काळा

Written by

काळा…..

किती जिव्हाळ्याचं नातं ना आपलं नि काळ्याचं..
जन्माला येण्या आधीपासूनच गाठ पडते काळ्याशी ..
ती जगातली सगळ्यात safe अंधारलेली खोली.. त्यातून आपला Birthday आला की थेट उजेडाकडे आपली लांब उडी.. तो काळोखच आपल्याला झेप घेण्यासाठी बळ देतो..
मग जन्मल्यानंतर भेटणारा तो काळा गोजिरवाणा तीट..तो तीट गोंडस की ज्या गालांवर तो लावलाय ते गोबरे गाल गोंडस?? समोरच्याला confuse करतो..मग confusion ,confusion च राहत ह्या मनातल्या शंकेचा end गोडशा पापीत होतो आणि आग्गाऊ बाळ उगाच जरा डाफरतं..
मग शाळेत जातांना काळा कावळा,काळी पेन्सिल,काळे बूट,काळा फळा..तेच उद्याचे artists घडवत जातात…
नंतर थोड्या अल्लड वयात ओळख होेते कृष्णाशी..गोपिकांशी खेळणारा,दूध,दही चोरून मित्रांत वाटून खाणारा तो अल्लड कान्हा..तो ही काळाच की..
त्याच रागात तो त्याच्या आईला विचारतो..
राधा क्यू गोरी…
मै क्यू काला….?

मग आपल्याला कळायला लागते ; आपली काळी आई..बळीराजाच्या कष्टावर ,प्रेमाची फुंकर घालणारी..त्याच्या घरच्या चुलीसाठी स्वतः चटके सोसणारी…

आपण अजून मोठे होतो..आठवणींच्या मोरपिसात काळा कोपर्यात दडून बसतो..पण काळ्या ढगांतून जन्मणारा प्रितीचा बहर मात्र मोहरून टाकतो..
रोज रात्री काळू आता चंद्राची साक्ष देतो..चांदोबाचे बीज लावून चंदेरी फुलं फुलवतो…
नखशिखांत नटल्यावर चेहर्यावर हसू ठेवत मनात दाबलेल्या हुंदक्याला आईने कानामागे लावलेला काळा तीट मोकळं करतो.. आणि नवी नवरी होणार्या इवल्याश्या कळी साठी तिच्या मायेच्या प्रेमाचा झरा पाझरतो…
पुन्हा एकदा सप्तरंगी विश्वात काळा जरा विसरला जातो…पण काली काली आँखे,काली जुल्फे म्हणत मुद्दाम आपली हजेरी लावतो..
काळू आता हळूहळू संन्यास घ्यायला लागतो..डोक्यावरच्या चांदीतून कधीमधीच डोकावतो…
सगळ्यांचं आयुष्य रंगीत करून तो आता समाधानी असतो..;कुणी आपली आठवण काढावी म्हणून अजिबात आग्रही नसतो..

बाकी कुणी विसरलं तरी,देव त्याला विसरत नाही..

काळ्यासावळ्या रूपाशिवाय विठूमाऊली पूर्ण होतच नाही…..

-प्रणाली

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा