का कळेना!! (प्रेम कथा) भाग 10

Written by

का कळेना!!

भाग 10

मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो…. शरिर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते…. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो…..

इथे रोहन, दियाला मेघा सापडल्याच सांगतो….. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाही…. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं अस ते दोघे ठरवतात….

सकाळी विक्रमला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो…. तो घड्याळात पाहतो तर आठ वाजलेले असतात… तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो…. बाहेर अजूनही धो धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेल असत….

विक्रम मागे वळून बघतो तर मेघा अजूनही झोपेत असते… तो तिलाच एकटक न्याहाळत असतो… इतक्यात मेघाला जाग येते…. आसपास नजर फिरवते तर सगळच अनोळखी असतं …. विक्रम तिच्या जवळ जाऊन बसतो…. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो….

विक्रम : कशी आहेस मेघा??? तुला बरं वाटतंय ना???

(तशी मेघा विक्रमच्या गळ्यात पडून रडायला लागते, तिच्या मिठीत येताच विक्रमलाही वाटल की आपण आलिंगन द्याव… पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला…)

विक्रम : मेघा… शांत हो… मी आहे ना इथे… Hmm… Please calm down…. (तिच्या डोक्यावरुन हळूवार कुरवाळत)

मेघा : (अजूनही प्रचंड घाबरलेली विक्रमच्या मिठीत) रडतच होती…

विक्रम : (विक्रमही काही वेळ तीला मोकळ होउ देतो)
मेघा….ए मेघा…. ए वेडाबाई….. मी आलोय ना…. काळजी करू नको…. शांत हो आधी…. तु थांब मी तुझ्यासाठी first class coffee घेऊन येतो….

एव्हाना तिच्या लक्षात येत की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली… .

मेघा : (विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते…..) I am sorry…

विक्रम : It’s okay… मी coffee घेऊन येतो….

मेघा उठून फ्रेश व्हायला जाते पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हते…. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो…..

विक्रम : काय झालं?? (तिला धडपडताना बघून)

मेघा : कदाचित पायात चमक भरली आहे…

विक्रम : हममम् बस इथे… कॉफी घे आधी….

मेघा : Thanks…

विक्रम : Thanks काय त्यात…. कॉफीच तर आहे….

मेघा : कॉफीसाठी नाही…. Thanks for everything….

(दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात… काही सेकंदात भानावर येऊन )

विक्रम : बघू कुठे पाय मुरगळला ते….

मेघा : आपण कुठे आहोत??? आणि तु मला कस शोधलस???

(मग विक्रम कालपासून ते आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो… )

मेघा : माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला…

विक्रम : बरं ते जाऊ दे…. काल नक्की काय झालं???

मेघा : काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला…. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली…. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला…. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही…. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते….अंधार पडत आला होता… आसपास फक्त झाडी होती…. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काहीच कळत नव्हता…. माझा फोन, माझ सामान काहिच जवळ नव्हत… एका ठिकाणी सात ते आठ जंगली श्वापद होती मला बघताच माझ्या अंगावर धावून आली…. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले… एका दगडावर ठेच लागून पडले… कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा…. पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळल नाही…. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला… मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे पण माहित नव्हतं…. मी पूर्णपणे घाबरले होते…. धावून धावून पूर्ण थकले होते…. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हत…. त्यातच मला कधी ग्लानी आली माहित नाही…. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जिवात जीव आला….

विक्रम : तुम्ही नाही तु म्हणं… तुम्ही पेक्षा तु जास्त जवळच वाटत….

मेघा त्याला बघत बसते….

विक्रम : (तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारून) कुठे हरवलीस…. ??

मेघा : काही नाही (स्वतःशीच लाजते)

विक्रम : बाहेर जागोजागी पाणी भरले आहे सगळे रस्ते बंद आहेत… मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला… तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे पावसामुळे तोही अडकला आहे….
अरे….. मी बोलत काय बसलोय?? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो… तु आराम कर….

(आणि तो किचनमध्ये निघून जातो)

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग  11 ?

विक्रम : ( काळजीपोटी थोडस रागात ) मेघा….. तुला आराम कर सांगितले होते ना….??मेघा : मी आता बरी आहे… आण ते.. मी ओमलेट…

Geplaatst door ईरा op Zondag 4 augustus 2019

भाग 1 पासुन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

का कळेना…भाग 1©शुभांगी शिंदेरिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer…

Geplaatst door ईरा op Donderdag 25 juli 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत