियर होता. अर्थात जूनियर मुलं सीनियर मुलांना करियर संबंधित अथवा पुढील शिक्षणासंबंधी सल्ले विचारत असत. मलाही तेच वाटले, कदाचित या मुलाला करिअर संबंधी काही सल्ला हवा असेल किंवा काही मार्गदर्शन हवे असेल म्हणून कदाचित त्याला माझ्याशी बोलायचे असते असे मला वाटले आणि मी त्याला रिप्लाय केला.

पण पुढे जे काही बोललो ते ऐकून माझे मन सुन्न झाले. त्याने नको त्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. काय करतेस कुठे राहतेस वगैरे. आता त्याचं इंटेन्शन वेगळा आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी मी त्याला सांगितले की मी माझ्या बाळाला झोपवत आहे. मला वाटलं की माझं लग्न झालंय आणि मला बाळ आहे हे ऐकून तो कदाचित बोलणं सोडून देईल, पण या गोष्टीने त्याला काहीही फरक पडला नाही. मग शेवटी मी वैतागून त्याला म्हटले जा झोपून घे. त्यावेळी त्याने मला असे उत्तर दिले की “ तु येना जवळ झोपायला”, त्याच्या ह्या उत्तरावर मी भडकले, त्याला म्हटलं “ तुझ्या आई बहिणीला जवळ झोपायला”… आणि त्याने उत्तर दिले ते म्हणजे कहर.. तो म्हणाला “ त्यांनाही बोलवतो पण तुही ये” तत्क्षणी मी त्याला ब्लॉक केलं.

मनात विचार आला, की असा अनुभव आलेली केवळ मी एकच मुलगी नाही, अनेक महिला म्हणजे अगदी पन्नाशी साठी ओलांडलेल्या, मूलबाळ नसलेल्या किंवा अगदी शाळेत जाणार्‍या मुलींना सुद्धा अशा व्यभिचाराचा सामना करावा लागतो. विचारही करत नाही की समोरची महिला एक आई आहे, एक आजी आहे किंवा कोणाची तरी पत्नी आहे.. कसलाही विचार न करता ही सुरु होतात.

वयाचा आणि नात्यांचाही विचार न करता ही मुलं का अशी वागत असतील?? कारण तरी काय?? तर याचे उत्तर मला सापडले. एकदा इंटरनेटवर काम करत असताना चुकून एका एड च्या लिंक वर क्लिक झाले आणि आणि एक पॉर्न साईट ओपन झाली. तिथे जे काही पहिले ते बघून धक्का बसला. तुम्ही अश्लील व्हिडिओ टाकता ठीक आहे, पण “ आईसोबत”, “ वडिलांसोबत”, मुली सोबत, “ भावासोबत” आणि “आजोबांसोबत”… ????? माझा विश्वासच बसेना…अशी नाव टाकून पवित्र अशा नात्यांना गालबोट लावणारी ही साईट…एव्हाना अशाप्रकारच्या सर्व साईट या सर्वाला कारणीभूत आहे. पॉर्न विडिओ दाखवणे इथवर ठीक आहे..अरे पण तुम्ही यासाठी नात्यांना का गालबोट लावताय??? नर आणि मादी मधील कामभावना दाखवणे इथपर्यंत ठीक असते अरे पण म्हणून त्या दोघांमधील नातं भावा बहिणीचं, आई मुलाचे आणि आणि आजोबा दाखवून संस्कृतीला काळिमा फासायची काम ही लोकं पैसे मिळवण्यासाठी करत आहे. तुम्हाला अनुभव असेल, भारतीय संस्कृतीने प्रत्येक नात्याला एक पवित्र जोड दिलेली आहे, काही बंधनं काही मर्यादा घालून दिलेले आहेत पण ह्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम ह्या अशा वेबसाइट करत आहे. आणि हे सर्व पाहूनच मुलं त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, मग समोरची व्यक्ती नात्याने, वयाने काय आहे याचा कुठलाही विचार केला जातो. जवळपास सर्व महिलांना अशा मेसेज तर सामना करावा लागतो.

तरुण मुलं हे पाहून अशाच गोष्टींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि समोर येतो तो व्यभिचार. त्यामुळे भावी पिढीला आपण योग्य ते संस्कार घेऊन त्यांना अशा मार्गावर आणण्यापासून कसे रोखू शकतो या गोष्टीचा केवळ आपण या क्षणी विचार करू शकतो.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा