का कळेना!! (प्रेम कथा) भाग 13

Written by

का कळेना!!

भाग 13

दोन चार दिवस सगळं ठीक होत…. पण…. शिखाच्या मनात वेगळच चालू होत…. आजी आजोबांकडे थोडे दिवस रहायला जाते सांगून हि मैत्रिणीकडे रहायला गेली…आजी आजोबा घरी आले होते शिखाच अभिनंदन करायला तेव्हा कळाल की ती खोट बोलून दुसरीकडेच कुठे गेली पण कुठे गेली आणि खोट बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळल…. मैत्रीण आणि तिच्या boyfriend ची मदत घेतली, म्हणजे मैत्रिणीच्या boyfriend ला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि abortion करुन आली….

शिखाला बाळ नको होत… तिला तीची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती… भाईच आणि तिच खूप जोरदार भांडण झालं…. रागाच्या भरात भाईने तिला कानशिलात लगावली… पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तीची समजूतही घातली… पण शिखा…. हट्टी होती… .गेली आठवड्याभराने नोट लिहून….

Dear विक्रम,

मी जात आहे कायमची मला शोधण्याचा प्रयत्न करु नको… मला हवी असलेली lifestyle, माझ स्वातंत्र्य जगायला….So good bye…

शिखा….

त्या दिवशी जी गेली ती आज दहा वर्षांनी परत आलीए…. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर…. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल… शिखा भाईची निवड होती…. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल… म्हणून बाबाही शांत आहेत त्यांनी सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत…. त्याचा आनंद हाच आमचा आनंद….

इतक्यात शिखा तिथे येते…

शिखा : Hiiii… any secret meeting???? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे….

रोहन : हो… मग काय?? (तिला चिडवत)

रेवती : (अगदी त्रासून) मी निघते… मला उद्याची packing करायची आहे….

दिया : रोहन आपण पण निघूया…. येतोस ना (आवाज वाढवून हलकेच रागात)

रोहन : हो हो.. . येतो ना …..

मेघाही जायला निघते तर शिखा तिला अडवते…..

शिखा : मेघा…. यार तु तरी बोल माझ्याशी…. बाकीच्यांचा राग मी समजू शकते पण…. It’s okay… Forget it…
तु काय करतेस ?? I mean professionally काय करतेस????

मेघा : Interior design करते मी….

शिखा : फक्त येवढच ना…

मेघा : घराला घरपण देते…. तुला नाही कळणार… मला आराम करायचा आहे येते मी….

शिखा : okkk…..

आणि मेघा निघून जाते….

रात्री सगळं आवरून सगळे आपाआपल्या खोलीत निघून जातात…. इथे शिखा विक्रमला मनवण्याठी पूर्ण तयारी करत असते… थोड्यावेळाने विक्रम खोलीत येतो…. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता…. चहूबाजूंनी रंगबेरंगी candles प्रकाशत होत्या…. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या…. आणि समोर शिखा होती…. गडद लाल रंगाचा शॉर्ट टू पीस गाऊन… केसांचा बांधलेला मेसी बन…. त्यातून चेहर्‍यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उडत होती…. गडद रंगाची लिपस्टिक तिच सौदर्य खुलवत होती…. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम…..

शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली…. आपल्या मादक चालीत त्याच्या जवळ गेली… पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली…. तो अजूनही स्तब्ध होता… त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करुन त्याचा मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो…. आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते…. तिच्या लाडिक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते….. पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो…..

विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते…. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज… आणि सुसाट वाहणाऱ्या वार्‍याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती…. तिच्या बाजुला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते…

विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो…. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणार्‍या लाटांकडे पाहात असतो…. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा या हेतूने दिया आणि रोहन त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात…. विक्रम मेघाकडे वळुन बघतो…. ती शांत डोळे मिटून असते…

तो तिला बराच वेळ बघत होता…. मेघा तसच स्वतःला वाळूवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पहात बसते…. दोघेही शांतच… बोलायचं तर खूप काही आहे पण सुरूवात कुठून करावी इथेच सगळं अडल होत…..

विक्रम कुठे निघून गेला हे पाहायसाठी घरातून निघालेली शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली…. आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले….

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 14

शिखा : ए मी पण येणार आहे….दिया : आता हि कशाला?? ? (हळूच कुजबुजत)शिखा : काही म्हणालीस का???रोहन : नाही म्हणजे…..

Geplaatst door ईरा op Woensdag 7 augustus 2019

भाग 1 पासुन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

का कळेना…भाग 1©शुभांगी शिंदेरिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer…

Geplaatst door ईरा op Donderdag 25 juli 2019

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा