का कळेना!! (प्रेम कथा) भाग 3

Written by

का कळेना!!

भाग 3

(अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला पण तस तिने दाखवले नाही….. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली)

घर कसला सुंदर असा बंगला होता तो…..

मेघा : प्रमोद गाडीतल्या दोन बॅग सोबत घे….

प्रमोद : काय आहे यात????

मेघा : चल आधी…. मग कळेल….

तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात…. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन… दारावरची बेल वाजवणार …. त्याआधीच आतून दार उघडते….. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात…. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते… घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते…. रेवतीला बघून तीची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली…. आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले…. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते… पाहुणे निघून जाताच….

(रे) आई : रेवती तुला सांगितलं होतं ना…. आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून….. आज तरी घरी थांबायचे होते….

(रे) बाबा : जाऊ दे ग लहान आहे अजून ती…..

(रे) आई : लहान??? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना????

रेवती : म्हणजे????

एव्हाना मेघाला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते…..

रेवतीला मध्येच थांबवत मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली…..

मेघा : सर मी मेघा….. मेघा सबनीस आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद…. MBA केल आहे याने……. आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे…. आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे….

(रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात…. आपली ताई आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना…. )

इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो…..

विक्रम : Sorry…. पण ते शक्य नाही…. रेवूच लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे…. So….. तुम्ही निघालात तरी चालेल…..

मेघा : (शांतपणे रेवतीच्या बाबांना) सर…. रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात…. प्रेम आहे त्यांच एकमेकांवर…..

रेवतीचे आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात, रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्वकाही सांगून जाते…..

(रे) बाबा : (काहीसा विचार करून ) मग तुमच्या आईवडीलांना माहित आहे का हे…. कि तुम्ही परस्पर ठरवुन आलात…. का सबनीसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे……

मेघा : (तरीही शांतपणे) नाही आम्हा सबनीसांच्या मुलांना मूळात आगाऊपणा जमतच नाही…. आमचे आईबाबा नाही म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझ हे कर्तव्य समजून इथे आली आहे…..

(रे) बाबा : I am sorry….. वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांच छत्र नाही… ते असते तर एकवेळ आम्ही विचार केला असता…. पण आता हे लग्न शक्य नाही… .

मेघा : अहो पण का???? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात…. आपल्या मुलीला सासूसासरे यांचा त्रास नको म्हणून….. मग काय हरकत आहे???

(रे) आई : मुलांना वेगळ केल की ते आपलीच मनमानी करतात…. घर संसार याच त्यांना काहीही पडलेल नसत… घरात मोठी माणसे असली की दोघांतले वाद विकोपाला जात नाही….. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो….. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीच…

विक्रम : अशी मुलं प्रेम तर करतात पण family bonding काय असते हे न कळल्याने नात टिकवू शकत नाही….

मेघा : (विक्रमच बोलन मध्येच थांबवत) एक मिनिट Mr. ……? Whatever your name is….. Family bonding आम्हाला चांगलीच कळते…. पंधरा वर्षे झाली आईबाबा कार अपघातात जाऊन…. आमचा प्रमोद फक्त दहा वर्षाचा होता… तेव्हा पासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत….
लग्न न जमवण्यासाठी कोणतीही शुल्लक कारणं देऊ नका….

प्रमोद : ताई आपण निघूया इथुन…. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको….

मुळात रेवती यासगळ्यांत काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो…..प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो….

मेघा : (तशीच मागे वळून) आमच्या आईवडिलांनी फार चांगलेच संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची family bonding इतकी चांगली आहे की रेवतीशी  register marriage करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले…. तरी की, ” ताई…. मी रेवतीशी register marriage करतोय”… But unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्या वरचा विश्वास कळतो…. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळुन लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते….. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा  विचार करायला भाग पाडलं……. येतो आम्ही……

(मेघा आणि प्रमोद निघून जातात)

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/581606972323826/posts/646738852477304/

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा