कुठे चुकतोय आपण, एक पालक म्हणून? ??

Written by

काहीच गंमत-जम्मत नाही ह्या लेखात,पण पालक म्हणून कुठेतरी विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. 

गुनगुन वय वर्ष पाच पूर्ण…

दोन तिन दिवस झाले स्कूल ला जायला कटकट करतीये आणि काळ्या रंगावर सतत प्रश्न विचारतीये 

तु,आणि मी काळे का आहोत ?….बाकी सगळे गोरे का आहेत ?……मग आपण गोरे होऊ शकत नाही का?…..नेहमी तिच्या ह्या प्रश्नांना तिला समजेल अशी उत्तरं देत गेले मी आणि ती पण सगळं समजून घ्यायची ….पण , आज माझं बाळ चक्क रडलं …….आणि म्हटलं कि मला गोरं बनव नाहीतर,मि स्कूल ला जाणारच नाही …….मि तिला जवळ घेऊन समजावून सांगत होते पण, ती आज काहीच ऎकायच्या मनस्थितीत नव्हती.

तीने फक्त मला एवढच विचारलं कि आपले आई वडील जे सांगतात तेच बरोबर असतं ना ग् मम्मा? ……आपले आई वडील कधीच चूक सांगत नसतात ना ग्? …….मि म्हणाले हो बेटा आपले मम्मी पपा आणि मोठे लोक नेहमी चांगलंच सांगतात.

मग ति बोल्ली याचा अर्थ माझा मित्र निलय आणि मैत्रीण अमरजा चे पण आई वडील बरोबरच सांगत असतील?……मि म्हणाले हो?……

पण पुढे गुनगुन ने जे सांगितलं ते ऎकून मि शाॅक झाले….. तिने तिचं, अमरजा आणि निलय चं संभाषण मला सांगितलं ते असं…..

गुनगुन … निलय आज आपण सगळे सोबत टिफीन खाऊ …..

निलय … हो चालेल पण तु तुझ्याच जागेवर बस आमच्यासोबत बसू नको 

गुनगुन …का रे? ?

निलय …अग् का म्हणजे काय तु ब्लॅक अाहेस.

गुनगुन…मग काय झालं ?…..ब्लॅक अँन्ड व्हाईट असं काही नसतं रे निलय कलर असतो तो फक्त त्यात काय एवढं?…..माझी मम्मा पण ब्लॅक आहे आणि ति सांगते ब्लॅक, व्हाईट ने काही होत नसतं आपण हुशार पाहिजे फक्त.

 निलय …नाही ग् माझे बाबा म्हणतात कि ब्लॅक लोक भंगार असतात (भंगार हा शब्द त्याने चार वेळा वापरला )……छान पण नाही दिसत ब्लॅक लोक.

गुनगुन …ए काय पण काय बोलतो रे मि काय भंगार आहे का?……मि तर तुझी फ्रेंड आहे न् मग मि भंगार कशी असेल? निलय …हे बघ , बाबा म्हणतात कि जे छान दिसतात त्यांच्याशीच बोलत जा म्हणून मि अमरजाशी बोलतो आणि तिच्या सोबत टिफीन खातो बाकी गर्ल सोबतपण बोलतो पण तु ब्लॅक आहेस तु नको आमच्यात ?हो ना ग् अमरजा ? ….

अमरजा …हो रे निलय आपण सगळे व्हाईट आहोत तर किती छान दिसतो…..सगळीकडे व्हाईट लोक असतात टीव्ही त पण सगळे छान छान दिसतात पण हि कशी ब्लॅक आहे ?……आणि गर्ल कधी ब्लॅक नसते ति कशी छान दिसते….डाॅल सारखी….. मि पण छान दिसते पण तु तर ब्लॅक आहेस (दोघं मिळून हसतात)

 निलय ….तु ना गुनगुन आज स्कूल सुटल्यावर बघ सगळे व्हाईट आहेत तुच ब्लॅक आहेस आणि रोहन पण ब्लॅक आहे (ह्याच मुलांचा क्लासमेट रोहन)….पण तो तर बाँय आहे ना त्याचं चालतं पण तु गर्ल असून ब्लॅक आहेस …….. 

आता काय बोलावं गुनगुन ला समजलं नाही तिने काल टिफीन पण नाही खाल्ला,फक्त कालपासुन मला म्हणत होती की मला व्हाईट तरी कर नाहीतर मला स्कूल ला जायचं नाहीये……तु तर म्हणतेस की आई बाबा मोठे लोक बरोबर सांगत असतात मग ह्याचा अर्थ निलय आणि अमरजा चे पण आई बाबा बरोबर सांगतात ……म्हणजचे मि भंगार दिसते का ग्? ??……..ब्लॅक कलर ची गर्ल छान दिसत नसते का ग्? 

संभाषण ऎकून आणि तिने विचारलेल्या प्रश्नाने मला रडू आलं…..आणि विचार आला की मुलं किती इनोसंट असतात आपण जे बोलतो त्याला किती सीरिअसली घेतात, ह्यात कोणत्याच मुलाची चूक नाहीये पण अशा प्रकारे मुलांना ईनडायरेक्टली आपण कशा प्रकारचं शिक्षण देतोय ह्याची तर काही पालकांना कल्पनाच नसते …….

काळा गोरा हा भेदभाव कीती रुजलाय आपल्या सगळ्यांच्याच मनात. मग काय रंग म्हणजेच आपली ओळख आहे का?…..सुंदर दिसणे म्हणजे गोरेपणाच असतो का? …..माझी मुलगी आज त्यातून गेली आणि ति तिच्या वयाच्या मानाने खुप समजूतदार आहे म्हणून मि तिच्याशी बोलून ह्यावर मार्ग काढू शकते पण कधीतरी असं होतं की मूल काहीच बोलत नाही आणि आतूनच कुढत जातं मग ह्याला जबाबदार कोण?????बालपण का आपलच पालकत्व? 

आज कितीतरी पालक आपल्या बोलण्यातून, वागण्यातून आपल्या मुलांना चुकीचं शिक्षण देऊन त्यांच्या निरागस बालमनावर भेदभावाचं बीज पेरताएत …..अाणि मग ह्याच निरागस मुलांवर ह्याचा परिणाम होऊन ते भेदभाव करायला शिकवतात मग तिथे नक्की चूक कोणाची? …….

खरंतर आज गरज आहे हे समजून घेण्याची की, एक पालक म्हणून आपण चूक तर करत नाहीये ना? …..

©Sunita Choudhari. 

(मित्र मैत्रीणींनो नमस्कार. एक वर्षापूर्वी माझ्या लेकीसोबत हा प्रसंग घडला होता. त्यातून तीला मी बाहेर काढलं पण विचार आला की, खरच पालक म्हणून आपल्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतात का? प्रत्येक पालकांनी ह्यावर विचार करावा हीच अपेक्षा आहे. ह्याआधी हा लेख माझ्या मित्राच्या एका पेज वर तसेच एका ग्रुपवर मी शेअर केला होता याची कृपया नोंद घ्यावी.)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा