तो आणि ती,लहानपणापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे अगदी “दो जिस्म एक जान’असंच काही..पण ग्रामीण भागात राहिलेले त्यात दोघांचाही धर्म वेगळा.दोघांच्या घरी समजले,हिरोशीमा आणि नागासाकी एवढेच अफाट स्फोट झाले.आधीच प्रेमविवाह आणि त्यात आंतरधर्मीय म्हंटल्यावर कडाडून विरोध होणारच होता.
पळून जाऊन त्यांना लग्न करायचे नव्हते.दोन्ही परिवाऱ्याच्या संमतीने झालं तर ठीक नाहीतर बिनलग्नाचे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली.सहा वर्षे असेच निघून गेले.
अखेर त्याच्या जिद्दीपुढे घरच्यांनी हात टेकले आणि लग्न साध्या पद्धतीने पार पडले तेही सगळ्यांच्या संमतीने. कोर्ट रूममधे सह्या झाल्या..त्या कागदांवर तिचं लग्नानंतरचे नाव लिहलं होतं…कुमारीऐवजी स्वतःच्या नावापुढे सौभाग्यवती बघून तिचे अश्रू अनावर झाले..तिला हवीहवीशी तिची नवीन ओळख तिला अखेर मिळाली.
Article Categories:
प्रेम