कुठे जायचं आम्ही..

Written by

 

कुठे जायचं आम्ही
…. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#

आज एक जोडपं नजरेस पडल बसस्टॅन्ड वर. काका बसलेले होते काकू त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेल्या होत्या कदाचित त्यांना बर नसेल. 70च्या आसपास काका व 65च्या आसपास काकूच वय असेल अंदाजे. काका जरा त्रासिक दिसत होते व काकूंचा जरा डोळा लागला होता.. बस ची वाट बघता बघता अर्धा तास होऊन गेला तरी माझी बस काही आली नाही..
न राहवून माझी नजर त्यांच्यावर जातं होती…. जवळपास एक तास झाला तरीदेखील काका बसची विचारपूस करीत नव्हते.. यांना नेमक जायचं कुठे आहे? पैसे असतील न जवळ यांच्या? असे प्रश्न मला सतावत होते. नेहमीच्या स्वभावामुळे मी जाऊन त्या काकांना विचारलंच.. “काका कुठे जायचं आहे? काकूंना बर नाही का? काही मदत हवी आहे का? ”
काका :- कुठी जायचं याचा पत्त्या नाई पोरी… आलो कुठून तरी… थकलो या आयुष्याला.. वयानुसार झेपत नाई. (त्यांचे डोळे पाणावले इतकं बोलेस्तोवर )
काका तुम्हाला मुल-बाळ नाही का?
(तोपर्यंत काकू उठल्या होत्या )
काकू :- वांझ हाये बाई मी, मायी कूस नाई उजवली (रागानेच काकू बोलल्या )
मला लक्षात आला.. सगळा प्रकार.. जास्त न बोलता मी त्यांना विचारलं ” काही मदत करू का मी? काही खाल्लत का? पैशाची मदत करू का काही?” असं विचारलं..
काका म्हणाले.. पोरी तुले माय – बाप हाये का?

हो काका.. आहेत न मला आई -बाबा.. का बर विचारत आहात?
भाऊ हाये का पोरी तुले?..
हो आहे न.. एक भाऊ….
तुहे माय -बाप कोणाजवळ रायते मंग…?… काका
काका.. माझे आई -बाबा त्यांच्या घरीच राहतात.. मी

अन तुहा भाऊ…. येगळा रायते का?

नाही… हो काका.. अजून पर्यंत माझा भाऊ आई -बाबांन सोबत राहतो… मी

लगीन नसन झालं त्याच… लहान असणं थो.. तुवा भाऊ… काका

नाही… माझा भाऊ मोठा आहे.. त्याच लग्न झालय व त्याला दोन मुली देखील आहेत.. पण तुम्ही हे का विचारताय मला
काकू :-येड लागलं हाय त्यास्नी.. म्हून शिन्या इचारून रायले… जाऊ दे पोरी तू ध्यान नग देउ..
काकू काही अडचण असेल तर सांगा न मला.. मी काही मदत करू शकेल तर… बराच वेळ झाला तुम्हांला बघतेय.. कुठे जायचं असेल, पैसे नसेल तर सांगा मला मी मदत करेल

काका :- कुठी जायचं हाच त मोठा सवाल हाये आम्हाले ????(काळजीने काका बोलले )
तुमचे नातेवाईक असेल… त्यांच्या कडे जायचं आहे का?

काकू :- ठाव ठिकाणा नाई बग पोरी आमचा.. तू एव्हड्या यांन इचारून रायली तर सांगतो तुले
पोरानं घरा बाहीर काढल बघ आमास्नी.. ??(काकू रडायला लागल्या )
रडू नका काकू… तुम्हाला वृद्धश्रमात जायचं आहे का? म्हणजे मी तशी मदत करते… तुम्हांला.. मी
काका :- हाय का पोरी असं ठिकाण जिथ आम्ही जाऊ शकू…? अन तिथून कुणीबी आम्हास्नी काढणार नाही बाहेर…?

हो काका.. वृद्धश्रम आहे जिथे मुलबाळ नसलेले.. ज्यांना आधार नाही असे वृद्ध लोक राहतात..

