कोणीतरी समजावणार पाहिजे😊

Written by

आज्जी,…पणजी असं गेटपासूनच ओरडत,.. पळत माय लेकी झोपाळ्यावर बसलेल्या,..गोऱ्यापान ,भारदस्त,ठेंगण्या ठुसक्याच पण अगदी नाकी डोळी तरतरीत असणाऱ्या आणि चष्मा लावून का होईना अजुनही आवर्जून झोपाळ्यावर बसून पेपर वाचणाऱ्या आपल्या आजीच्या गळ्यात पडल्या,…     कायराला त्या क्षणी अजीच्या त्या पांढऱ्या शुभ्र छोट्याश्या अंबाड्यातल्या मोगऱ्याने अजून प्रसन्न केलं,..खरंतर महिन्यातून एकदा तरी आजीला भेटणं असं अगदी ठरलेलं होतं पण यंदा चक्क 3 महिन्यांनी ती आजीला भेटणार होती,..
      नात मागुन गळ्यात आणि पणती लगेच मांडीवर चढुन बसली होती,..आजी अगदी खुश झाली,..मांडीवरच्या सोनूला खाली उतरवलं,..आणि जा आत पणजोबा बघ मनीमाऊला कस दूध देत आहेत ते बघायला पिटाळलं,… मघाशी आलेल्या कायरच्या फोनमुळे आजीला माहीत होतं ही फक्त तासभर आहे आपल्याकडे,..त्यात बरंच बोलायचं आहे तिलाही आणि मलाही,..आजीने आधीच आजोबांना सांगून ठेवलं होतं,..तुम्ही आपली पणती सांभाळा,.. मी बोलते कायराशी,..
           “आजी अजूनही किती प्रसन्न दिसतेस ग तू,..एवढं वय झालं तरी,..किती ग हा उत्साह अगदी एक तरी फुल डोक्यात आहेच खोचलेल,..आणि डोक्यावरच सुंदर लालचुटुक कुंकू पण रुपया सारखं,..”
       आजीने ऐकून घेतलं,..पण आजी आज चेष्टेच्या मुड मध्ये नव्हतीच,..जरा गम्भीर आवाजात आजी म्हणाली,”एकदा स्वीकारायला शिकलं ना कायरा की आपोआप आवड सवड सगळ मिळत जातं माणसाला”..
        मला परवा तुझा बाबा येऊन बोलला आहे तुझ्या आणि श्री च्या घटस्फोटाच्या बाबतीत,..
मी फक्त एवढंच सांगेन तुला,..तडजोड करून जगता आलं पाहिजे,..सगळी माणसं कधी न कधी चुकत असतात पण त्या साठी एवढा मोठा निर्णय मला नाही पटत,..

         काव्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून बोलायला लागली,”आजी तू म्हणतेस ते मान्य,..पण हे समजून घेणं हे स्त्री नीच का करायचं ग,???त्याला नाही का समजून घेता येत,..
           “आग संसारात मुळात स्त्री पुरुष भेद नसावाच ग,..राग आल्या नंतरच वागणं हे आयुष्यभरासाठी एवढा मोठा निर्णय देणार कसं असू शकतं,..”
तुम्ही प्रत्येकजण कमवता म्हणजे फक्त कमावण एवढंच पुरेस आहे का संसारात,..उद्या तू वेगळी झाली तर ह्या सोनीला जे बापाकडून हवं असत संस्काराचा पाया तो सगळा नाही तू देऊ शकणार,..आणि त्याने मुल नेलं तर तो ही ती उणीव पैशाने नाही भरणार,…घटस्फोट तुम्ही आईबाबा नसाल तर नक्की विचार करा ग पण तुम्ही जर आईबाबा असाल तर होताहोईल तेवढ जपा नातं,..अहंकार जरा बाजुला ठेवा कारण तुमच्या त्या नात्यावर तर पुढच आयुष्य असतं ग बाळाचं,.. बघ विचार कर शेवटी निर्णय तुझा आणि हे फक्त तुलाच नाही श्री ला पण सांगून झालं आहे,..त्याला पटलंय तू बघ काय ते,..?”
        कायरा उठली आजी मी निघते,..उशीर होईल श्री निघुन जाईल ऑफिसला,..😊
           आजीला हसु आलं,..गेटमधून गाडीकडे जाणाऱ्या माय लेकींना पाहून आजी म्हणाली,..समजावलं की समजतं फक्त कोणीतरी समजावणार पाहिजे ह्या पिढीला😊,…(पोस्ट साठी चित्र मी काढले आहे😊)
         ©स्वप्ना मुळे, औरंगाबाद

Article Tags:
·
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.