किचनधील कानमंत्र …!!

Written by

🔴किचनमधील कानमंत्र….!!

🔴कडधान्य , डाळी लवकर शिजण्यासाठी हळद आणि कांही थेंब भुईमुगाचे तेल घालावे मगच शिजवावे.

🔵 अंडे उकडताना पाण्यात मीठ टाकल्यास कवच सहज आणि संपुर्ण निघते.

🔴 पदार्थांना गोडी आणण्यासाठी साखरेऐवजी मध किंवा गुळ वापरावा.हे दोन्ही पदार्थ साखरेपेक्षा अधिक पौष्टिक आहेत.

🔵 नॉनस्टीकचा तवा चकककीत रहावा म्हणून त्यावर लिंबाचा रस किंवा ताक लावावे.

🔴 इडली करताना त्यामध्ये शिजवलेला थोडा भात मिक्सरमध्ये बारीक करुन घालावा .इडली मोकळी होते.

🔵 नक्षिदार चमचे , ग्लास साफ करण्यासाठी जुन्या टुथब्रशचा उपयोग करावा .

🔴 पुरणाच्या पोळीची कणिक भिजवताना त्यात किंचित खायाचा केशरी रंग टाकावा .पोळी बाहेरून सुरेख दिसते.

🔵 कुकरमध्ये वरण शिजायला ठेवताना त्यात थोडी हळद , हिंग व एक दोन चमचे तेल घालावे .म्हणजे वरण उतू जात नाही.

🔴 दहीवडे करताना वडे भिजत घातलेले पाणी टाकून देऊ नये .हे पाणी सांबारमध्ये वापरावे.

🔵 भजी बनवताना त्यात थोडसे साबूदाणे भिजवून कुस्करुन घालावेत .भजी चांगली होते.

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा