कालचक्र – एक अनोखी प्रेमकथा 4

Written by

 

राघवने स्वराला फोन लावुन विचारायचं ठरवलं. पण तोच त्याला आठवलं की स्वराने अनघाचा रिस्युम त्याला पाठवलेला आणि तो न बघताच असाच त्याने रितुला दिला. त्याने सगळ्यातआधी मोबाईलमधला रिस्युम बघितला. आणि त्याला एकदम मोठा धक्काच बसला. अनघाच कॉलेज तेच होत ज्या कॉलेजमधून राघव शिकलेला. त्याच पासिंग वर्ष आणि हीच पासिंग वर्ष सेम म्हणजे अनघा माझ्याच कॉलेजमध्ये आणीत तेही माझ्याच क्लासरूमध्ये होती तर. पुढे ती शिकण्यासाठी बाहेरगावी गेली. तीथुन इंटरशीप करून मग ती पुन्हा भारतात आली. त्याने तसाच मोबाईल डेस्कवर ठेवला आणि डोक्याला ताण देऊन जुने दिवस आठवू लागला..

   तेच गोड हसणं, डोळ्यांत असणारा आत्मविश्वास आणि एकदम बिनदास्त बोलणं त्याला आठवू लागलं. म्हणजे अनु…. तीच अनघा राजे.. ह्या 8 वर्षांत ती फार बदलून गेली. कोणीही न ओळखणार अशी ती. कॉलेजमध्ये अगदी टॉमबॉय सारखी असणारी आता फार बदलुन गेलेलं तीच ते रूप.. पण स्वरा कशी हिला ओळखते.? स्वराचा आणि हिचा काय संबंध? खुप सारे प्रश्न राघवच्या डोक्यात आता घर करत होते.

   पण सगळे प्रश्न त्याने बाजुला ठेवुन हातातील काम संपवण्याचा प्रयत्न केला. तोच सरांनी अर्जेन्ट मिटिंगसाठी राघवला बोलावून घेतल. बराच वेळ मीटिंग झाल्यानंतर राघव बाहेर आला. बरच काम आज करावं लागणार होतं त्याला. त्याने होईल तेवढं काम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 7 वाजत आले. संपूर्णे ऑफिस हळुहळु खाली होऊ लागलं. बाहेर पावसाने जणू धुमाकूळ टाकला होता.अनघाच काम होत आल ति तिचा डेस्क आवरून राघवच्या जवळ आली.

अनघा : तुला काही हेल्प हवी का.?

राघव : नाही नको.. खूप उशीर होईल तु निघ.

अनघा थोडी पुढे जात पुन्हा मागे आली..

अनघा : राघव…

हम्मम…. राघवने लॅपटॉपमध्ये डोकं घालतच अनघाला बोलला..

अनघा : काही नाही…

काय झालं?? बोलशील… तिच्याकडे बघत..

अनघा : ते… तु… जाऊदे उद्या बोलू निवांत..

राघवला जणू माहीत होतं ती काय बोलणार होती.. त्याने जास्त विषय खोल जाऊ नये म्हणून काहीच बोलला नाही.

राघव : बाय.. गुड नाईट..

अनघा : बाय

राघवच काम होईपर्यंत जवळपास एक तास लागला.. काम होताच त्याने डेस्क आवरला. लॅपटॉप तसाच बेगेत भरला. आणि आईशी फोनवर बोलत तो ऑफिसमधून निघाला. थोड्याच वेळांत पोहचेल ह्याची कल्पना त्याने आईला दिली.

त्याने लागतच रोहितला फोन लावला..

रोहित : आज कशी काय आठवण झाली माझी??

राघव : कळेलच तुला… हे सांग अनघा तुला कुठे भेटली.?? आणि मला आधी का नाही सांगितलं तु हे? आणि स्वराचा काय संबंध ती कशी ओळखते तिला? तु काही बोलणार आहेस का नाही? काय विचारतोय मी रोहित??

रोहित : अरे हो हो मला बोलु देशील.. माझ्या आणि स्वराच्या लग्नाला एक महिना झाला. म्हणून आम्ही मो मंथली अनिव्हर्सरी डे सेलिब्रेशन करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. आणि अचानक अनु येऊन आमच्या टेबलवर बसली. तु जस ओळखलं नाहीस सेम तसच मी देखील तिला ओळखलं नाही.

