काय सांगशील ज्ञानदा

Written by

#काय सांगशील ज्ञानदा#

“नमस्कार मी ज्ञानदा कदम
ABP माझा वर तुमचं स्वागत करते”
रोज सकाळी टीव्ही सुरु केल्यानंतर ऐकायला मिळणारा एक ओळखीचा आवाज ..म्हणजे ज्ञानदा..
लहानपण आर्मीच्या शिस्तीत घालवणारी आणि घरच्यांच्या शिक्षिका बनण्याच्या अपेक्षेला सुरुंग लावणारी ज्ञानदा..
मला बोलायला खूप आवडतं म्हणून या क्षेत्राकडे मी स्वतःला वळवले म्हणणारी ज्ञानदा..
2007 सालच्या रिपोर्टर पासून आजच्या घडीला एक उत्कृष्ट अँकर म्हणून यशस्वी वाटचाल म्हणजे ज्ञानदा..
आतापर्यंतच्या कारकिर्दीत दोन वेळा उत्कृष्ठ अँकर चा पुरस्कार मिळवणारी आपली मराठी मुलगी ज्ञानदा..
लग्नानंतरही घरच्या चटणी मिठापासून भाज्यांपर्यंत लक्ष ठेवत असताना कामाचा तोच वेग कायम ठेवणारी ज्ञानदा…
हैद्राबाद केस असो वा हिंगणघाट घटना पाणावलेले डोळे पुसत रिपोर्टींग करणारी ज्ञानदा..
प्रेक्षकांच्या काय सांगशील ज्ञानदा ?या प्रश्नाला कोरोना व्हायरस च्या संक्रमणाच्या काळात काळजी कशी घ्यावी यावर भाष्य करणारी ज्ञानदा..
पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीसाठी एक आदर्श म्हणजे ज्ञानदा..
न्युज चॅनेल च्या स्पर्धेच्या काळात स्वतःचा आवाज बुलंद ठेवणारी ज्ञानदा..
“स्पर्धा असो वा संघर्ष
दाखवले तू पुन्हा एकदा..
आता तुझाच ट्रेंड तुझीच चर्चा
यावर काय सांगशील ज्ञानदा..?

बघ ज्ञानदा..मलाही तुझ्याविषयी लिहू वाटलं..
यावर तू काय सांगशील ज्ञानदा..
-©स्वाती रुकडे

सदरची पोस्ट share करावयाची असल्यास नावासहित share करावी हि विनंती.

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.