का कळेना!! (प्रेम कथा) भाग 8

Written by

का कळेना!!!

भाग 8

मेघा जातच असते इतक्यात समोरून येणार्‍या एका मद्यधुंद व्यक्तिचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट मेघावर पडणार त्याच क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजुला ओढतो… मेघा स्वतःला सावरते….

विक्रम : Are you OK ???

मेघा : Yaaa. . … I am fine…..

(दोन मिनिटे कुणीच कुणाशी बोलत नव्हत… )

विक्रम : निघूया…?? सगळे वाट बघत असतील… .

मेघा : Hmmm.. . (हलकेच मान डोलवत)

विक्रम : मेघा हे तुझ्यासाठी… (दुसऱ्या हातात असलेल soft drink पुढे करत).. It’s just soft drink no alcohol… तु Hard drinks घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी….

मेघा : Thank you (मिश्किल हसत)

(आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात…. )

दिया : ए चला ना नाचूया…. जाम भारी म्युझिक सुरू आहे…

शाम है जाम है
और है नशा
तन भी है मैं
भी है पिघला हुवा
छायी है रंगीनिया
फिर भी है बेताबियाँ
क्यों धड़कता है दिल
क्यों यह कहता है दिल
दीवानो को अब्ब तक
नहीं है यह पता
आज की रात खोना है
क्या पाना है क्या खाना है क्या
आज की रात खोना है
क्या पाना है क्या खाना है क्या

मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात…. हे दोघे बसूनच इन्जॉय करत होते…. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगलेच जवळ यायला लागले होते. ….

पहाटे चार वाजता सगळे घरी जायला निघतात… यावेळेस दिया आणि रोहन बाईक ने निघतात… विक्रम स्वतः गाडी चालवतो.. .रेवती मस्त  प्रमोदच्या खांद्यावर डोक ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते…. खिडकीतून येणाऱ्या गार वार्‍यामुळे प्रमोदही  तिच्या डोक्यावर डोक ठेवून झोपून जातो… .

पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती… दोघेही शांतच… मेघा गाडीतला म्युझिक सिस्टिम चालू करते नकळत गियर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो दोघेही शाहारतात…. विक्रम sorry बोलुन समोरचा मिरर ठीक करतो… मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते…. विक्रम अधून मधून तिलाच बघत असतो….

गाडी एकदाची दारावर येउन थांबते…. मेघा… रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याच सांगते…. तसे ते दोघेही जांभळी देत आपाआपल्या खोलीत निघून जातात…. दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात…. .

विक्रम : खूप उशीर झालेला आहे…. तु जाऊन झोपू शकतेस…. मी थांबतो इथे त्यांची वाट बघत… .

मेघा : It’s ok… थांबते मी पण…. तेवढीच तुम्हाला कंपनी…

विक्रम : (हळूच गोड स्माईल देत) okkk…

दोघांच्याही छान गप्पा रंगतात….
गप्पांमध्ये सहा कधी वाजले कळतच नाही दोघांना  ….

इतक्यात बाबा morning walk साठी बाहेर पडतात…..

बाबा : काय रे लवकर उठलात… (त्यांनी दोघांच्या कपड्यांवरुन आधीच ओळखल की हे अजून घरात गेलेले  नाही)

विक्रम : नाही…. दिया आणि रोहन अजून आले नाही ना…. त्यांचीच वाट बघतोय….

बाबा : ते तर कधीच येऊन झोपले… ती काय त्यांची बाईक….. (आणि ते निघून जातात)

मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात….

विक्रम : (मेघाला जाताना अडवून) मेघा!!….. तुझी कंपनी खरच चांगली वाटली…. Thanks…..

मेघा हसून पुढे जाते…. विक्रमच्या या एका वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते…..

आज रेवती आणि प्रमोद ची मेहंदी आहे….. दिया जरी धांदरट वाटत असली तरी तिने तीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली…. सकाळी मेहंदी होती रात्री असाच नाचगाण्याचा कार्यक्रम ठरला होता…. रेवतीच्या चेहर्‍यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता…. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता…. आपल्याला कोणीतरी नोटीस करतं  या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती…. आता तीची नजर विक्रमलाच आधी शोधत होती….

मेहंदीच्या कार्यक्रमात पुरूष मंडळींच काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती…. त्यांच्या मस्त गप्पा टप्पा सुरू होत्या… विक्रम Laptop वर त्याचे काही मेल चेक करत होता….

हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली तो पुन्हा रात्रीसारखा शहारला.. .. त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिलं तर …..

आबोली रंगाची घागरा चोली… त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली …. त्यातुन तीची नाजूक कंबर लपाछपी करत नजरेस पडत होती…. त्याने लगेच नजर चोरली पण मन काही थांबत नव्हत….न राहवून त्याने परत तिला पाहिल…. त्याच कमरेवर ती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती…. गोर्‍या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी…. पायात घुंगरूनी भरलेले पैजण…. कानात खड्यांचे झुंमके….. ओठांवर हलकीशी लिपस्टिक…. आणि तिच तीची गालावरची खळी….आज तो परत तिच्या सौंदर्यावर भूलला होता …. तिला येताना पाहतच बसला….

ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला… .आई गं म्हणत ती ओरडली…. तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला पण आधीच तिथे रोहन पोहचला…. रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि आपल्या किशातला रूमाल तिच्या जखमेवर बांधला…. काय मेघा खाली बघून चालायच ना??? दिया घेऊन जा नीट हिला आता आराम कर थोडा ….. रोहन म्हणाला…..

विक्रम अजूनही तिला न्याहाळत होता…. न बोलुन दोघांचीही नजर खूप काही सांगून जात होती….

हा हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडल…. लग्नानंतर पाचसहा दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद direct हनिमूनला जाणार होते….. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता…..

मेघाला काही कामामुळे लवकर निघाव लागल…. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली…. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली….. पंधरा मिनिटांनी आणखी एक कॅब आली….. मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी… मग आधीची कॅब कोणी बोलवली???

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

भाग 9 ?

विक्रम बाइक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो… अधून मधून तिला फोनवर contact करण्याचा प्रयत्न करत असतो…. पण तिचा फोन बंद…

Geplaatst door ईरा op Vrijdag 2 augustus 2019

भाग 1 पासुन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

का कळेना…भाग 1©शुभांगी शिंदेरिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer…

Geplaatst door ईरा op Donderdag 25 juli 2019

Article Categories:
प्रेम

Comments

  • Interesting….

    Sampada kasle 2nd ऑगस्ट 2019 1:08 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत