काहूर (गूढ प्रेम कथा) भाग 2

Written by

काहूर (गूढ प्रेम कथा)

भाग 2

गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे खूपच नुकसान झाले होते.. .कंपनीचे शेअर्स बाजारात खूपच खाली घसरले होते… आता कंपनीला नवीन strategy ची गरज होती…. मीराने कंपनीची धूरा हातात सांभाळल्यावर लगेचच एक तातडीची बैठक बोलावली. सगळ्या सिनिअर ला हजर राहण्यास सांगितले…. प्रत्येक डिपार्टमेंटल हेड कडून कामाचा आढावा घेऊन काही चेंजेस सांगितले…. मिटींग संपल्यावर दिपक आणि पाठकला थांबवून घेतले…..

मीरा : आपण गेली कित्येक वर्षे तोच तो बिझिनेस चालू ठेवला आहे….. पण माझ्यामते आपण आता नवीन पर्याय शोधायला हवा… तुम्हाला काय वाटतं ???

पाठक : नवीन अस काय करणार मॅडम, आपण सगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहोत…..

दिपक : मॅडम आपण, लोकांकडून बिझिनेस प्रपोजल मागवू, म्हणजे idea मिळेल …..

पाठक : आता काय आपण लोकांकडून Idea घ्यायच्या…. “The Rathod Group of companies” आहे ही, हे विसरु नको….

दिपक : मला तस म्हणायच नव्हत सर…..

पाठक : आपण आधी आहे ती परिस्थिती सांभाळूया ….

मीरा : मला त्याच टेंशन नाही….(काहीसा विचार करून) दिपक एक काम करा , राठोड गृप कडून एक स्पर्धा आयोजित करा , नविन बिझिनेस प्रपोजल सादर करायला लावा, ज्यांच प्रपोजल उत्तम असेल त्याला आपण फायनान्स करू, सहा महिन्यात स्कोप वाढला तर पार्टनरशिप करु.. ..

दिपक : Great idea, “Mam”…. मी लगेच कामाला लागतो आणि या स्पर्धेसाठीचे नियम, अटी व पात्रता पूर्ण डाटा तुम्हाला ईमेल करतो….

मीरा : Good, कामाला लागा.. .आणि Mr. पाठक तुम्ही यात लक्ष नका घालू , तो करेल मॅनेज सगळ…..
you may go now….

बाहेर आल्यावर पाठक दिपकला त्याच्या या सल्ल्याबद्दल त्याची कान उघडणी करतात… तुला काय गरज होती फालतू idea देण्याची… जास्त पुढे पुढे करु नकोस… Just stay in your limits…..

दिपक काही न बोलता मुकाट्याने कामाला सुरुवात करतो…..

(रात्री घरी आल्या आल्या)

दिपक : अरे साल्या … कामाला लाग. . तुझ्यासाठी कमाल opportunity आलीये… हि स्पर्धा तुच जिंकावी भावा….. पार्टी तो बनती हे मेरे यार। (आणि तो स्पर्धेबद्दल समरला सांगतो) …..

दोघेही पार्टी करायला घराच्या बाहेर पडतात…. बाहेर पार्टी करून घरी येत असताना त्यांची बाईक खराब होते . मग ते दोघे पायीच चालत येत असतात.. .
(दिपकला दारु जरा जास्तच चडते, किंबहुना त्याला झेपत नाही अस म्हटल तरी चालेल)

दिपक : यारररर सम्या!!! तु हि बाईक विकून टाक यार, नेहमी टांग देते….

समर : हो हो.. . आधी सावर स्वतःला…. कशाला पितो रे येवढी?? ?

दिपक : मी कुठे प्यायलो?? फक्त विस्कीचे दोन………

समर : अरे सावर स्वतःला. ..

समर दिपकला पकडणार तोच समोरून येणाऱ्या गाडीला दिपक धडकतो … ड्रायवरने वेळीच ब्रेक लावल्याने अपघात टळला.. गाडीतून तावातावाने एक मुलगी बाहेर येते.. .. हलक्या गुलाबी रंगाची साडी, काळ्या रंगाचा चकाकणारा स्लीवलेस ब्लाऊज, कानात खड्याचे कानातले, हातात नाजूक डायमंडचा कडा, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक…. (समरची आणि तिची नजरभेट झाली)

Useless ….. कळत नाही का समोरून गाडी येतेय ते???
दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालता…(ती अजूनच चिडते )

समर एक वेगळाच अटीटयुड दाखवून काहीच न बोलता दिपकला उचलायला जातो.. .

ती : काही manners नावाची गोष्ट आहे की नाही, चुका करून सुद्धा attitude किती??? ती सरळ जाउन गाडीत बसते. तोच तिच लक्ष दिपकवर जात… ती खाली उतरून मदत करायला जाते…

समर तिची मदत नाकारतो आणि टॅक्सी थांबवून दिपकला घरी घेऊन येतो….

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि मला follow करायला विसरू नका.)

याआधीचा भाग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सगळे आश्चर्यचकित होऊन टाळ्या वाजवतात…. सगळे आपसात कुजबूज सुरू करतात.अरे हि मीरा राठोड आहे???? ….सरांची वाईफ ???……..

Geplaatst door ईरा op Maandag 8 juli 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा