काय घाई आहे????

Written by

काय घाई आहे???

राधाने आज रवीसोबत स्पष्ट बोलायचे अस ठरवलच होत … ती त्याच्या येण्याची वाटच बघत होती…. रात्री उशिरा आला रवी….. तो बाहेरूनच जेवून आला होता…. रात्री रवीला निवांत बघून राधाने विषय काढला…..

रवी मी प्रेग्नन्सी टेस्ट केली निगेटिव्ह आहे …. पण आई??? त्यांना खरच वाटत नाहीये… सारख्या विचारत असतात… अस कस?? पाळी चुकली म्हणजे राहीलच असेल….

सकाळी उठली की तोच विषय आणि संध्याकाळी आॅफीसमधून घरी आल्यावर पण तोच विषय….

आज तर घरी आल्या आल्या पर्स जागेवर ठेवतेय तोच आत्या आणि आई बेडरूम मध्ये येउन बोलु लागल्या….

राधा राहिल असेल तर राहू दे…. उगाच गोळ्या खाऊन पाडू नकोस…. मी त्यांना सांगितले की अस काही नाहीये… मी चेक केल…. आणि माझ्या मनाची तयारी तरी आधी होऊ देत…. तशा त्या दोघी म्हणतात की त्या माझ्या आईबाबांना बोलावून बैठक बसवतील…. आणि मूल नाही झाल तर लोक मला वांझोटी म्हणतील… रवी तुला सोडून देइल नी दुसर लग्न करेल….. मी त्यांना म्हटले की मला मुलं नको अस मी म्हणतच नाहीये…. फक्त ते जेव्हा व्हायच तेव्हा होईल…..

काय रे तु खरच मला सोडून देशील??? (राधा रवीला म्हणाली)

रवी : नाही ग…. माझे राणी…. आई माझ्यासुद्धा याच गोष्टीवरून मागे लागली आहे म्हणून मी पण मुद्दाम घरी उशिराने आलोय….. मी response देत नाही म्हणून तीने तुला target केल…..

राधा : आईंनी मम्मीला फोन करून सांगितलं. … तिनेही फोन केला होता….. तिलाही मी तेच समजावल आहे….

रवी : हमममम्

राधा : अरे….. लग्नाला फक्त दिडच महीना झाला आहे मला या नवीन घरी रमू तरी देत…. शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम तर बनू देत…. पहिल्यांदाच सगळ घडतय तर हळूहळू ते सांभाळू तरी देत… नवीन घर, नवीन नाती सगळ्या नवीन गोष्टी एकदम नका ना टाकू…. फक्त मूल जन्माला घालून नाही चालत त्याच खानपान, शी, शु, औषधपाणी या बेसिक गोष्टी पण किती महत्वाच्या असतात या सगळ्या मलाच कराव्या लागणार, पुरुषमंडळी यात लक्ष घालतात का??? रवी तुला तेही शिकाव लागेल… कारण यासाठी नाही कि सगळं बाईनेच का कराव??…. तर यासाठी की,  बाळाची ओढ तुझ्यासाठीही राहील…. मी available नसताना बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून…… आणि माझ्या मुलाला मी दुसर्‍या च्या जीवावर का जन्माला आनू…. म्हणजे सासूसासरे संभाळतील ते सांगतात ना म्हणून जन्म देऊ बाळाला???…..

मलाही बाळाची ओढ आहे पण म्हणून कोणाचीही घाई नको…. मी कोणत्याही गर्भ निरोधक गोष्टी अवलंबत नाहीये …..

माझ येवढच म्हणण आहे की उगाच मला torture तरी करू नका रे….. नवीन संसाराची भीती तरी कमी होऊ देत आणि आमच्या सासूबाईंनी हे लाडावलेल बाळ जे माझ्या पदरी टाकल आहे आधी त्यालाही थोडी कामाची शिस्त लागू देत…. जबाबदारीची जाणीव होऊ देत ….

रवी : काय म्हणालीस????

राधा : (गालात हसून) कुठे काय ?? काही नाही….. हेच म्हटलं की, आधी कोणत्या बाळाला सांभाळू ….. सासूबाईंच बाळही अजून लहानच आहे…..

(रवी एक कटाक्ष टाकतो आणि दोघेही हसायला लागतात ….. )

सदर कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही…. लेखिकेने फक्त नवीन लग्न झालेल्या स्त्रियांच्या मनाची घालमेल मांडण्याचा प्रयत्न केला आहे….

कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा…..

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत