कॉफी आणी बरच काही

Written by

कॉफी आणि बरंच काही
कॅफेमध्ये जायला कोणाला आवडणार नाही म्हणा ! माझ्या मते तरि जी मज्जा कॅफेमध्ये जाण्यात आहे ती हॉटेलमध्ये जाण्यात नाही. तिथं बसुन कॉफी घेण्यात एक वेगळीच मज्जा असते. सोबत एखादी जिवलग मैत्रिण असेल तर मग खुप गप्पा आणि कॉफी. वेळ सहजच निघून जातो. कॉफी म्हटलं की सोबत आपसुकच येतात त्या खुप गप्पा अन आठवणी. कपमधील कॉफी हळूहळू संपत असते आणी आपलं मन मोकळं होत जातं. काय माहित ती त्या निवांत जागेची किमया असते का त्या कॉफीच्या एका कपची. पण तिथून बाहेर पडताना मात्र तो कप रिकामा असतो तरिही आपण बरंच काही सोबत घेऊन तिथुन बाहेर पडतो.
माझी आवडती जागा कुणी विचारलं तर नक्कीच कॅफे! आवडतं ठिकाण नव्हे. ठिकाण आणी जागा या दोन भिन्न गोष्टी. फिरण्याची ठिकाणं वेगवेगळी असतात,पण जागा एकच आपली अशी हक्काची वाटणारी. जिथं थोडावेळ का होईना मन प्रसन्न होईल, सारा क्षीण मिटुन जाईल. तशी जागा म्हणजे माझ्यासाठी कॅफे.
बाहेर खूप पाऊस असेल तर कॉलेजच्या कँटिनमधली कॉफी किंवा आईला मस्का मारून तिनं बनवलेली कॉफी…..खिडकीतुन बाहेर पडणारा मुसळधार पाऊस, हातात कॉफीचा कप…मस्त वाटतं अश्यावेळी मग कॉफी कधी संपते समजतही नाही.कधी कधी वाटतं,असा गरम कॉफीचा कप दररोज सकाळी उठल्यावर मिळाला तर! पण यात काही मजा नाही.कारण आपल्या दररोजच्या घाईगडबडीमध्ये स्वतःला सामावून घेणारी अशी कॉफी नसतेच. सर्वसामान्यांना परवडणारा असतो तो चहा. त्यांना कॉफीची चव रूचत नाही. आपल्या आई बाबांपासुन ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तो चहा. पण एकदा का कॉफी जवळची वाटू लागली की ती निवांत क्षण आणि त्यासोबतच बरंच काही देऊन जाते.
स्नेहा डोंगरे -मुक्त पत्रकार,युट्यबर

पुर्वप्रसिद्धी- दै.लोकमत.कोकण आवृत्ती

नमस्कार वाचक मंडळी, आपल्यापैकी काहींनी वृत्तपत्रांतुन माझे लेखन वाचले असेल पण आता कुटुंब, स्त्रियांचं भावविश्व,आजची तरूणपिढी,आपल्या आजुबाजुच्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या विषयी खुसखुशीत लेख,हलक्याफुलक्या कथा आणि कविता असं सार काही तुम्ही या ब्लॉगवरून वाचु शकाल.सो नक्की वाचा,तुमच्या लाखमोलाच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.लाईक,कमेंट करा.नावासह शेअरसुद्धा करा.Happy Reading

 

Article Tags:
· · · ·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा