काय द्यावं तिने उत्तर??

Written by

तिच उत्तर,…
©स्वप्ना मायी(मुळे)
पाणावलेले डोळे पुसत ती निर्धाराने उठली तशी दरवेळेसच स्वतःला समजावत परत वास्तवात आणत ती रमवून घेतेच पण बऱ्याचवेळा हे आजूबाजूचे लोक ना तिला डिवचून हतबल करतात,…तिला कोसळवायच असतं ह्या सगळ्यांना कारण त्यांना आश्चर्य वाटतं ना,..नवरा नसताना मुलं घेऊन इतकी आनंदात आणि व्यवस्थित कशी राहू शकते हि,…
3वर्षा पूर्वीच अपघातात तो गेला आणि तिनं मुलांकडे बघुन सावरलं स्वतःला,…तिला माहीत होतं आहे त्या परिस्थितीत आपल्याला उभं राहणं गरजेच आहे,…आता साथ देईल त्याने जिद्दीने घ्यायला लावलेल शिक्षण,…आणि खरंच चांगल्या शाळेत ती शिक्षिका म्हणून लागली,…त्याच्या आठवणींच्या जख्मा मनात लपवत,चेहऱ्यावर हसू आणत कधी कठोर होऊन बाप बनायची तर कधी दोन्ही चिमणे कुशीत घेऊन रडणारी आई तर कधी टक्क डोळे उघडे ठेवून निश्चल पणे आयुष्याकडे बघणारा देह,…तारुण्य आणि भावना बहरण्याच्या या वयात तो तर गेला निघुन,… ती कधी कधी घुसमटून जायची पण मन खम्बीर करून परत उभी रहायची,…सगळे म्हणायचे अग वय काहीच नाही तुझं परत लग्न कर,…ती उदास हसायची,…एवढं सोपं असतं,.. आपल्या पोटचे दोन लेकरं घेऊन परत कोणाचा संसार करणं,… आणि माझ्या लेकरांसहित लग्न केलं तर ठिक नाहीतर मुलं कोणाच्या हवाली करून मला ते तस सुख नको तिने एकदा स्पष्टच केलं नातेवाईकांसमोर,…
दिवस असेच उदास जात होते,….एक दिवस तो आला तिच्या आयुष्यात,.. लग्न न झालेला पण वयाने तिच्याऐवढाच,… कारण वर्गातच होते गावाकडे शिकताना,….ती आवडत होतीच पण तिने कधी होकार दिली नाही,…घरचे आडवे येणार हे ती घरच्या वातावरणावरून जाणून होती,…ते प्रेम तिने तसंच दूर लोटलं होतं,… नेमकं तिच्याच शाळेत नोकरी त्यालाही मिळली,… आधी घाबरली ती टाळायची त्याला पण एक दिवस स्टाफरूम मध्ये नेमके दोघ,…त्याने हाक मारलीच,…सरू,… बोलायचं नाही का,..?ती घाबरली पण म्हणाली,.तसं काही नाही पण तू ओळखतो कि नाही?,..तुला कसा विसरेल ग,…तेवढया वाक्याने तिला शहरल्यासारखं झालं,…तिला ते जाणवलं,…आणि छानही वाटलं,…किती दिवसांनी असं आतून शहारलो आपण,…त्याच्या एकेरी हाकेनी आणि अजूनही डोळ्यात असणाऱ्या त्या प्रेमाने,…तेवढ्यात त्याच्या प्रश्नाने ती भानावर आली,… तु शिक्षण कधी केलं ग पुर्ण,… तुझ्या बाबांनी तर आपली कुणकुण लागताच लग्न आटोपलं होत तुझं,…खरंतर तू नाहीच म्हणाली होतीस,..तरी हट्टाने मी तुझ्या बॅगेत टाकलेलं पत्र,..आणि पुढची घटना,…तुला सॉरी म्हणायला सुद्धा मिळालं नाही,..
ती उदास हसली,…म्हणाली नको म्हणू सॉरी,…मलाही आवडलं होत तुझं माझ्यावर प्रेम करणं,…पण माणसाला चिटकलेली हे संस्कार आणि प्रेमाची ,कर्तव्याची नातू,…त्या प्रेमाला साद घालू देत नव्हती,..बरं जाऊ दे ते,….मी नशीबवान होते रे,..मला खुप बुद्धिमान नवरा मिळाला,.. त्याने मला शिक्षण दिलं आणि आज मी इथे आहे,…तिचा नवऱ्याचा विषय निघताच तो जरा चाचपला अरे हो हे आता परक्याचे धन,…उगाच विचारायचं म्हणून तो म्हणाला काय करतात तुझे मिस्टर,..?तिने रोखून बघितलं त्याच्याकडे,…का तुला माहीत नाही ते वारले 3 वर्षापूर्वी,.. काय???तो शॉक,… आनंद आणि दुःख ह्याचे वेगवेगळे दान नियती पदरात टाकत राहाते,… आपण स्वीकारायचं आणि पुढे चालायचं हे शिकले आता मी,…एकटीच राहतेस???त्याच्या ह्या प्रश्नावर तिने रागाने बघितलं त्याला म्हणाली, नाही माझ्या चिमण्यांना घेऊन राहते,…दोन लेकरं आहेत त्यांची निशाणी,…तेवढ्यात दुसरे शिक्षक आले आणि बोलणं खुंटल,…मग सतत बघणं,हसणं चालू राहील,…उगाच मनाच्या तळ्यावर तरंग उठायचे कधीतरी,…एकदा त्याने विचारलच,…आता लग्न करशील माझ्याशी,…??प्रश्न त्याने विचारला तरी ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात राहिली,…आता वाचकांनी ठरवावं तिने काय उत्तर द्यावं आणि कथेचा शेवट करावा😊

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा