कावळा आणि चिमणीची रूपकात्मक कथा

Written by
एक होती चिमणी ;जरा जास्तच लाडावलेली.तिच्या जंगलात किती ग तू हुशार !असे प्रतिसाद ऐकून हरभऱ्याच्या झाडावर चढलेली.एक दिवस उडत असताना तिला नवीन जंगल दिसले.पाहून तिथली सुंदरता चिमणीचे भान हरपले.चिमणी तिथे जाऊन राहिली खुशाल; पण काम तिचे करताना ती चुका करे हजार.तिच्या चुका पाहून मग तिथले पक्षी ओरडले,कोणी करी थट्टा तर,कोणी समजावून सांगितले.चिमणी मात्र चिडकी होती.ती त्यांच्यावर चिडली.चुका दाखविणाऱ्या पक्षांना  वाकडे-तिकडे बोलली.पण  पक्षी ही कमी नव्हते ते ही तिला बोलले.
    चिमणी मात्र नाराज होऊन परत जायला निघाली तोवर तिच्या जवळ एक अनुभवी पक्षी येऊन म्हणाला;
“ अग चिमणे उगीच इतका त्रागा कशाला?तू कामात चुकतेस म्हणून पक्षी बोलतात तुला,ते तुझ्या फायद्याचंच तर सांगतात तुला; माझं जरा ऐकशील ,तू आत्मपरीक्षण करशील?”
      हे ऎकून चिमणी विचारात पडली. विसरून सगळं ती आत्मपरीक्षण करू लागली.तेंव्हा तिच्या लक्षात आले. ती खरंच चुकतेय. मग स्वतःच्याच चुका सुधारण्याचा घेतला तिने ध्यास ,रोज तिला जंगलात शिकायला मिळे खास.
    पण एक कावळा तिला दुरून पाहत होता.नजर तिच्यावर ठेवत होता. यातलं चिमणीला काही माहिती नव्हते.कावळा मात्र ठरवले . ही चिमणी करते चिव -चिव फार.आज हिला करतो गार.म्हणून घेऊन सगळ्या जंगलाचा कैवार कावळा बोलला चिमणीच्या कामा बद्दल घाण-घाण.जंगलातल्या पक्षांनी ऐकले ;कावळ्याला त्यांनी खूप फटकारले.
           चिमणी पहिल्यांदाच चिडकुबाई ती ही कावळ्याचा समाचार घेई. त्याच्याच भाषेत उत्तर देई. कावळा मात्र घाबरला फार ऐकून सगळ्यांचे फटकार.मग त्याने विचार केला जंगलातून आता उडवणार आपल्याला.कावळ्याने त्याची काव-काव मागे घेतली.चिमणीला तो गोड बोली.पण यातच तर कावळ्याचा होता डाव,चिमणीला नव्हता याचा ठाव. कावळा आपले शब्द मागे घेई.चिमणीने दिलेली उत्तरे घेऊन मिरवी.पहा पहा चिमणी किती बोलते घाण; हेच तर दाखवत होता तो अतिहुशार! पण जंगलातले पक्षी ही होते हुशार. त्यांनी ओळखला होता कावळ्याचा डाव. कावळ्याकडे करून दुर्लक्ष; सगळ्यांच आपल्या कामावर लक्ष.
        कावळा मात्र फारच चिडला.मग तो जंगलाच्या राज्याकडे गेला.घेऊन चिमणीचेच शब्द ,राज्याचे त्याने कान भरले.चिमणी मात्र रडली खूप आपण कावळ्याची भाषा वापरली उगीच. तिला झाला पश्चाताप; की आपण कावळ्या सारखे शब्द वापरले उगाच.
       कावळ्याचे मात्र सगळे व्यर्थ गेले. राजाने ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले.चिमणीने मात्र यातून धडा शिकला की कधीच वापरायचे नाहीत त्याच्याच पातळीवर जाऊन शब्द दुसऱ्याला.हा धडा गिरवून चिमणी सावध झाली व आपल्या कार्यात मग्न झाली.
(ही एक रूपकात्मक कथा आहे.जमली का ते नक्की सांगा व काही चुका असतील तर ते ही आवर्जून सांगा ही विनंती !मी नक्की सुधारणा करेन)

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.