अनु : तु रोहितना??

मी स्वराकडे बघतच तिला हो बोललो. मला थोडं फार अस वाटत होत की कुठे तरी पाहिलं हिला पन मेंदु काही साथ देईना

अरे अनु… विसरलास मला…

( तिनेच स्वतः ची ओळख करून दिली)

रोहित : अरे हाय.. होतीस कुठे… आणि हे काय.. एक दम पूर्णच बदलून गेली तु..

स्वरा आमच्या बोलण्यात बघतच बसली..

Meet my wife Swara..

स्वराला देखील मी तिची ओळख करून दिली.

नॉर्मली आमचं हाय हॅलो झालं. पुन्हा नंबर एक्सचेंज झाले. पण तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं की ती कोणत्या तरी कोड्यात अडकून गेलीय. न राहवुन तिने विचारलं..

अनु : तो काय करतो?? कसा आहे तो??

रोहित : कोण??

अनु : राघव.. आहे का तुझ्या संपर्कात अजुन तो.

स्वरा माझ्याकडे बघु लागली.

मी हो म्हणुन सांगितले.

हि स्वरा म्हणजे राघवची बहिण.. मी पुन्हा तिची स्वराची नव्याने ओळख करून दिली.

अनुला आता काय बोलावे कळेनाच.

राघव चांगल्या कंपनीत एक मॅनेजर म्हणुन कामाला आहे.

अनु फक्त ऐकत होती. कदाचित तिला कुठल्या तरी वेगळ्याच उत्तराची अपेक्षा असावी

रोहित : अजुन आहे तसाच आहे.. सिंगल..

तिने लगेच वर चेहरा करून माझ्याकडे पाहिले. डोळे तिचे चमकू लागले.

तिला तुला एकदा भेटायचं होत राघव. आणि तिला इथे येऊन मोजून चार दिवसच झालेले. जॉबची गरज होतीच तिला.

आणि स्वराला पण ती खुप आवडली.

म्हणुन स्वरानेच तिला तुझ्या कंपनीत नोकरीला लावायचे आश्वासन दिले.

राघव : झालं तुमचं?

रोहित : जस्ट चिल राघव.. प्रेम करणं गुन्हा थोडी आहे.. आणि तिला तु आवडतोस. ह्या तिच्या भावना तिने व्यक्त का नाही कराव्यात सांग. तस पण एके काळी तुम्ही छान मित्र होतात.

राघव : फक्त मित्र रोहित. तुला मी ह्या आधी देखील सांगितलं होतं.

रोहित : अरे हो राघव माझं ऐकुन तरी घे.. ती…

राघवने रागातच फोन कट केला.

अति काम आणि आता हे ह्या सर्व गोष्टीमुळे त्याची फार चिडचिड होत होती.

एक दीर्घ श्वास घेत त्याने स्वतःला शांत केलं.

रात्रभर स्वरा आणि रोहित त्याला फोन लावत होते पण त्याने कोणाचाच फोन उचलला नाही.

दुसऱ्यादिवशी तो कामावर जायला निघाला. लिफ्टमध्येच काव्या त्याला भेटली. राघव मोबाईमध्येच काही तरी करायचं म्हणून पाहु लागला. काव्या मात्र एक टक त्याच्याकडे पाहत होती.

राघव डेस्कवर जाईपर्यंत राघवला काव्या बघत होती हे राघवला जाणवत होतं. त्याने तिच्याकडे नजर फिरवली. पण काव्याने त्याच्यावरची नजर मात्र हटवली नाही. काव्यावरच खर प्रेम राघवच्या मनात पुन्हा जागृत झालं. पण नको पुन्हा ते नकोच म्हणून त्याने पुन्हा कामात डोकं घातलं..

थोड्याच वेळांत सर आले.

सर येताच काव्या बिना परमिशन सरांना भेटायला गेली. खुप वेळ झाल्यानंतर ती बाहेर आली आणि जागेवर जाऊन बसली.

राघवला आणि अनघाला सरांनी आत बोलावलं..

दोघेही आत येताच सरांनी त्यांना बसायला सांगितलं.

सर : मी मिस काव्याला एका प्रोजेक्टवर काम करायला सांगितलेलं पण तिला त्यावर काही काम करताच आलंच नाही. एवढी मोठी जबाबदारी ती पेलू शकत नाही. मला काहीही करून उद्या ह्या प्रोजेक्टवर बंगलोरला प्रेझेन्टेशन द्यायचय.

आणि हा प्रोजेक्ट मिस अनघा आणि मिस्टर राघव तुम्ही दोघे करणार आहात. कस आणि काय ते तुम्ही दोघे आपापसात डिस्कस करून घ्या. मला 3 पर्यंत हा प्रोजेक्ट माझ्या केबिनमध्ये रेडी हवा. मी आधीच खुप सारा वेळ ह्यात वाया घालवला पण अजून नाही.

एक भली मोठी फाईल त्यांनी राघव आणि अनघासमोर फेकली.

राघव : सर एवढ्या कमी वेळांत कस पोसिबल आहे.

सर : तुम्ही असले प्रश्न विचारून तुमचा आणि माझा वेळ वाया घालवतायत मिस्टर राघव.  pls go and do it’s fast..

अनघा उठुन सरळ आपल्या डेस्क वर आली।

राघव तिच्या मागे तिच्यासोबत तिच्याच डेस्कवर गेला.

दोघेही संपुर्णपणे प्रेझेन्टेशन बनवण्यात घुसले.

अनघा एक एक मुद्दे पद्धतशीरपणे राघवच्या पुढ्यात मांडत होती. आणि तेच ती पी.पी.टी मध्ये उतरवत होती. राघव तीच ते बोलणं न्याहाळत बसला. फाईल बदलताना राघवचे नकळत होणारे स्पर्श अनघाला आतल्या आत कुठे तरी सुखावत होते.

आपला प्रोजेक्ट पुन्हा अनघाकडे गेलेला बघुन काव्या रागाने लालबुंद होत होती. पण तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता.

लंच ब्रेकसुद्धा होऊन गेला तरी दोघ कामात गुंतलेले.

बरोबर 2 वाजता अनघा आणि राघवने मिळुन प्रोजेक्ट बनवला.

अनघाने फाईल सरांना मेल केली. आणि दोघेही आत गेले.

सर प्रोजेक्ट बघुन अनघा आणि राघव दोघांवर खुप खुश झाले.

दोघांचही जेवण बाकी होत.

अनघा डेस्कवर गेली. समोर असलेली पाण्याची बॉटल ती उघडुन पाणी पिऊ लागली तोच राघव हजर.

चल जाऊयात.. भुक लागली..

सरांनी दिलेल्या कामामुळे का होईना अनघा आणि राघव थोडे तरी एकत्र आले.

अनघाला आज खुप बर वाटत होतं राघव तिला लंच साठी विचारतोय हे बघुन.

काव्या फक्त त्या दोघांकडे बघण्याच काम करत होती.

राघवची किंमत तिला आज कदाचित कळत होती.

दोघेही लंचसाठी एकत्र कँटीनमध्ये गेले.

दोघेही जेवत असताना अनघा राघवला न्याहाळत होती.

राघव : मिस अनु

राघवने आज अनघासोबत बोलायचं ठरवलं..

अनु नाव ऐकताच अनघाच्या तोंडात जाणारा घास तसाच खाली थांबला.

अग अस बाचकायला काय झालं..

हे बघ तु पहिल्यांदा इंटरविव्हला आलेलीस तेव्हाच मला वाटलं की मी तुला कुठे तरी बघितल्यासारख वाटलं. बट स्वराची मैत्रीण मग असेल कुठे तरी बघितलं असा विचार करून मी इग्नोर केलं.

बट काल तुझा रिस्युम बघितला आणि मग खात्री पटली की तू अनुच..

अनघा : म्हणजे तु माझा रिस्युम न बघताच पुढे दिलास.

राघव : हो अग.. बट खर सांगु हा प्रोजेक्ट मी एवढ्या कमी वेळात खरच नसतो करू शकलो. यु आर ग्रेट

अनघा : एवढं मी काही मोठं काम केलं नाही राघव. तुम्हा लोकांकडूनच मी सगळं शिकले.

राघव : बट तु एवढी कशी बदलु शकतेस. I realy shock.

अनघा : त्यात एवढं shock होण्यासारखा काहीच नाही राघव.कधी तरी वाटत सहज ह्या मनाला जो मला आवडतो त्याला मी आवडेल अस बनाव.

राघव अनघाकडे बघतच राहिला.

हॅलो जाऊयात, मला काम आहे खुप..

(एक हात अनघा राघवच्या डोळ्यांसमोरून फिरवत त्याला लागलेली तंद्री दूर करत म्हणाली)

दोघेही कॉलेजचे जुने किस्से आठवुन हसतच वर्ती आले

अनघाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघुन काव्याला अजून तिचा राग येत होता.

राघव डेस्कवर जाताच रोहित आणि स्वराला सॉरी म्हणून मेसेज केला.

तोच सगळा घोळका राघव जवळ आला..

राघव दरवर्षीप्रमाणे आपण पावसाळी पिकनिक काढायची. आम्ही माथेरान डीसाइड करतोय.. तुझा काय प्लॅन.

एक काम करूयात ऑफिस सुटल्यावर चर्चा करूयात ना ह्यावर. आणि तुम्ही ठरवा मला काही प्रॉब्लेम नाही. एवढं बोलून राघव पुन्हा कामात गुंतून गेला.

सगळे जण ऑफिस सुटण्याचीच वाट बघत होते. आणि फायनली 6 वाजले.

सगळे खाली एकत्र असतात.

मिहीरच मत होत की आपण रिसोर्ट ठरवूयात..

काव्याहीमिहिरच्या हो ला हो देते.

सगळे राघवकडे बघतात.

हे बघा तुम्ही बोलाल मी तिथे येईल. तोच थोड्या वेळात अनघा येते.

राघवचा मित्र सौरभ अनघाच्या प्रेमात पडला होता.

अनघा ऑफिस बाहेर येताच सौरभने अनघाला आवाज दिला.

सौरभ : अनघा तु पण येणारना पिकनिकला??

अनघा : कुठे??

काव्या : आम्ही रिसॉर्टला जायचं ठरवतोय.. बघ जमलं तर ये..

अनघा : बर.. बघु

बर ठिक आहे हा शनिवार पक्का. आणि रविवारी आपण घरी.

done..

सगक्यांचाच होकार मिळाला शिवाय अनघा..

अनघाच शेवटपर्यंत हो नाही चालेल..

राघव: चल की ग अनघा.. खुप मज्जा येईल..

राघव देखील अनघाला मनवु लागला.

अनघा : राघव हे बघ मी नाही बोलत नाही. मी घरी विचारून बघते मग सांगते.

एवढं बोलुन अनघा निघाली.

राघव ग्रुपसोबतच ट्रिपच डिस्कशन करत थांबला.

सर्व काही ठरवून झाल्यावर राघव सगळ्यांना बाय करून जाऊ लागला.

राघव… ए राघव…. पाठून सौरभ आवाज देत धापा टाकतच त्याच्याजवळ आला.

काय रे काय झालं??

सौरभ : मला थोडं बोलायच होत तुझ्याशी.

राघव : काय झालं??

सौरभ : कोणाला सांगणार नाहीस ना..

राघव : का चोरी वैगेरे केलीस के तु??

(राघव हसू लागला)

सौरभ : राघव जोक नको नारे करुस असा माझ्या प्रेमाचा.

राघव : काय?? तु आणि प्रेमात?? कधी पासुन.

सौरभ : ती इथे आल्या पासून

राघव : कोण??

सौरभ : अनघा..

राघवचा हसणारा चेहरा थोडा गंभीर झाला…

सौरभ : मनातुन, डोक्यातुन जातच नाही यार. फक्त तु… हा तुच आम्हाला एकत्र आणू शकतोस.. प्लिज यार थोडी सेटिंग लावुन दे ना…

क्रमशः

( पुढील भाग लवकरच कथा कशी वाटली हे नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

 

Article Categories:
प्रेम

Comments are closed.