का कळेना!!! (प्रेम कथा) भाग 5

Written by

का कळेना!!
भाग 5

आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते…..

मेघा : (केबीनच दार नॉक करून) May I come in….

रोहन : Ohhh… Miss. मेघा… Please come in…

मेघाला बघताच रोहन खुर्चीवरून उठून उभा राहतो…. तिला एक क्षण पहातच बसतो….

हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सुट… हातात त्याच कोंम्बीनेशनच्या बांगड्या…. गळ्यात नाजुक सोन्याची चेन…. मोकळे सोडलेले लांब केस…. ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती…..

मेघा : Hello Mr. रोहन…. मी मेघा… आज पहिल्यांदाच आपली भेट होतेय….

रोहन : इतके दिवस हा item कुठे होता यारर…. ( अगदी हळू आवाजात )

मेघा : Excuse me!! काही म्हणालात???? ( मेघाने त्याच बोलण बरोबर ऐकल पण ignore करत ती कामाविषयी बोलू लागली )

रोहन : काम तर होतच राहतील…. By the way आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया….

मेघा : (जरा दचकून) I am sorry but मला काही कामं आहेत…. तुम्ही हे डिझाइन फायनल करा ना… कॉफी काय होतच राहील….

डिझाइन बघताना रोहनच लक्ष डिझाइनवर कमी मेघावर जास्त होत…. मेघाने ते बरोबर हेरल…. तिने लवकरात लवकर मिटींग संपवली आणि तिथून बाहेर निघाली….

ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला धक्का लागून पाय घसरला पण समोरच्या व्यक्तिने प्रसंगावधान राखून तिला पकडले…. दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली… तो विक्रम होता… ती फक्त thank you म्हणून निघून जाते ….. आणि विक्रम रोहनच्या केबीनमध्ये जातो….

रोहन : Hiii…. विक्रम… आज सकाळीच येण केलस…

विक्रम : रोहन तुझ्याशी थोड बोलायच होत….

रोहन : हा बोल ना… तु येवढा अपसेट का आहेस… is everything okay????

विक्रम : रेवतीशी तुझ लग्न नाही होऊ शकत…. I am sorry for that….. I hope you can understand… याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नाही होणार….

(आणि तो रेवती व प्रमोदबद्दल सांगतो)

रोहन : बसस् काय यारर… It’s okay….

Actually रोहनला रेवतीशी काही घेणदेण नव्हत…. रेवती सोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपला business वाढवून घ्यायचा होता…. पण आता रोहनला business पेक्षा मेघामध्ये जास्त interest वाटत होता….. म्हणून लग्न तुटण्याच वाईट त्याला वाटत नव्हतं….. रोहन… स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा पण तो थोडा स्त्री लंपट होता… आज ही मुलगी तर उद्या दुसरी…. विक्रमची आणि त्याची भेट एका conference दरम्यान होते…. त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परीचयाचा होऊन जातो…. विक्रम स्वतःहून रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो….. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो….

रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात…. प्रमोद आणि रेवतीच लग्न destination wedding अस ठरवत… रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात… पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि एक महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढुन सगळा कार्यक्रम ठरवतात….. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात… पण विक्रम जेवणाला उपस्थित नसतो… मेघा त्याबद्दल बाबांना विचारते… इतक्यात विक्रम आणि रोहन येतात….. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे विक्रमला माहित असते पण तो विसरतो… आणि रोहनचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाच आमंत्रण देत घरी घेऊन येतो….

आई त्या दोघांना सुद्धा पान वाढते… मेघाला बघून रोहन मनातून भलताच खुश होतो…. जेवताना त्याच लक्ष फक्त मेघावर होत….. मेघानेही ते ओळखल होत…. तिने लवकर जेवण आटोपून प्रमोदला घेऊन सर्वांचा निरोप घेतला……

आता प्रोजेक्टच्या बहाण्याने रोहन रोज मेघाशी जवळीक साधू लागला…. मेघा वारंवार त्याला टाळत होती… लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येवू लागला…. मेघाला राग तर खूप आला होता पण तो रेवतीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती….रेवतीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी रोहन आवर्जून हजर असायचा….

असच चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला….

साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता… मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात…. विक्रम स्वागताला उभाच असतो…. त्याची नजर मेघावर पडताच तो तिच्यात हरवून जातो…. जांभूळ रंगाची पैठणी अगदी चापून चोपून नेसलेली… कानात सोन्याचे झुंमके…. गळ्यात सोन्याचा नाजुक हार…. हातात कंगण… आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस…. माथ्यावर नाजूक चंद्रकोर….लाल रंगात भिजलेले नाजुक ओठ…. यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी… आज तिच्या रुपाने विक्रम पूर्ता घायाळ झाला होता….. याआधी त्याने तिला अस कधी पाहिल नव्हत…. कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच…. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली…..

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

या पुढील भाग  वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=647409379076918&id=581606972323826

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत