काहूर (गूढ प्रेम कथा) भाग 3

Written by

काहूर (गूढ प्रेम कथा)

भाग 3

समर तिची मदत नाकारतो आणि टॅक्सी थांबवून दिपकला घरी घेऊन येतो….

सकाळी दिपकला उठायला उशिर होतो, तो घाईतच तयारी करून आॅफीसला निघतो…. समर त्याला नाश्त्याला थांबवतो पण तो उशिर झाल्यामुळे निघतो….
अॉफीसमध्ये पोहचल्यावर निरोप मिळतो ताबडतोब मॅडमच्या केबीनमध्ये हजर राहण्याचा…..

मीरा : दिपक आजचा माझा शेड्यूल लाइन अप करा आणि मला आपल्या नवीन प्रोजेक्टचे अपडेट द्या….

दिपक : (आश्चर्याने) फक्त एवढंच????

मीरा : हो…… का??? अजूनकाही अपेक्षित होतं????

दिपक : नाही…. काही नाही…. .(मनात म्हणतो वाचलो बुवा)

मीरा : “एक मिनिट Mr. दिपक” सिनियर ने अस उशिरा अॉफीस मध्ये येण शोभत नाही…..

(आपल्या लॅपटॉपवर डोक घालत म्हणाली)… आपल्याला जेवढी झेपते तेवढीच घ्यावी….. (मनातल हसू न दाखवता)

दिपक : अ…. हा…. (गोंधळून बाहेर येतो) च्यायला त्यादिवशीसारख आज पण हिने मनातल ओळखल आणि हिला कस माहीत की काल मला जास्त झालेली….
(तो विचार करत बाहेर पडला)

दिपक एक फाइल घरीच विसरतो म्हणून समर ती फाईल घेऊन दिपकच्या आॅफीसमध्ये येतो…. तो रिसेप्शनला विचारून मागे वळतो तोच त्याची टक्कर मागून येणाऱ्या मीराला लागते ….. मीरा काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजतो आणि समरला राग देत निघून जाते…..

दिपकला येण्यास उशीर असतो म्हणून समर फाईल रिसेप्शनला देऊन निघून जातो….

दुपारी समर एका बँकेत जातो त्याच्या बिझिनेस प्रपोजल संबधी मिटींग असते…. मिटिंग संपवून तो निघतो आणि लिफ्टची वाट बघत असतो…. मागून मीरासुद्धा येते…. दोघेही लिफ्टमध्ये चढतात आत already दोनतीन जण असतात… लिफ्ट अकराव्या मजल्यावर आल्यावर अजून गर्दी जमा होते…लंच टाईम झाल्यामुळेच सगळे एकत्र निघाले असतात…
आता त्या गर्दीचा जरा त्रास व्हायला लागतो मीराला…. ती अजून मागे सरकते तर मागे समर असतो… पुढेही पुरुषमंडळी आणि मागे हा…. तिला खूप अवघडल्यासारखे होते….
दहाव्या मजल्यावर आली तरी गर्दी काही कमी होत नाही, समरला तिची घुसमट कळते तो तिला मागे जागा देउन पुढून येणारा लोढ स्वतःच्या अंगावर घेतो आणि समोर मीरा…
मीराला त्याच प्रोटेक्ट करण अजिबात नाही आवडल…. तिला एक युक्ती सुचते, ती उलटी येण्याच नाटक करते तस अकराव्या मजल्यावर सगळी गर्दी भरभर उतरते……

आता लिफ्टमध्ये फक्त मीरा आणि समर…. दोघेही एकमेकांकडे चोर नजरेने बघत गालातल्या गालात हसतात…. लिफ्ट आठव्या माळ्यावर येताच बंद पडते…. कोणीच कोणाशी बोलत नाही…. त्यांचा “ego” मध्ये येत असावा…. तासाभराने लिफ्ट परत सुरू होते….

इमारतीच्या आवारात येताच समोरून दोन इसम बाईकवरून जाताना मीरावर गोळी झाडतात, हे लक्षात येताच समर तिला मागे खेचतो आणि तोल जाऊन तो खाली पडतो….. तिथे एकच गर्दी जमा होते….मीरा थोडक्यात बचावते…..

समर : Are you ok???

मीरा : ya… I am fine…. तु ठिक आहेस ना????

समर : Hmm… . I am OK….

थोड्याच वेळात पोलिस तिथे येतात, सगळी छानबीन करून मीराला, गार्डसोबत ठेवण्याचा सल्ला देतात आणि समरला शाबासकी देतात. ….. मीरासुद्धा समर चे आभार मानून निघते …….

काही दिवसांनी राठोड गृपची बिझिनेस प्रपोजलची स्पर्धा सुरू होते…. वेगवेगळे हजारो अर्ज येतात, त्यात फायनल पाच सिलेक्ट होतात…. या पाच अर्जात समरही असतो. आता या पाचही जणांची मुलाखत स्वतः मीरा घेते ….. शेवटी फायनल विजेता घोषित केला जातो…. तो विजेता समर असतो…..

समरच बिझिनेस करायच स्वप्न पूर्ण होत आणि आता तो पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करतो……

आज त्याच्यामुळे राठोड गृप ब्युटी प्रोडक्टसमध्ये आपल नशिब आजमवनार… . कोणी विचारही केला नव्हता की राठोड गृप या बिझिनेस क्षेत्रात प्रवेश करेल…. सगळ्यांनी मीराला मूर्ख ठरवल पण मीराला पूर्ण खात्री होती की यात यश नक्की मिळणार……

सहा महिन्यांनंतर खरोखरच समरची कल्पना आणि मेहनत फळाला आली आणि राठोड गृपसोबत स्पर्धेच्या अटीप्रमाणे पार्टनरशिप साईन झाली….. आणि बघता बघता बिझिनेस चांगलाच वाढला…. कंपनीचे शेअर्स बाजारात परत वाढले….

दिपक : (दारावर नॉक करत) मी आत येऊ का????

मीरा : ohhhh, please come…..

दिपक : मॅम…. .आतातर तुमच्या मनासारख झाल मग आता आपण हे घोषित करू शकतो की समरच या कंपनीचा वारस आहे….

मीरा : नाही दिपक अजून वेळ आहे…. राठोड सरांचा खरा गुन्हेगार बाकी आहे आणि अजून समरला खूप काही “achieve ” करायच आहे… यावेळेस सत्य बाहेर आल्यास त्याच्या जिवाला धोका आहे … आपली दोन वर्षाची मेहनत वाया जाईल जी आपण समरला शोधण्यापासून त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी घेतली….

दिपक : But मीरा समर…..?

मीरा : राठोड सरांनी त्याच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळे त्याला बेदखल केल होत पण आता तो पूर्णपणे सुधारला आहे आणि आता तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय….. त्याला या प्रोपर्टीचा अजिबात मोह नाही, नाहीतर याआधीच त्याने ते सरळ काबीज केल असत…. तो वारस म्हणून हक्क दाखवू शकला असता….

दिपक : हममम्

मीरा : bye the way .. . आपली नविन माॅडल ” रिया” कधी येतेय…

दिपक : येईलच इतक्यात……

रिया : Think of the devil?? & devil is here….

मीरा : (अगदी आनंदाने मीठी मारून) welcome back dear…. आत्ता येतेयस तू???

रिया : after all एवढ्या मोठ्या कंपनीची मॉडेलिंग आॅफर कोण नाकारेल????

मीरा : ओळख करुन देते दिपक ही माझी बाल मैत्रिण.. .आम्ही लंदनला एकत्र होतो….

रिया : Hiii दिपक….

(दिपक पूर्ता स्वप्ननगरीत हरवला)

मीरा : (त्याला चिमटा काढून स्वप्नातून उठवते) हिची समरशी ओळख करून दे आणि बाकीचे काम पूर्ण करुन घे….

दिपक : हो हो….

इथे मीरा पोलिसांशी काही पुरावे सापडले का यासंबंधी चौकशी करते….
आमचे प्रयत्न सुरू आहेत येवढच उत्तर तिला मिळत ….

समरच्या नवीन प्रॉडक्ट लाँचसाठी रिया मॉडेलिंग करणार असते…. बराचसा वेळ ते कामानिमित्त एकत्रच असतात,
याच दरम्यान समर आणि रियाची जवळीक वाढते…. मीराला ते जाणवत, ती नेहमी त्या दोघांना चोरून बघत असते…… त्याचं तिच्या जवळ असणं, तिच त्याच्याशी लगट करन आता मीराला चीड देत होत…. समरने मीराची चिडचीड बरोबर ओळखली… त्याला कळल होत की मीरा त्याच्यात गुतंली आहे ते पण तो स्वतः व्यक्त होत नव्हता…. किंबहुना त्याला ते मान्य नव्हत…..

असेच काही दिवसांनी रियाचा वाढदिवस आला…. रियाने तिच्या घरी बर्थडे पार्टी ठेवली होती आणि सगळ्यांना बोलवल होत…. रियाच घर छान समुद्रकिनारी होत… संध्याकाळी पार्टी सुरू झाली….
लाल रंगाचा वनपिस ड्रेस घालून मीरा आली होती… कानात लांब चैनवाले कानातले घातले होते आणि केसांचा झुबका डोक्यावर बांधला होता त्यात कमी होती ती, तिच्या smile ची…, कारण पार्टीत आल्यापासून तिची नजर समरला शोधत होती….

थोड्यावेळात दिपक आणि समर आले… समरची आणि मीराची फक्त नजरभेट झाली…..

समर : (रियाला) hey gorgeous, happy birthday…. This is for the most beautiful lady in the world….. (गिफ्ट दिल आणि त्याची नजर मीराला शोधू लागली )

रिया : ohhh….. thank you so much flutter…. (त्याचा गाल ओढत)

दिपक : अरे!!! केक कधी कापणार???? Let’s cut the cake……

सगळे केक कट करण्यासाठी आणि बर्थडे गर्लला चिअर करायला जमा झाले…..

Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Riya…. Happy birthday to you…..

समर रियाला केक भरवतो, चुकून थोडासा केक रियाच्या गालावर लागतो, समर मीराकडे बगत रियाच्या गालावरचा केक स्वतःच्या ओठांनी उचलून खातो…. मीरा हे सगळ बघत असते पण राग आवरून गप्प राहते…..

म्युझिक चालू होत आणि समर रियाला घेऊन डान्स फ्लोअरवर जातो….

दिपक येऊन मीराला डान्ससाठी विचारतो आणि ते दोघेही एकत्र जातात… डान्स सूरू असताना समर आणि मीराची नजर मात्र एकमेकांवर होती…. प्रेम दोघांचही होत पण कबूल मात्र करत नव्हते….

पार्टनर चेंजिगचा डान्स सुरू झाला… दहा कपल्स डान्स करत होते, पार्टनर बदली होऊन समर आणि मीरा एकमेकांसमोर आले, पण समर डान्स फ्लोअरवरून निघून बार काउंटरवर गेला ..
त्याने एक पेग मारला नी, रियासोबत परत नाचू लागला…..

ईथे मीराला खूप राग आला होता ती पण बार काऊंटरवर गेली आणि रागाच्या भरात असताना नकळत पाच ते सहा पेग मारुन घराच्या बाहेर पडली, तिला वाटेत दिपकने अडवले त्याला काहीस कारण देऊन ती निघाली…. समर हे लांबूनच पाहत होता……तो तिच्या मागे मागे गेला…..

मीरा समुद्र किनारी फिरत होती, पाण्याच्या लाटेबरोबर आत शिरत चालली होती, पाणी ढोपराच्या वर चढत होत इतक्यात तिचा तोल गेला तोच समरने तिला मागून कमरेला धरून स्वतःकडे ओढल….. तिचा स्पर्श होताच तो तिच्यात हरवून गेला, तिच्या कडे एकटक पाहत बसला…. त्या चांदण्या रात्रीत ती खूपच सुंदर दिसत होती…. कदाचित त्याच्या मनातल्या भावनाना वाट मोकळी झाली होती, त्याने तिला कमरेत हात घालून अजून जवळ ओढल, तिचे बांधलेले केस मोकळे केले, त्या मोकळ्या केसात आपला उजवा हात फिरवत तो तिच्या ओठांजवळ गेला तीही त्याला भरल्या नजरेने पाहत होती…. त्यावेळेस कोणाचाही विरोध नव्हता, दोघेही त्या क्षणात हरवू पाहत होते, पण अचानक समर ने मीराला दूर लोटले……

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि मला follow करायला विसरू नका.)

याआधीचे भाग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/581606972323826/posts/635158966968626/

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत