काहूर (गूढ प्रेम कथा) भाग 7

Written by

काहूर (गुढ प्रेम कथा)

भाग 7

Mrs. मीरा राठोड…. , राठोड गृपचे सर्वेसर्वा Mr. राठोड यांचे अपहरण आणि कंपनीचे खोटे मालकी हक्क दाखवण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत…. Please cooperate…..

मीरा फक्त शांतपणे समरला बघत राहते….

पोलिस तिला घेऊन जातात…..

दिपक समरला विनंती करतो की त्याने हे सगळं थांबवाव… पण समर त्याच काहीच ऐकून घेत नाही….. मग दिपकही त्याला समजावत न बसता पोलिस स्टेशनला निघून जातो….

इथे मीराची चौकशी सुरू होते….

पोलिस : Mrs. राठोड , पाठकने आम्हाला तुमच्या बद्दल सगळं सांगितले आहे, तो माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार आहे, पण Mr. राठोड यांना तुम्ही कुठे लपवून ठेवले आहे, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. … तुम्ही ते निमूटपणे सांगा अन्यथा????

इतक्यात दिपक तिथे वकिलांना घेऊन येतो…..

दिपक : Inspector साहेब… तुम्ही मीराला अस torture नाही करू शकत…. हे मीराच जामीन पत्र…..

पोलिस : तुम्हा मोठ्या लोकांच हे बर असत…. जामीन लगेच तयार होतो… काही formalities आहेत.. ते पूर्ण करा आणि मग घेऊन जा…..

काही वेळाने दिपक आणि मीरा पोलिस स्टेशनमधून बाहेर पडतात…. बाहेर पत्रकार  वाटच बघत असतात … कोणाला काहीही उत्तर न देता मीरा आणि दिपक तिथुन निघतात….

थोड्या अंतरावर दिपक ड्रायव्हरला उतरवून स्वतः गाडी चालवतो…. मीराला तो रियाच्या घरी घेऊन येतो…

मीरा काही बोलणार इतक्यात दिपक तिला सांगायला सुरुवात करतो.

दिपक : मीरा……समरची कंपनी आपल्या राठोड गृप मध्ये समाविष्ट करण्यासाठी जे कागदपत्रे तयार केले गेले, ते खोटे होते, समरने तुझी खोटी सही करून राठोड गृप स्वतःच्या नावे केली…..आपण समरला सगळ खर सांगून टाकू …..

मीरा : त्याने काय होणार आहे, आपला पुरावाच बेशुद्धावस्थेत आहे….. पाठकला हे माहीत आहे की मी फक्त या प्रोपर्टीची केअर टेकर आहे तरी त्याने समरला सांगितले नाही…. त्याने मुद्दाम समरला हे सांगितलं की राठोड यांच मी अपहरण केलय…

दिपक : पण मग पाठकला कस कळाल की Mr. राठोड कुठे आहेत हे तुला माहीत आहे, आणि तु अपहरण केल अस का सांगितलं ….. त्यांना आपला प्लॅन नाही ना कळला???

मीरा : दिपक…. Mr. राठोड शुद्धीवर येईपर्यंत कोणालाही कळता कामा नये कि ते कुठेत….. Please be careful… त्यांच्या जीवाला धोका आहे अजून….

दिपक : पण समर????

मीराला परत अस्वस्थ वाटायला लागते, दिपक तिची अवस्था पाहून तिला आराम करण्याचा सल्ला देतो…. तिच्यासाठी काही औषधे मिळतात का ते, तो बघत असताना त्याला डेस्कवर एक फाइल सापडते…. फाइल वाचून तो मीराजवळ जातो….

दिपक : (मीराला फाइल दाखवत) मीरा??? हे काय आहे??? Are you pregnant ??? हे कधी आणि कस??? कोण आहे तो मीरा???

मीरा : (खिन्न नजरेने) I am in love with समर…

दिपक : तरी सुद्धा आज त्याने, तुझ्यासोबत अस वागाव??? मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो….

मीरा : No…. दिपक!! त्याला यातल काहिच माहित नाही आणि तु त्याला काहिच सांगणार नाही, चूक माझी होती… मीच त्याच्या प्रेमात वाहत गेले… त्यावेळेस मला त्याच्या नजरेत माझ्यासाठी प्रेम दिसल…

दिपक : पण मीरा… त्याला हे कळायला हवं…

थोड्यावेळाने तिथे समर येतो…. तो तिथे रियाला भेटायला येतो…. पण रिया काही कामामुळे लंडनला गेली आहे…. हे त्याला आता दिपककडून कळत….

(समर परत जातच असतो तेवढ्यात)

मीरा : समर….. एक मिनिट….. प्रॉपर्टी हवीच होती तर मागायची होती…. सर्वस्व दिल होत तुला, प्रॉपर्टीही दिली असती… फसवणूक कशासाठी????

समर : (मागे वळून) फसवणूक झाल्यावर कस वाटत हे कळण्यासाठी….. माझ्या बाबांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, खोटे कागदपत्रे बनवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलीस आणि त्यांना जेव्हा हे कळल तेव्हा तु त्यांच्यावर हल्ला केलास???

दिपक : हे सगळं खोटं आहे समर….

समर : तु तर काहीच बोलू नकोस…. माझा मित्र होतास ना हिला भेटायच्या आधी??? तुही हिला शामिल झालास आत्ता ?? ते तर नशिब की मीराच्या डेस्कमध्ये मला लंडनच्या हॉस्पिटलची फाइल सापडली आणि Dad चा पत्ता मिळाला…. मी पाठकला लंडनला रवाना केलय…. मीही आता तिथेच निघालोय….

(दिपक आणि मीरा आश्चर्याने बघत असतात, समर तिथुन निघून जातो…. )

 

क्रमशः

कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि मला follow करायला विसरू नका.)

याआधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

मीरा गर्दीतून वाट काढत बाहेर पडत होती, अगदी लाजत. .. मनात आता गाणं घुमायला लागल होत तिच्या….. समरही तिच्या मागोमाग बाहेर…

Geplaatst door ईरा op Donderdag 18 juli 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा