किसान दिन शुभेच्छा ….!!

Written by

🔴किसान दिन शुभेच्छा ….!!

आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.ईथला शेतकरी शेतीवरच आपली गुजरान करत असतो.भल्या पहाटे उठायच थंडी , वारा यांचा सामना करत दिवसाची सुरवात कष्टानेच करायची , मिळेल ती भाजी भाकर खायाची आणि घामाने शेती फुलवायची …त्याला काय वेळेचा उंबरठा दिसला नाही..जमिनीला आपल्या कष्टाचा सुगंध द्यायचा ..तिला हळुवार गोंजारायच …तिच्या कणाकणांशी मनमोकळेपणाने हितगुज करायचे …बीज पेरायचे…त्याला जीवापाड जपायच..अगदी पोटच्या पोरासारख ….लहानाचे मोठ करायच ..त्याच्या बाळसेदार रुपाकडं पाहुन शेतकर्यानं समाधान झेलायच…खळ्यातील राशी..मळ्यातील पीकं यांच्या बरकतीने शेतकर्यानं मालामाल व्हायच एव्हडच सुख त्याच्या पदरात असत….शेतकऱ्यांची ही मनमोहक अवस्था एक शेतकर्याच पोरग टिपू शकत…

एक भयाण वादळ याव , महापुराच्या प्रलयकारी लाटांनी सारी पीकं जमिनदोस्त व्हावी , घरात धान्याची रास संपावी अशा विमनस्क अवस्थेत जेंव्हा शेतकरी असतो त्यावेळी त्याला कोणीही मदतीचा हात देत नाही..हताश आणि दुर्बल होऊन शेतकरी हे दुःख सहन करत असतो…फक्त त्यांन राबरत राहायच….! त्याच्या पिकाला भाव नाही..नुकसान झाले तर मदत नाही… कर्ज कोण देत नाही..दिलेच तर फेडायची कुवत नाही…आशावेळी मग वैफल्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करु लागतो..त्याला सावरण्यासाठी नियतीनेही कोणतिही तरतुद केलेली नाही फार मोठ दुर्दव्य आहे…!

जागतिकरणाने आज आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना नवे ज्ञान मिळत आहे..नवनवे संकरीत वाण , औषधे , खते , बियाणे , औजारे यामुळे शेतकरी शेतीत धवलक्रांती करत आहे.उत्पादनात भरघोस वाढ होत आहे..शेतकरी जिद्दीने सर्व क्षेत्रांत लक्षवेधक उतुंग कामगिरी करत आहे.. केवळ जगाचा पोशिंदा म्हणून तो थांबत नाही…तर जर दिवशी पुन्हा नव्या जोमाने मातीच्या कणांना सांगतो असतो…”मी तुमची सेवा करायला येत आहे…!!. ”

सेवाभावीवृत्तीच्या शेतकरी राजाला सर्व स्तरातुन आधार मिळावा हि याचना या ” किसान दिनाच्या निमित्ताने करतो आहे…!!

🌹सर्व शेतकरी बंधुना किसान दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा …!!

तुझे बीज पेरणं
त्याला कोंब फुटणं
तेचं जरा उमलणं
त्याला तुने गोंजारणं
त्याचं हेच सुखावणं
तुला हे कळणं
धरतीचा बाप होणं

©नामदेवपाटील ✍

Comments are closed.