मला मधेच थांबवत काकू रडतच बोलायला लागल्या “काय दिस आले… चार.. चार लेकर असून हे दिस बघा लागून रायले.. मांगच्या जन्मिचे पाप होये जे ह्या जनमात अशे लेकर पोटी आले माह्या… ??”
काका :- जाऊ दे न व तू.. कायच गऱ्हाणं सांगत थ्या पोरीले.. थे आपली मदत करून रायली न… सांग व पोरी थ्या वृद्धाश्रमाच काय सांगत व्हती तू..
काका.. बोलू द्या काकूला.. काय झालं.. काकू
काकू :-काय सांगू माय तुले… साजरे तीन पोर अन एक पोरगी हाये तुयावाणी.. पण त्यायले वझ झालं न आमचं म्हातारपणात.. ??(काकू डोळे पुसतच सांगत होत्या )
“हाडाचे देड अन कुडाचे घर केले “(एक म्हण आहे, खूप कष्ट केले ) न व यायले लायण्याचे मोठ करा साठी… आमी दोघ बी शिकलो नाई आहोत.. पर लेकरायले शिकवलं व माय.. साजरे नोकरीवर लागले न थे.. पैस्याले काळ नाई न व माय त्यायच्या जवळ.. पण माय बापाची सरम (लाज)लागते त्यायले.. माह्या ह्याच लुगड्याच्या पदरात झोपत व्हते हे पोट्टे…. असच बोलणं शिकोल न जवा थे बोलाले लागले त.. ह्या माह्या हातच्या भाकरी खाऊन मोठे झाले न थे… ??अन आता त्यायच्या बायका आल्या तर त्यायले आमच्या कपड्याची, बोलण्याची सरम लागते. माया हातच जेवण नाई आवडत.. नाई आवडत न नाई पर असं बार.. बार कुनाबी समोर घालून पाडून बोलले पायजे काव बाई.. ???(काकू ढसाढसा रडायला लागल्या )
काका :- काय नसीब हाय पोरी आमचं.. लय कष्ट केले.. मन मारून..हाऊस मौज पुऱ्या नाई केल्या.. अन पैसा जमा करून पोरायले शिकोल, जमीन घेतली, जसं जमन तस चार भीती उभारल्या.. डोक्यावर छप्पर केल… पोर बी नोकरीवर लागले. लगीन झाली त्यायची. थे शयरात राहत होते.. त आम्हाले बी त्यायच्या जवळ आणलं… “गावात कोण वावर पाहीन तुमी बी मतारे झाले… म्हून शिन्या वावर विकाले लावल मले.. मी नाई विकत होतो त.. “तुमच्याच नावाने बँकेत टाकतो म्हणे पैसे.. घर बी तसंच केल व, बँकेच्या कागदावर अंगठा घेतो म्हणून घर मोठ्यानं त्याच्या नावावर केल.
बाकीच्यायला राग आला “आमचा काही अधिकार नाही का?” म्हणून त्यायन तवाच संबंध तोडले. “जिथं वावर अन घर देल तिथंच राहा” अस मने… पोरगी काय बोलणं बिचारी जवाई जे म्हणणं तस ते बोलली…

घर अन वावर मोठ्यानं (मोठा मुलगा ) घेतलं त आमले त्याच्या जवळच राहा लागल.. त्याची बायको लय काम करून घे हिच्याकडून… पर पोरग एक सबुद बी नाई बोलें बायकोले.. काई चुकलं.. माकल त मायलेच बोलें थो हरामखोर.. (काकाचे डोळे देखील पाणावले हे सांगताना )
मी त्यांना पाणी दिल प्यायला व नाश्ता आणून दिला..
जरा वेळ दम नाही घेतला दोघांनी.. तोच पुन्हा त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली
आमची करमकहाणी लय मोठी हाये बाई… व्हतं.. नव्हतं सार मोठ्यानं त्याच्या नावावर करून घेतलं.. आता आमच्या हाती..पायी कायीच नाही.. अन काल त कहर केला त्याच्या बायकोन(सुनेने ) ” हिले ताप होता त दावायी दे म्हणलं त “काय होते मने इतकुश्या तापन.. मरून रायली का म्हणे थे ” पोरग बी एक सबूद नाई बोललं.. याच्या तापत, बिमारीत रात रात जागून काढली तीन अन आज हे पोट्ट मायले तापाची गोळी बी नाई देउ शकत?

थोड्या येळान.. रात्री सून -लेक बोलत होते त्यायच्या खोलीत पण आरामात नाई, जोरात म्हंजी आम्हाले आयकू आलं पायजे म्हून … “मरून जाईन लवकर दोघंही तर बर होईन. नुसती कटकट त्यायच्या गावठी पणाची, मुलं (आमचे नातू ) अशीच भाषा बोलत आहेत.. बाहेर कुठे गेलं की नुसती लाज वाटते मुलं असं गावठी बोलले की.. मरून जाव नाहीतर निघून जाव घरा बाहेर.. डोक्याचा ताप जाईल ”
हे आयकून तिथंच मेल्यागत झालो आम्ही..
रातभर लय रडली न हे… लेक एक सबूद (शब्द ) नाही बोलला बायकोले का “कशी बोलत व तू थे मायबाप होये न माये.”. लय मन दुखलं व बाई माय. आज लेकरायले आमची लाज वाटून रायली मायबाप मनाची. ???
काकू :-थो हरामखोर त्यानं बी कमी नाई केल आमचा पाणउतारा कराले. ” लाज काढली आमची त्यान. “काय मने तो माय मनाचीबी लाज लागली त्याले.” सून त इचारू नको. पोटच पोर बोलल त थे त मग लोकांची होये.. थे काय बोलली हे संगाची बी लाज वाटते मले. “मरून जाव नाहीतर निघून जाव म्हणे ” मग कायले राहू त्यायच्या घरी निघालो तिथून . ” जाऊ दे बाई तू… आमची कहाणी लय मोठी आहे..
तू काई राहाची यवस्था (व्यवस्था ) सांगत होती थे (ते ) सांग..
माझ्या कडे वृद्धाश्रमाचा पत्ता होता.. त्यावर नंबर होता.. तो त्या काकांना दिला व हजार रुपये दिले…
जास्त मदत नाही करू शकले कारण मला ही पुढच्या प्रवासाला जायचे होते.. मी माझा नंबर दिला त्यांना व मदत लागली तर मला फोन करा म्हणून सांगितलं..
@जयश्री @
खूप काही लिहावंसं वाटत आहे…
पण…
काही प्रश्नच थैमान घालत आहेत डोक्यात ..
खरंच मुलांना लाज वाटायला पाहिजे अशिक्षित आई -वडिलांची?
आजकाल तर शिकलेले आई -बाबा असले तरी देखील अती उच्च शिक्षित मुलांना (मुल आणि मुली ) त्यांच्या(आई -बाबांच्या ) राहणी मानाची लाज वाटते.. जनरेशन गॅप म्हणतात ती हिच का?

ज्यांनी आपल्याला त्याच भाषेत बोलणं शिकवलं त्याच भाषेची आपल्याला लाज वाटायला हवी का?
त्यांच्या पेहरावाची (कपड्यांची ) का लाज वाटते आपल्याला?
वयात अंतर आहे तर भाषेत व विचारात अंतर येईलच की.. का नाही समजतं हे मुलांना..? (मुलगा व मुलगी ) दोघेही आलेत यात..
जन्म दिला त्यांनी खस्ता खाल्या तुम्हाला वाढवण्यासाठी..इच्छा मारल्या स्वतःच्या पण तुमच्या इच्छा पूर्ण केल्या तरीही तुम्ही असे बेजबाबदार पणे का वागता हो पालकांशी?
ज्यांना पालक नाहीत त्यांना विचारा ते नसण्याचं दुःख किती असत ते ??
तरीही काही महाभाग म्हणतात ” बर आहे तुम्हाला आई -वडील नाही. कटकट नाही कोणतीच ” आई -बाबा म्हणजे कटकट असते का?
आई -बाबा शिवाय वाढलेल्या मुलांना विचारा.. कटकट म्हणजे पोरके राहणे.. आई -बाबांच्या छत्र नसणे.
हे कळायला आधी पोरक व्हावं लागेल.. आणि मी देवाजवळ प्रार्थना करेल की असं पोरके पण कुणालाही न येवो..
मुलांना विनंती (मुलगा /मुलगी जी सून होते नंतर) आहे..कसेही असले तरी ते आपले पालक असतात तेंव्हा असा अपमान करू नका व वृद्धाश्रमाची वाट तर दाखवूच नका त्यांना.. तुम्हाला मुलं आहेत तेंव्हा हेच दिवस तुमच्यावर येऊ शकतात.. “कुठे जायचं आम्ही ” असं म्हणायची..
मी सगळ्या मुलांना नाही म्हणतं आहे..पण बरेच जण असं वागतात.. वेगळं राहतात, भांडतात, काहीकाही तर मारतात सुद्धा आई -वडिलांना.. असा राग येतो न तेंव्हा..
एकच सांगायचे आहे..त्यांनी आपल्याला सांभाळल.. आपण त्यांना सांभाळायचं बस.. थोडा आदर व प्रेम द्यायचा.. बाकी नाती आपोआप जपली जातात.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा.. शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद ?
©®जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा