“कारण, ती अजून लहान आहे…”

Written by

रेवा…

आमच्या बिल्डिंग मध्ये राहायला आली…

काही दिवसांतच आमची छान मैत्री ही झाली…

तिला दोन मुलं, सहा-वर्षाची मुलगी अन्वी आणि एक वर्षाचा मुलगा अभि….

मला वाटलं, आता मुलांना पण छान खेळायला सोबत मिळेल…

सकाळी आमचे अहो कंपनीत गेल्यावर मी तिला चहाला invite केले…
चहा आणि सोबत garlic bread मी बनवली होती…

माझा छोटा 2 वर्षाचा मुलगा छान नीट बसून ब्रेड खात होता पण अन्वी ब्रेड हातात घेऊन घरभर फिरत होती.

मला वाटलं थोड्यावेळाने खाईल नीट…

बरं खायचं तरी ना मग फिरताना किंवा नसेल आवडलं तर तसं सांगायचं आणि ठेवून तरी द्यायची ब्रेड…
आणि हे सगळं करताना ठिकठिकाणी ती ते बटर चे हात सगळ्या भिंतींना, toys ला आणि कपड्यांना लावायची आणि ही तिची मम्मी तिला नुसतंच बघतेय पण काहीही सांगत नाही की अन्वी असं नको नीट बसून खा किंवा कपडे खराब होतात आहे किंवा आणखी काहीतरी….

शेवटी मीच म्हटले जो नीट बसून खाईल त्याला एक surprise मिळेल तेव्हा ती बसून खायला लागली पण ते सुद्धा रेवा चारून देत असेल तर…

काही काही मुलं मूडी असतात सो मिक्स व्हायला कदाचित वेळ घेईल असं मला उगीच वाटून गेलं पण ती या मुलांपेक्षा मोठी म्हणून तिच्याकडून थोडंतरी मोठपणाची अपेक्षा होती एवढंच…

निदान आपल्या छोट्या भावाला तरी सांभाळत असेल असं वाटलं कारण 6 वर्षाची म्हणजे थोडं समजतं असं मला वाटते…

पण माझा पार अपेक्षाभंग च झाला…
ती अगदीच 2-3 वर्षाच्या मुलासारखं वागते..

हट्टीपणा, राग येणे, हे तर नसानसांत भिनले आहे हे लक्षात यायला मला वेळ नाही लागला…

मूडी तर ती आहेच शिवाय attitude पण एवढा भरलाय की एखाद्या actress ला ही मागे टाकेल….

पण एवढं असलं तरी ती मुलांसोबत मिक्स होईल आणि खेळेल तर तिची ही सवय कमी होईल असे मला वाटले पण…

असो…

एक दिवस तिच्या आईशीच थोडी या बाबतीत चर्चा करावी म्हटलं पण तिची आई तिची बाजू एवढ्या प्रखरतेने समजावू लागली की मला असं वाटलं माझंच चुकलं आणि माझाच गैरसमज झाला असेल किंवा मी जरा जास्तच अपेक्षा बाळगल्या असेल…
रेवा मला म्हणाली की “अगं, ती अजून लहान आहे न, तिला कळत नाही गं…”“लहान मुलांना समजत नाही ठीक आहे पण तुला तर कळतं न मग तू तिला नीट समजाऊन तर सांगू शकतेस ना…

काय करायचं काय नाही हे तर सांगू शकतेस…

नाही जास्त पण निदान  “असं नाही करायचं बाळा”…. एवढं तर म्हणूच शकते ना..” मी मनात पुटपुटले…

हळूहळू मला अन्वी च्या सगळ्या सवयी लक्षात येऊ लागल्या पण मी काही बोलली किंवा समजावून जरी सांगितलं तरी अन्वीला राग यायचा मग तिच्या पप्पांना ती सांगायची… आणि त्यांना पण राग यायचा…

एकदा त्यांनी आम्हाला डिनर ला Invite केले होते….

आम्ही ही गेलो….

रेवा ला help करावी म्हणून मी जरा लवकरच गेले…

स्वयंपाक झाला…

वाढायला घेते म्हटलं तर ही अन्वी सारखी मध्ये मध्ये रेवाला डिस्टर्ब करत मला icecream च पाहिजे, मला दही च हवं, मला हे, मला ते…

रेवा ही हातातलं काम टाकून तिला जे हवं ते देत होती पण असं काही म्हणत नव्हती की, आता नको, जेवायचं आहे, दही जेवताना घे, icecream नंतर देते पाहिले जेवण कर…
न राहाहून मीच हे सगळं बोलण्यात पुढाकार घेतला कारण माझा मुलगाही ते सगळं बघत होता आणि अनुकरण करण्यात मुलं पुढेच असतात…

तर तिच्या वडिलांना माझा राग आला हे माझ्या थोड्याच वेळांत लक्षात आले…

त्यांचं म्हणणं की लहान मुलांना ते जसं करतात तसं करू द्यावं नाहीतर बालमनावर परिणाम होतात…?
तर यावर रेवा म्हटली,

“अगं, ती अजून लहान आहे….”त्यानंतर मी तिला बोलणे बंद केले…
पण माझ्या मुलाची जबाबदारी माझ्यावर त्यामुळे मी त्याला तरी काय करायचं आणि काय नाही ते नीट च सांगते… वेळ पडली तर रागावतेही कधी कधी तर हात पण उठतो… फाजील लाड आपल्याकडे पुरवलेच जात नाही…

मग काय,

जेवण करतानाही तिचा वेगळाच ताल,

अन्वी चे जेवण तर केले पण तिने अंगावर आणि पायावर खूप काही सांडवून ठेवले होते, ती तशीच उठली आणि त्या खरकट्या पायाने सगळीकडे फिरू लागली…

मी बघतच राहिले …

रेवा- “अगं ती अजून लहान आहे…”हे असे रोजचे प्रसंग विविधतेने माझ्या आणि माझ्या मुलाच्या नजरेस पडायचे…

अन्वी ला तिच्या आईने दूध प्यायला सांगितले..

ग्लासभर दूध ही आणून दिले,

थोड्यावेळाने परत येऊन बघते तर दूध तसेच…

रेवा— “अगं दूध नाही संपवलं..”

अन्वी — “तू पाजून दे.”

रेवा दूध पाजून देते.

” कारण, ती अजून लहान आहे “वाढलेले ताट समोर असून हिचं लक्षच नाही

रेवा— “अगं, अन्वी जेवून घे बाळा.’

अन्वी— “तू चारून दे.”

हातातलं काम टाकून रेवा चारून देते

“कारण, ती अजून लहान आहे”अन्वी आमच्याकडे —

सायकल खेळणार, गेम खेळणार, tv बघणार ते ही स्वतःचे आवडते कार्यक्रम…
माझा मुलगा तिच्यासोबत खेळायला जातो… दीदी दीदी आवाज देतोय पण ही ‘ओ’ काही देत नाही..

सायकल तर त्याला देत च नाही…

रेवा— “अगं, ती अजून लहान आहे…”आम्ही अन्वीकड़े—

ती लॅपटॉप बघत असते…

तिचा भाऊ आजूबाजूला खेळतोय,आई सांगते की अभिकडे लक्ष दे,पण तिचं अजिबात लक्ष नाही.

तो चालत चालत लॅपटॉप लावलेल्या एक्सटेंशन बॉक्स कडे जातो आणि पिन काढतो पण अन्वी लक्ष च नाही शेवटी माझा मुलगा त्याला तिथून बाजूला करून kitchen मध्ये आमच्याकडे घेऊन येतो…
यांवर ही रेवा ती फार concentration नी बघते त्यामुळे इकडे तिकडे तिचं लक्ष जात नाही… तिला लक्ष द्यायचं कळत नाही गं.

“करण, ती अजून लहान आहे गं”माझा मुलगा तिची सायकल घेऊन फिरवायला लागतो…

अन्वी— “अरे, नको, लागेल तुला… मोठी सायकल आहे ती नको खेळूस…”
माझा मुलगा सायकल ठेवतो.

लॅपटॉप बघायला लागतो.

ती त्याच्यासमोर येऊन बसते आणि चित्र-विचित्र आसनात आळस देतेय, जेणेकरून माझ्या मुलाला लॅपटॉप दिसू नये…

माझा मुलगा माझ्याकडे बघतो .

रेवा हे सगळं बघत असते पण दुर्लक्ष करून हसतेयं.

शेवटी मीच रेवाला म्हणते, अगं, याला दिसत नाहीये… तेव्हा ती म्हणते, अन्वी त्याला पण बघू दे…

ती नाक मुरडत तयार झाली .

“कारण, ती अजून लहान आहे…”अन्वी तिच्या आईचा मोबाईल घेऊन माझ्याकडे…

ती आणि माझा मुलगा खेळत होते छान. मलाही बरे वाटले..
ती एकटीच काहीतरी बोलतेय असं वाटलं म्हणून मी बघायला गेली तर ही तिच्या आजीशी फोनवर बोलत होती..

आवाज तिचा मोठा असल्याने मला सगळं kitchen मध्ये सुद्धा स्पष्टच ऐकू येत होतं…

इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर तिने तिच्या मम्मी पप्पाच्या एकमेकांत झालेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तसं पाहिलं तर त्या private गोष्टी होत्या पण ही लावलावी च होती सासू-सुने मध्ये…

त्यानंतर दोन दिवसाने रेवाचे आणि तिच्या सासूचे दोन दोन शब्द झालेले रेवाने मला सांगितले तेव्हा मी या झालेल्या प्रकारची माहिती दिली तर ती मला म्हणाली,

“अगं, ही अन्वी ना अशीच आहे. तिचा तिच्या आजीवर फार जीव त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट त्यांना सांगते. अगदी खाण्यापिण्यापासून तर झोपेपर्यंत…. कळतं नाही तिला…”

“कारण,ती अजून लहान आहे…”“पण अगं तुम्हाला तर कळतं ना…  ती लहान आहे तर तिच्यासमोर अशा गोष्टी बोलू नये.. ” – मी

अन्वी रेवावर तिच्या आजीसारखी ओरडते.. रेवाने एक जरी म्हटले तरी अन्वी तिला दहा गोष्टी सुनावते…

“कारण, ती अजून लहान आहे…”आपल्याकडे चार चार बार्बी सेट आहेत तरी एक नवीन हवाच असतो…

रेवा तिला सिंड्रेला घे म्हणते किंवा जे नाही ते घे म्हटलं की अन्वी तिला ओरडते मग ही तिला घेऊन देते…

“कारण, ती अजून लहान आहे…”अन्वी ला आज केक हवा म्हणजे हवाच असतो तो पण घरचा…

मग वेळेवर सामान आणून करावा लागला तरी चालेल पण हवं ते हवंच…

रेवा छोट्या मुलाला माझ्याकडे ठेऊन सामान आणून केक करून देते नाहीतर ती जेवत नाही…

“कारण, ती अजून लहान आहे…”असं फक्त केक च्या बाबतीत नाही तर icecreame, मैसूर पाक, अशी खूप बडी लिस्ट आहे मॅडम ची…

ब्लॅकमेलिंग तर सगळ्याच बाबतीत…

“कारण, ती अजून लहान आहे…”एक दिवस तर अन्वी ने उठल्या उठल्या रेवाची साडी काढून ठेवली म्हणे की, “तू मम्मी आजकाल साडी घालत नाही तर तू आज साडीच नेस नाहीतर मी आजीला सांगेल…”

रेवा मॅडम पण लगेच तयार झाल्या…

मला म्हणाली अन्वी चं ऐकावं लागतं गं, तिला कळत नाही. तिला रडायला येतं. फार हळवी आहे ती…

“कारण, ती अजून लहान आहे…”हा किस्सा थोडा मजेशीर ….

लगीनघाईचा…

लग्न समारंभाचे दिवस सुरू..

त्यात घरांत पण हसी मजाकीचे वातावरण…

रात्री काहीतरी ऐकून झोपली असेल त्यामुळे रात्री झोपेत सतत धुसफूस अर्थात स्वप्नांतच…

सकाळी उठून ती तडक शेजारी असलेल्या तिच्या friend (मित्र)कडे गेली…

त्याच्या आईला मग ही सरळ च म्हणाली, “काकू मला नीरज शी लग्न करायचं, करून देता का??”

त्याची आईपण दचकली आणि हसत तिची गम्मत करत नाही म्हणाली तर मॅडम घरी आल्या रडत रडत आणि रेवाला म्हणे की, (रडतच) “मम्मी मम्मी , काकू मला नीरज शी लग्न करायला नाही म्हणत आहे… तू करून देशील ना !!! मला नवरी बनायचंय…”???
अन्वी ची आजी( हसत),

करून देऊ ग मोठी झाल्यावर हं..

“अगं माझी बाय ती, लहान आहे ग अजून”

आणि घरात एकच हास्याची लाट उसळली..

ही तर गंमत झाली…

एकदा तर कहर च झाला…

कसल्यातरी किरकोळ कारणावरून अन्वी ला राग आला तर ती म्हणाली, “मी नकोशी झालीये ना तुम्हाला तर मी आता जीव च देते.” आणि अशी म्हणत गेट उघडून रोड वर जाऊन थांबली…

तिचे आई वडील, आजी तिला समजावत होते तेव्हा मला कळले…

तर तिची आजी मला म्हणाली, अगं तिला कळत नाही ग. रागात जरा अशी वागते ती…

“कारण, ती अजून लहान आहे…”अशा एक ना अनेक किस्से आहेत….

पण कुठेतरी मुलांना आवर घालणे गरजेचे आहे…  त्यांना प्रेमाने आणि वेळ पडली तर दटावून ही सांगावं लागतं…रागवावं सुद्धा…

मुलांना पालकांचा धाक असणे हे सुद्धा गरजेचे च आहे… मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते असं नाही…

 

मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात मग ते चूक की बरोबर हे त्यांना कळत नसतं म्हणून मोठ्यांनी सुद्धा मुलांसमोर बोलतांना, वागतांना आपण काय बोलतो आहे, काय करतोय याचे भान ठेवावे अगदी फोनवर बोलतांना सुद्धा…

 

आणि हे काम फक्त आई वडिलांचं च आहे असं नाही तर त्या मुलाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या सर्वांनीच याचे भान ठेवावे मग ते आजी-आजोबा,काका-काकी, मामा-मामी किंवा इतर कुठलेही नातेवाईक आणि शेजारच्यांनी सुद्धा…

 

आपल्याकडे जर कोणी लहान मूल आलं असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करावा कारण कधी कधी आपल्या वागणुकीचे पडसाद बाहेर पडू शकतात…

सार्वजनिक ठिकाणी कधीही आपलं हसं होऊ शकतं हे लक्षात घ्यावे.(हा गमतीचा भाग झाला…?)

मुलांचे लाड पुरवणे हे जसे पालकांचे कर्तव्य आहे तसंच पाल्यांसाठी काय योग्य काय नाही हे लक्षात घेणे सुद्धा कर्तव्य च आहे…

काय बरोबर काय चूक हे मुलांना वेळच्या वेळी सांगणे, मोठ्यांचा आदर करायला शिकवणे, त्यांचं ऐकायला शिकवणे, एकमेकांचा मान ठेवणे, इतरांची काळजी घेणे, एकमेकांची मदत करणे, लहानांची काळजी घेणे,

Sharing-caring शिकवणे,

योग्य वेळी योग्य शिस्त लावणे,

स्वतःची छोटी- मोठी कामे करायला शिकवणे, मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहीत करणे,

तसेच घरातले काम शिकवणे आणि करायला लावणे हे ही महात्त्वाचेच आहे.

वेळोवेळी मुलांना स्वावलंबनाचे धडे देणे,

आलेल्या कुठल्याही प्रसंगांना स्वतःहून जबाबदारी घेऊन धीटाईने तोंड देणें….
मुलांचे कुठलेच फाजिल लाड न पुरवणे, आणि मुलांना (प्रेमळ )धाकात ठेवणे,

हे ही पालकांचं च कर्तव्यं आहे.

मेणाहून मऊ जरी असले, तरी प्रसंगी वज्राहून कठीण होण्याची क्षमता पालकांनी दाखवावी.

जर आजचे पालक असे वागलेत तरच उद्याची सुदृढ आणि परिपक्व पिढी घडेल…
असं मला तरी वाटते…

तुम्हाला काय वाटतं???

नक्की कळवा…


(शुध्द लेखनाच्या चुका माफ कराव्यात… लेख आवडल्यास like, share नक्की करा…आणि comments द्यायला विसरू नका…)

—दिप्ती अजमीरे.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा